कॉलेजमध्ये असताना एक पुस्तक वाचनात आलं आणि ती सायबरनेटिक्सकडे आकर्षित झाली. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर संशोधन करणारी आणि ५०० देशांतल्या मुलींबरोबर राहिलेली ब्रिटनची मैत्रेयी सांगतेय तिच्या संशोधनाच्या ग्लोबल अनुभवाबद्दल..
Hi friends ! नुकतेच लोकसत्ता व्हिवा पुरवणीमधले विदेशिनी सदर वाचले आणि माझ्या लक्षात आले, अरे! आपल्याला विदेशात येऊन सहा वर्षे झाली. भारतात बारावी करून एक वेगळी वाट घेऊन मी येथे, रीडिंग युनिव्हर्सिटीत (Reading University) पीएचडी करत आहे.
आमचे रीडिंग हे शहर लंडनपासून फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. फार मोठे किंवा छोटे नसलेले हे सुंदर शहर राहण्याच्या दृष्टीने फारच छान आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून वेगळी निघालेली रीडिंग युनिव्हर्सिटी ही जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी (टॉप वन परसेंट मधली) एक आहे. बऱ्याच संशोधन आणि संगणक कंपन्या असल्यामुळे या भागाला इंग्लंडची सिलिकॉन व्हॅली असे म्हटले जाते.
पुण्याजवळच्या निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेतून शालेय शिक्षण झाल्यावर अकरावीसाठी फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस माझ्या वाचनात इंग्लंडमधील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. केविन वॉरविक यांचे I, Cyborg हे पुस्तक आले. त्यातील सायबरनेटिक्स (Cybernatics) या शास्त्राने मी प्रभावित झाले. डॉ. वॉरविक यांनीच या विषयाचा पाया घातला. सायबरनेटिक्स हे शास्त्र मानव-मशीन संबंधांचा अभ्यास करतं. त्याच वेळेस माझ्या वडिलांनी मला या शास्त्रात पुढे पुढील शिक्षण घ्यायला आवडेल का, असं विचारताच मी लगेच होकार दिला. भारतात प्रचलित असलेल्या शिक्षणवाटांपेक्षा वेगळं काही करायचा विचार होताच. त्यादृष्टीने अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. डॉ. वॉरविक यांच्याच रीडिंग विद्यापीठात Cybernatics and Artificial Intelligence या विषयात M. Eng हा इंटिग्रेटेड कोर्स करता येतो हे समजले. त्यानंतर इंग्लंडमधील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून २०१० साली बारावीनंतर मी ट. एल्लॠ करण्यासाठी रीडिंगला आले.
माझा कोर्स सुरू झाल्यावर मला डॉ. केविन वॉरविकच वैयक्तिक मार्गदर्शक म्हणून मिळाले आणि माझा अभ्यासातला आणि संशोधनातला उत्साह अजूनच वाढला. माझ्या चार वर्षांच्या कोर्समध्ये सर्व काही नवीन असताना शिक्षकांचे प्रोत्साहन, वेगळी शिक्षणपद्धती, प्रोजेक्ट्स, कस लावणाऱ्या असेसमेंट्स, कोर्सवर्क या सर्वात चार वर्षे कशी गेली ते कळलेही नाही. चारही वर्षी मी विद्यापीठात प्रथम आले आणि chancellor award मिळवले. उन्हाळ्यात असणाऱ्या UROP या संशोधन अभ्यासवृत्तीमुळे वेगवेगळ्या विषयात संशोधनाची संधी मिळाली.
या सर्व सहभागामुळे आणि एकंदर शिक्षण पद्धती व शैक्षणिक वातावरणामुळे मी संशोधनाच्या करिअरकडे वळले. आमच्या कोर्सचा भर संशोधनावरच होता, त्यामुळे त्याच्यातच आवड निर्माण झाली. येथे शिक्षणात तुम्ही स्वत: संदर्भ शोधून विषय आत्मसात करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे अभ्यास हा काही पुस्तकांपुरता मर्यादित राहात नाही. परीक्षेतही ठरावीकच उत्तर अपेक्षित नसते. त्यापेक्षा विद्यार्थ्यांला विषय किती समजला आहे हे बघितले जाते. विषय शिकवतानाही तुम्हाला विषयाची ओळख करून देऊन जास्तीत जास्त माहिती स्वत: मिळवायला प्रोत्साहित केलं जातं. त्यासाठी इथे सुसज्ज अशी पाच मजली लायब्ररी आहे. विद्यार्थी-शिक्षक संबंध अतिशय चांगले आहेत. आपण केव्हाही वेळ मागून त्यांच्याशी चर्चा करायला जाऊ शकतो. M. Eng मध्ये विद्यापीठात पहिली आल्याने पीएचडीसाठी विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि माझा संशोधनाचा प्रवास सुरू झाला.
