‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतात अनेकांना मकर संक्रांत हाच आकाशात पतंग उडवण्याचा काळ वाटतो. पण देशातील सर्वच भागांमध्ये पूर्वी या खेळाला सुरुवात पावसाळ्यापासून होई ती मकर संक्रांतीपर्यंत सुरू राही. ऑगस्ट-सप्टेंबरच्या मध्यामध्ये मुंबई-ठाणे आणि उपनगरांमध्ये गच्ची, मोकळी मैदाने यांमधून पतंग उडविले जात. केबल वाहिन्यांच्या जाळ्यांनी आणि नव्या पिढीने या खेळाला नाकारल्याने आज थोडय़ाच भागात पावसाळ्यापासून पतंग उडवायला सुरूवात होते. मकर संक्रांतीला मात्र आवर्जून पतंगांचा सोहळा साजरा होतो. भारतीय पतंगांना जगभरात ‘इंडियन फायटर’ या नावाने संबोधले जाते. कारण त्याचा आकार तुलनेने लहान असतो आणि काटाकाटीचा पेज लढवण्याइतपत पतंगावर नियंत्रण राखता येणे या पतंगबाज खेळाडूला शक्य असते. यूटय़ूबवर वैयक्तिक छंदांच्या नोंदी अपलोड व्हायला लागल्या तेव्हा सर्वाधिक वाद्यवादनाच्या, नृत्यांच्या होत्या. त्यानंतर खाद्यपदार्थ तयार करण्याच्या आवडीला, घर सजावटीसाठी हस्तकौशल्याच्या वस्तू बनविण्याच्या प्रकारांना व्हिडीओजमधून तयार करण्याची टूम निघाली.
देशोदेशी वर्षभर महाकाय पतंगांचा महोत्सव भरतो. त्यात वापरले जाणारे पतंग आपल्या इंडियन फायटर चौकोनी पतंगांसारखे नसतात. वाटेल त्या आकाराचे आणि प्रकाराचे पतंग बनू शकतात, हे चीन, मलेशिया आणि थायलंडमधील लोकांनी दाखवून दिले आहे. यूटय़ूबवरील व्हिडीओद्वारे आपल्याला हे पतंग, त्यांचा महोत्सव अनुभवता येणे शक्य आहे.
पतंगांचा शोध चीनमध्ये एका शेतकऱ्याने लावला. शेतातील वाऱ्यामुळे त्याच्या डोक्यावरील टोपी हवेत उडाली. त्याला बांधलेल्या दोऱ्यामुळे ती अवकाशात तरंगू लागली. हा खेळ खेळण्याची मग शेतकऱ्यांमध्ये आवड रुजली. शतकांच्या बदलांनी आजच्या आधुनिक पतंगांचा आकार आला. २०१५ साली चित्रित करण्यात आलेल्या एका व्हिडीओतून दुबई इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हलमध्ये जगभरातील पतंगबाज एकत्र आलेले दिसतात. वाघ- सिंह- ड्रॅगन- परग्रहवासी- घोडा- मासा यांच्या महाकाय आकाराचे पतंग यात पाहायला मिळतील. आपल्या भारतीय आकाशात हे पतंग कधीच पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे पतंग उडविण्याची ओळख किंवा स्वारस्य असल्यास हा आकर्षक व्हिडीओ आवर्जून पाहावा.
इंडोनेशियामधील एका आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामध्ये दक्षिण आशियाई देशांतील बहुआकारी पतंगांचा खच दिसतो. हे पतंग इतके महाकाय आहेत की ते उडविण्यासाठी एक माणूस पुरेसा नाही. एका ड्रॅगन आकारी पतंगाचा दोर माणसालाही उचलून घेऊन उडू शकते, हे या व्हिडीओमध्ये दिसते. या व्हिडीओतील पतंगांचे आकार अचंबित करणारे आहेत.
आशियातील पतंगांचे आकार आणि युरोप-दक्षिण अमेरिकेतील पतंगांच्या आकारात भिन्नता आहे. ग्वाटेमाला या देशातील पतंगांना उडवायला पंधरा-वीस माणसे लागतात, इतके ते महाकाय आहेत. ते कोसळले तर एखादा माणूसच जखमी होईल. या पतंगांचा आकार हा अष्टकोनी, वर्तुळाकार पाहायला मिळतो. ऑक्टोपससारखा दिसणारा महाकाय पतंगाचा व्हिडीओ फार लोकप्रिय आहे. एकाच वेळी तीस पतंग उडविणारा चिनी व्हिडीओही पाहायला हवा. केपटाऊनमध्ये झालेला आफ्रिकन काइट फेस्टिव्हलही उत्तम पतंगबाजांसोबत साजरा होतो. हे पतंग पाहिले तर आपण आपल्या देशात पाहतो ते पतंगवेड आणि पतंगबाजी फिकी वाटायला लागेल. देशोदेशीचे पतंग बनविणारे आणि पतंग उडविणारे यात सहभागी झालेले असतात.
मलेशियाचे राष्ट्रीय प्रतीक असलेले विचित्र आकाराचे पतंग बनविणाऱ्या एका व्यक्तीची मुलाखत यूटय़ूबवर पाहायला मिळू शकते. गंमत म्हणजे तेथेही या पारंपरिक खेळाचा ऱ्हास होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
तीन-तीन महिने राबून अत्यंत बारीक कलाकुसर करून तयार केल्या जाणाऱ्या या पतंगांची रचना आकाश जिंकून घेताना दिसते. फायटर काइट्सद्वारे पतंगांचे पेज लढविण्याचा आणि काटाकाटी करण्याचा प्रकार भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्येच दिसतो. इतर ठिकाणी आकाशात स्थिर ठेवले जाणारे पतंगच उडविले जातात. जपानच्या रोकाकू काइट्स या भारतीय पतंगांसारख्याच असतात. पण त्यांचा आकार वेगळा असतो. रोकाकू काइट्स बनविण्याच्या पद्धतीही यूटय़ूबवर आहेत. आपल्या घरातील प्लास्टिक पेपर आणि झाडूच्या काठय़ांनीही हे पतंग बनविता येतात.
पतंग बनविण्यात, त्याची कण्णी बांधण्यात आणि त्या सुरळीतपणे आकाशात उडवण्याचे एक विज्ञान आहे. ज्याला ते कळते, तो उत्तम पतंगबाज बनू शकतो. खेळांतील अनेक कलाबाज्या नष्ट होण्याच्या आजच्या युगात पतंग का उडवायचे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ही कला किती कलात्मक संकल्पना तयार करू शकते, हे अजमावून पाहायचे असेल तर हे व्हिडीओ अनुभवणे आवश्यक आहे.
https://www.youtube.com/watch?v=sk13OFVSQh0
https://www.youtube.com/watch?v=hbpbLTnryjg
https://www.youtube.com/watch?v=XA0koGe9BfU
https://www.youtube.com/watch?v=Qr9FhpLUgD8https://www.youtube.com/watch?v=MpNfEtXo6nM
https://www.youtube.com/watch?v=X_zN-iYhu-0
https://www.youtube.com/watch?v=JFHLeGYdYiE
https://www.youtube.com/watch?v=rPnqshqy6mc
https://www.youtube.com/watch?v=eoMPhOO6lgE
viva@expressindia.com