‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जर तुम्हाला जेवण बनविण्याची हौस असेल तर कोणत्याही ज्ञात पदार्थाची थोडी वेगळी रेसिपी जाणून घेण्याचा सध्याचा सर्वात सोपा मार्ग यूटय़ूब आहे. इथे पंचतारांकित क्षुधाशांतिगृहामध्ये मिशलिन स्टार मिळविणारे शेफ्स ते रस्त्यावरच्या ठेल्यांमध्ये पाककौशल्याची समज आणि उमज असलेल्या बल्लवाचार्याचे दर्शन होते. हे पाकनिपुण एखाद्या कलावंतासारखे द्रुतगतीने तयार करता येण्याजोग्या खाद्यकलाकृती व्हिडीओद्वारे सादर करताना दिसतात. सध्या फॉक्स ट्रॅव्हलर आणि इतर माहितीरंजन वाहिन्या गांभीर्याने देशोदेशीच्या पाककृतींचा परिचय करून देत आहेत. तिथल्या शेफ्सच्या तासाभरांचे कार्यक्रमही इथे पाहायला मिळू शकतात. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये भारतीय व्यंजनांच्या कृती ‘हे करून पाहाच’, ‘हे तुम्हालाही जमू शकेल’चा आत्मविश्वास देणाऱ्या आहेत. यूटय़ूबच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्युझिक व्हिडीओ, सिनेमाचे भाग आणि शॉर्टफिल्म्सचा मोठा रतीब अपलोड होऊ लागला. कालांतराने यात वेगवेगळे विषय समाविष्ट झाले. त्यात एखादी गोष्ट आणखी सोपी कशी करता येईल, हे सांगणाऱ्या ज्ञानवंतांचा भरणा होता. या ज्ञानवंतांमध्ये वाद्य वाजविण्यापासून ते हस्तकलेद्वारे शोभेच्या वस्तू बनविणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. सुरुवातीला परदेशात राहणाऱ्या आपल्या नातलगांना आपल्या देशातील अन्नपदार्थाची पाककृती कळावी या उद्देशाने विविध देशांतील तंत्रस्नेही कुटुंबांनी पाककलाकृतींचे व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. अगदीच बाळबोध असलेल्या या व्हिडीओजना गेल्या पाच-सात वर्षांत मोठी मागणी तयार झाली. मग बल्लवाचार्य आणि हौशी सुगरण बायकांनी शिस्तीत आपले व्हिडीओज कॅप्शन आणि पाश्र्वसंगीत वापरून अपलोड करायला सुरुवात केली. टीव्हीवरील शेफ्सच्या कलाकृतींसोबत पदार्थ बनविण्याच्या स्पर्धाचे रिअॅलिटी शो सुरू झाले तेव्हा यूटय़ूबवर सादर होणाऱ्या किचन कौशल्यांच्या व्हिडीओजनी कात टाकली. पदार्थ बनविण्यासोबत सहज किचन टिप्स देणारे व्हिडीओ जास्त लोकप्रिय होऊ लागले. एक वर्षांपर्यंत कोथिंबीर फ्रिजमध्ये वापरतायोग्यरीत्या कशी साठवून ठेवता येईल यापासून कुकरमध्ये लादीपाव कसा बनविता येईल, अशा प्रकारच्या शेकडो टिप्स आकर्षक प्रात्यक्षिकासह पाहायला मिळू शकतात.
आजचा पहिला व्हिडीओ आहे किचनमध्ये जेवण करण्यासाठी वापरता येण्याजोग्या सहज टिप्सचा. प्रत्येक जण जरी जेवण करीत नसला किंवा त्याला त्यात रस नसला, तरी या व्हिडीओजमध्ये वापरलेल्या कौशल्याचे एकत्रीकरण कुणालाही आवडेल इतक्या आकर्षक आणि अभिनव पद्धतीने मांडले आहे. यात चॉपटिक्सद्वारे सेकंदांत फळातील बिया काढण्याची हुकमत दाखविली आहे. पोळ्या लाटण्यामध्ये अडचण येणाऱ्या व्यक्तींना दारूच्या रिकाम्या बाटलीचा वापर करून उत्तमरीत्या कणिकाचा गोलाकार साधण्याचा प्रकार केला आहे. आकर्षक आकारांत आणि रंगात अंडे बनविण्याच्या आणि उकडण्याच्या अत्यंत सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटरच्या स्लाइस करण्यापासून ते भाताची मूद करण्याच्या फार वेगळ्या पद्धती सापडतील. आजीबाईंचा बटवा पुस्तिकेसारखे या माहितीचे स्वरूप आहे. फरक इतकाच की यांची मांडणी खूप आकर्षक आहे. या व्हिडीओजमध्ये पाश्र्वसंगीत आहे. कुणी कसे बनवावे हे सांगत नाही. आवश्यकता भासल्यास काय वापरले जाते, त्याच्या कॅप्शन्स उपलब्ध करून दिल्या जातात. दुसरा व्हिडीओ आहे, ‘टेन अमेझिंग थिंग्ज यू कॅन डू विथ एग्ज’ नावाचा. ऑम्लेटचे आपल्याला माहिती असलेले प्रकार एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात सहजसाध्य वैविधता कशी आणता येईल, याचे कित्येक नुस्खे उपलब्ध करून दिले आहेत. बदामाच्या आकाराचे ऑम्लेट, उकडलेले अंडेही करता येऊ शकते याचा नवा शोध या व्हिडीओमध्ये पाहायला मिळू शकेल. ऑम्लेट बनविण्याच्या अगदीच भिन्न पद्धतींच्या टिप्स येथे आहेत. घरात एकटे असताना जेवण बनविण्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो. आळस आणि कंटाळ्याच्या अवस्थेत देखील स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंचा वापर करून उदरभरणाची तजवीज कशी करता येऊ शकेल, याचा एक व्हिडीओ उपलब्ध आहे. शीतपेयांच्या बाटल्यांच्या झाकणापासून, त्याच्या प्लास्टिकला कापून नव्या स्वयंपाक आयुधांची निर्मिती कशी करावी हे सांगणाराही व्हिडीओ लोकप्रिय झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम न करता ही कौशल्ये प्रत्येक जण आत्मसात करू शकतो, ही या व्हिडीओजची खासीयत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शेफ्सच्या इथल्या टिप्स तुम्हाला उत्तम बल्लवाचार्य बनवू शकते. त्याशिवाय इथे कोणत्याही पदार्थाचे नाव टाकून पाहायला मिळणारी सोप्या वा कठीण पदार्थाची रेसिपी आपल्या पाकज्ञानात आणखी भर पाडू शकते. अन् हेही करायचे नसल्यास या व्हिडीओजमधील आकर्षक मांडणीची रेसिपी पाहायला सुंदर वाटू शकते.
- https://www.youtube.com/watch?v=IbiXc5cUVus
- https://www.youtube.com/watch?v=56SGDTE8hXQ
- https://www.youtube.com/watch?v=V8PHOdxj2Nw
- https://www.youtube.com/watch?v=yCWg5_4Qx1g
viva@expressindia.com