कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! शॉर्ट आणि स्वीट चार अंकी लेखमालिकेचा भाग चौथा आणि शेवटचा.
बऱ्याच दिवसांपासून आळसावल्यासारखा, नाखूश दिसणारा कॉलेजचा रस्ता ‘युफोरिक’ वगैरे म्हणतात तसलाच काहीतरी झाला होता. बऱ्याच दिवसांची मरगळ त्या दिवशीच्या कूल वातावरणाने चांगलीच झोडपून काढलेली. खूप दिवसांची प्रतीक्षा संपत आल्यानंतरचा सावरून बसलेला भवताल.. आणि सावरून बसलेली तरीही काहीशी बावचळल्यासारखी ती. म्हणजे नेहा. वेगळ्याच धुंदीत. स्वत:शीच गुणगुणत. एका पॉइंटला ट्रान्समध्ये हरवत जाणारी. आणि कुणीतरी असंच. त्याच उत्कटतेने, आवेशाने तिच्यापाशी पोहोचू पाहणारं. मनाला लागलेली धाप तशीच रोखून धरणारं.. एक फक्त घडय़ाळात आणि सूर्याच्या मुखडय़ावरच वाजला होता त्या दिवशी. बाकी तनामनात अगदी चुस्त आणि सगळंच तंदुरुस्त करून टाकणारी थंडाई. ती मात्र आतून सुखावत गेलेली. तिच्या नजरेत फक्त त्याचं.. सागरचं येणं दाटून आलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा