गुन्हे, आरोप, खटले, भारतीय दंड संहितेची कलमं, क्रूरता, विकृती याऐवजी चित्र, कलर्स, ब्रश, कॅनव्हास शब्द येणं म्हणजे मोठाच बदल. कोणी घडवला हा बदल? सविस्तर वाचा.
पोकळ गप्पांदरम्यान सभोवतालातले अनेकजण शूर शिपाई असल्याचा आव आणतात. पण बिल्डिंगमध्ये, नाक्यावर, परिसरात पोलिसांची गाडी दिसली की याच साहसवीरांची भंबेरी उडते. काहीही गुन्हा केला नसला तरी उगाचच मनात धडधड होते. त्यातही पोलिसांनी अमुकतमुकला जेलमध्ये टाकला असं ऐकल्यावर तर मोराल (बऱ्या मराठीत यालाच मनोधैर्य म्हणतात) एकदमच खाली येतं. बॉलीवूडी चित्रपटांचा परिणामांचा भाग म्हणून पोलीस आणि जेल या दोन गोष्टींबद्दल आपल्या मनात कर्मठ अशी प्रतिमा कोरलेली असते. काही सन्माननीय अपवाद सोडले तर ही प्रतिमा मोडण्याची उदाहरणंही दुर्मीळ. आपल्यापासून दूर राजधानी दिल्लीत जेलमध्ये अनोखा प्रयोग अंगीकारण्यात आला आहे. तुम्ही म्हणाल दिल्लीत (पॉलिटिकल-अपॉलिटिकल) बाकीही बरंच काही चाललंय, ते सोडून जेलचं कुठे घेऊन बसलात. कसं आहे- मूर्खपणा सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते, काहीजण त्यातही घाई करतात. आम्ही अशा प्रकारांपासून ‘सुरक्षित अंतरा’वर असतो. जागा मग ते स्वत:चे घर असो की पेपरातले तीन कॉलमरूपी रकाने असोत- सत्त्वशील गोष्टी मांडाव्यात असा आमचा आग्रह. मुद्दा भरकटला. चॅच अर्थात चॅनेलीय चर्चा पाहिल्या ना की, असं होतं.
आयुष्यात जेल शब्द कानी पडल्यानंतर ‘तिहार’ हेच नाव तुमच्या मुखी येतं. महाभयंकर गुन्हे करणाऱ्या दोषींसाठीची जागा. गुन्हे वाढत आहेत, गुन्हेगार वाढत आहेत आणि गुन्हे करण्यातली विकृतता दिवसेंदिवस नीचांकी पातळी गाठत आहे. यामुळेच तिहार जेलमध्ये दहा हजारहून अधिक कैदी कोंबलेत. या जेलवरचा वर्कलोड कमी करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी दिल्ली सरकारने एका स्वतंत्र जेलची शिफारस केली. पूर्व दिल्लीतल्या मंडोली परिसरात जागा मुक्रर करण्यात आली. लाल फितीचे सोपस्कार पूर्ण होऊन जेल ऑपरेटिव्ह व्हायला २०१६ साल उजाडलं. इतकी र्वष का लागली यावर तुम्ही स्वतंत्र लेख लिहून आम्हाला पाठवू शकता. तर दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेनजीक आणि मेट्रोच्या रेड लाइनवरील दिलशाद गार्डन्स स्टेशनजवळ तब्बल ६८ एकर परिसरात मंडोली जेल उभारण्यात आलं आहे. ३७७७ कैद्यांना सामावून घेण्याची या जेलची क्षमता आहे. जेल म्हटल्यावर रुक्ष, सरकारी खाक्या धारण केलेली ठोकळेबाज इमारत तुम्ही कल्पिली असेल. तिहार जेलमधून मंडोली जेलमध्ये स्थानांतरित करण्यात आलेल्या कैद्यांनाही असंच वाटलं होतं. पण जे पाहिलं ते वेगळंच होतं. जेल कसलं एखादी आर्ट गॅलरी वाटावी असं चित्र समोर आलं. जेल टू जेलऐवजी आपल्याला मुक्त केलं की काय असंही वाटलं अनेकांना. कैद्यांच्या हातून चूक घडलेली आहे, त्यासाठी ते शिक्षा भोगत आहेत. मात्र माणूस म्हणून सुधारण्याची त्यांना संधी आहे. एका चुकीने त्यांचं अख्खं आयुष्य बरबाद व्हायला नको. ते कमबॅक करू शकतात या दृष्टीने दिल्ली स्ट्रीट आर्ट आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे भन्नाट प्रयोग राबवण्यात आला. हा परिसर जेल वाटणारच नाही अशा रचनेसंदर्भात दिल्ली प्रिझन्सचे डायरेक्टर जनरल सुधीर यादव आणि दिल्ली स्ट्रीट आर्ट संस्थेचा चमू यांच्यात चर्चा झाली. आदिवासी कलाशैली विशेषत: मधुबनी रेखाटन पक्कं करण्यात आले. मात्र सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड होणार नाही आणि बाहेरच्या माणसाला आत प्रवेश करण्यासाठी कठोर चेकिंगला सामोरं जावं लागेल हे यादव यांनी स्पष्ट केलं. उत्तम चित्रकला असणाऱ्या काही कैद्यांना या कामात सामावून घ्यावं अशी सूचनाही यादव यांनी केली. कृती आराखडा ठरला आणि मंडळी कामाला लागली. जेलचे प्रचंड दरवाजे, कँटीन, एनजीओचं ऑफिस, अंतर्गत बिल्डिंग सजू लागल्या. १४ क्रमाकांच्या गेटवर मोराचं चित्र आहे. आतमध्ये एका भिंतीवर हरणं आणि काळविटांचं अप्रतिम चित्र कैद्यांनीच रेखाटलं आहे. एका मोठय़ा भिंतीवर अजानबाहू वृक्ष चितारण्यात आला आहे. हिरवा, निळा, पिवळा, लाल, राखाडी, केशरी अशा बहुविध रंगाची मुक्त उधळण भिंतीरूपी कॅनव्हासने अनुभवली.
जेलमध्ये आला की माणूस बिघडतो असं होण्याऐवजी शिक्षा भोगून नवं आयुष्य सुरू करायला प्रेरणा मिळावी यासाठी हा खटाटोप करण्यात आला. देशातलं सर्वोत्तम जेल म्हणून मंडोली जेलची नोंद व्हावी अशी यादवजींची मनीषा आहे. सार्वजनिक ठिकाणी परवानगी घेऊन चित्र रेखाटण्याचं काम करणारी स्ट्रीट आर्ट इंडिया ही एनजीओ आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी त्यांचे प्रयोग सुरू असतात. कैदी आणि जेल म्हटल्यावर दडपण होतं पण कैद्यांचा उत्साह व कौशल्य आणि पोलीस विभागाचे सहकार्य यामुळे हे काम कधी झालं कळलंच नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यां मंडळींनी नोंदवली आहे. जेल वाढवावी लागणं आपल्या अधोगतीचं लक्षण आहे. जेलमधल्या कैद्यांचं आयुष्य सुधारावं यासाठी असंख्य चांगले उपक्रम महाराष्ट्रातल्या जेलमध्येही नियमितपणे राबवण्यात येतात. मात्र जेलमध्ये कुख्यात गुन्हेगारांच्या मारामाऱ्या, सिमकार्डापासून विडीकाडीपर्यंत मिळणाऱ्या सोयीसुविधा, निकृष्ट दर्जाचं अन्न अशा बातम्यांपुढे त्या झाकोळल्या जातात. म्हणूनच लिस्टमध्ये ‘लो प्रोफाइल’ असूनही आम्ही हाच विषय निवडला.
viva@expressindia.com