बारावीनंतरच एकुलती एक मुलगी असूनही लहान वयातच आई-बाबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला इथे शिकायला पाठवले याचा मला आनंद आहे. मी रीडिंगला येताना एकटीच आले. सहसा बाहेरच्या विद्यापीठात जाणाऱ्या मुलांचा आधीच ग्रुप तयार होतो, पण बारावीनंतर माझा अभ्यासक्रम करायला येणारे कोणी नव्हते. त्यामुळे मी एकटीच सर्व मॅनेज केले. नंतर काही भारतीय विद्यार्थ्यांची ओळख झाली, पण ते सर्व जण पदव्युत्तर शिक्षणाला किंवा पीएचडीला आले असल्याने सर्वाना मी लहानच वाटायची त्यामुळे close group झालाच नाही. पण त्यामुळे सर्व स्वत:चे स्वत: करायला शिकले. त्याचा फायदाच झाला. आणि मी कुठेही एकटी जाऊ शकते, विदेशात फिरू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला.
इथे मी ज्या हॉस्टेलमध्ये राहते तिथे प्रत्येकाला स्वतंत्र रूम आहे, पण किचन मात्र आम्ही आठ जणी मिळून एक आहे. मी या सहा वर्षांत ५०० विविध देशातल्या मुलींसोबत राहिले आहे. प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती, स्वयंपाकाच्या पद्धती आणि स्वच्छतेच्या व्याख्या वेगळ्याच आहेत. सर्व जणी मांसाहारी व मी पक्की शाकाहारी (अगदी अंडंही न खाणारी) त्यामुळे थोडी (खरं तर खूपच) अडचण होते पण मी निभावून नेते आहे. आता मी सोयीनुसार जे असेल ते आणि जेव्हा मिळेल ते (अगदी रात्री १२ नंतरसुद्धा) जेवायला शिकले आहे.
मी Cybernatics and Artificial Intelligence या विषयातच पीएचडी करते. माझ्या संशोधनाचा विषय आहे Brain Computer Interface म्हणजे फक्त विचारांच्या साहाय्याने संगणकाशी संवाद साधणे. ज्या व्यक्तीला पॅरालिसीसमुळे किंवा इतर कारणांमुळे हातापायांची हालचाल करता येत नाही त्यांना या तंत्रामुळे फक्त विचारशक्तीद्वारे संगणक वापरता येईल, कृत्रिम हात हलवता येईल, दैनंदिन वापराची उपकरणे, व्हील चेअर चालवता येतील. अजून हे शास्त्र बाल्यावस्थेतच आहे, पण जगभर यावर संशोधन सुरू आहे. सध्या विद्यापीठात मी BEL (Brain Embodiment Lab) प्रयोगशाळेत विविध देशातल्या सहकाऱ्यांबरोबर (ब्रिटन, चीन, आर्यलड, ग्रीस, पोलंड, नायजेरिया, टर्की, ब्राझील) काम करते आहे. आमचे प्राध्यापकही विविध देशातले आहेत. माझे एक गाइड जपानचे तर दुसरे पोलंडचे आहेत. त्यामुळे Truly Global होण्याचा अनुभव मी येथे घेते आहे.
इथे आल्यावर हवामान बदल, संस्कृती बदल यांना मी लवकरच सरावले व माझा सर्व वेळ विद्यापीठाच्या विविध उपक्रमांवरच केंद्रित केला व त्याच्यातच जास्त रमले. माझ्या पर्यावरणविषयक जाणिवा ज्या माझ्यामध्ये आधीपासूनच होत्या त्या आणखीनच समृद्ध झाल्या. प्रत्येक वर्षी हॉस्टेल बदल व सामान हलवणे यामुळे कमीतकमी सामान ठेवणे आणि उगाचच जास्त सामान वापरून आणि घेऊन निसर्गाचा नाश न करणे हा पर्यावरणपोषक दृष्टिकोन तयार झाला.
विविध देशातील रिसर्च कॉन्फरन्सेसना जाण्याची मिळालेले संधी, लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये BCIचे केलेले प्रात्यक्षिक ज्यात ४००० लोकांसमोर आपला विषय सोप्या भाषेत मांडता आला व पहिल्याच वर्षी स्वतंत्रपणे आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाताना बर्फवृष्टीमुळे तीन दिवस अडकून पडण्याचा अनुभव या सगळ्यामुळे मी एक परिपूर्ण, स्वयंसिद्धा विदेशिनी झाले आहे.
बाहेरच्या देशात शिकत असताना सतत आपण भारताचे प्रतिनिधित्व करतो ही जाणीव असते आणि आपल्या देशाचं नाव चांगलं राखण्याचा प्रयत्न असतो. माझी अशी इच्छा आहे की, भारत म्हणजे फक्त विकसित देशांना तांत्रिक साहाय्यक पुरवणारा किंवा स्वस्तात मनुष्यबळ मिळवून देणारा देश अशी सध्याची ओळख बदलून संशोधनात अग्रेसर असणारा देश अशी नवी ओळख भारताला मिळावी. माझ्याकडून संशोधक होण्यासाठीचे प्रयत्न मी करते आहे. पहिल्यांदाच सर्वासमोर मनोगत व्यक्त करण्याची संधी विदेशिनी सदराद्वारे व्हिवा लोकसत्ताने दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे.
‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे -viva.loksatta@gmail.com
मैत्रेयीच्या संशोधनाचा विषय आहे इ१ं्रल्ल उेस्र्४३ी१ कल्ल३ी१ऋूंी म्हणजे फक्त विचारांच्या साहाय्याने संगणकाशी संवाद साधणे.
– मैत्रेयी वैरागकर, रीडिंग, यूके