‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
इमोगन हीप नावाची एक ब्रिटिश गायिका आहे. अल्बममधूनदेखील तिची गाणी जगप्रसिद्ध झाली, ती तिच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या प्रयोगाने. तिने आपल्या गाण्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा सुरेख मेळ घातला असला, तरी तिला वाजविता येणाऱ्या खऱ्याखुऱ्या वाद्यांची संख्या प्रचंड आहे. आपल्या बहुतांश गाण्यांमध्ये ती या वाद्यांचा स्वत: वापर करून चमत्कारिक ध्वनी निर्माण करते. एका व्हिडीओतून तिच्या सुंदर गाण्यांऐवजी तिच्यात असलेल्या वाद्यवादनातील कौशल्यांवर समजून घेताना ‘मल्टिटास्किंग’ या संकल्पनेचा नव्याने विचार करावा लागतो. एकाच क्षणामध्ये बहुविध आघाडय़ांवर लढणाऱ्या व्यक्तींच्या कौशल्याबाबत कायमच सर्व कंपन्या आणि आस्थापनांना आस्था असते. आपल्या कर्मचाऱ्याने बहुप्रसवा असावे, ही कोणत्याही संस्थेची महत्त्वाची अपेक्षा असते. बहुआघाडय़ांवर लढून कामांचा निपटारा करणाऱ्या व्यक्तींविषयी नेहमीच कौतुकाने बोलले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून मल्टिटास्किंगऐवजी मोनोटास्किंग हा उत्पादन वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचा निर्वाळा विविध अभ्यासकांकडून दिला जात आहे. टेड टॉकपासून ते विविध निबंधांमध्ये मल्टिटास्किंग व्यक्तीच्या मेंदूसाठी कसे हानीकारक यासोबत त्यांच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह घेण्यात आला आहे. या विषयीचे सप्रमाण व्हिडीओ पाहायचे ते नाण्याची एक बाजू समजून घेण्यासाठी. दुसरी बाजू ही अर्थात मल्टिटास्किंग यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींची.
कॅमेरासंपन्न मोबाइल आल्यानंतर जे जे हटके, ते ते कॅमेरात साठवायची हौस असलेल्या नागरिकांनी यू-टय़ूब खूप समृद्ध झाले आहे. ‘जो जे वांछील ते’ लाभणारे सध्याचे ते एकमेव ठिकाण आहे. जगभरातील सामान्य व्यक्ती, जे निव्वळ आपले काम आपल्या पूर्ण क्षमतेने करतात त्यांचे व्हिडीओज आज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आदर्श वस्तुपाठ म्हणून ठेवत आहेत. अनेक पट्टीचे संगीतकार १० ते २० वाद्यांना लीलया हाताळू शकतात. जुझी स्मिथ नावाची ही एकटी व्यक्ती संगीतसमूहाचे काम करताना एका व्हिडीओत दिसेल. हा कुणी नाणावलेला कलावंत नाही. ऑस्ट्रेलियामधील एक ‘स्ट्रीट आर्टिस्ट’ आहे. पण सध्याच्या चकमकीत संगीत पॉप कलाकारांहून मणभर वादनकौशल्य अधिक असलेला एकल संगीतकार आहे. हवाइयन गिटारपासून, माउथ ऑर्गन-सिंथेसायझर आणि इतर फुंकवाद्यांनी त्याने केलेले संगीत निव्वळ अचंबित करून जाते. इतक्या वेगवेगळ्या वाद्यांचा एकत्रित लाइव्ह परफॉर्मन्स अनेकदा पाहावा लागेल, इतके सारे त्याचे व्हिडीओ लोकप्रिय आहेत.
भारतात २० वर्षांपूर्वी जेव्हा चिनी खाद्यपदार्थाचे स्टॉल्स रस्त्यावर लागायला लागले, तेव्हा त्यातील स्वादाइतकेच लोकांना खानसाम्याच्या ते बनवायच्या वेगाचे कुतूहल होते. अर्थात भारतीय चिनी पदार्थ हे मूळ चिनी पदार्थासारखे नसले, तरी मूळ चिनी खाद्यपदार्थ किती वेगात बनविले जातात, हे दाखविणारा एक व्हिडीओ थक्क करणारा आहे. चिनी गाण्यासह या व्हिडीओतील बल्लवाचार्य एका वेळी किती कढयांवर काम करीत आहे, हे मोजणे अवघड आहे. वर्तुळाच्या कडय़ांमध्ये सुरू असलेल्या या स्वयंपाक कौशल्याला ‘किंग ऑफ वर्क’ का म्हटले आहे, हे लक्षात येईल.
आपले काम अतिवेगाने करतानाही सुरळीत कसे राहील याबाबत दक्ष असणाऱ्या व्हिडीओजची यू-टय़ूबवर कमतरता नाही. ठरवले तर माणूस काय करू शकतो, याची छोटी छोटी झलक एकत्रित करणारा एक व्हिडीओ खासच पाहावा असा आहे. या वर्षांत त्या मालिकेमध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. रुमाली रोटी किती कौशल्याने फिरविता येऊ शकेल, याचा अशक्य वाटणाऱ्या करामतींपासून विविध कंपन्यांमधील कर्मचारी सेकंदाचा छान वापर करून आपली उत्पादनक्षमता कशा पद्धतीने वाढवितात, याचे सप्रमाण दर्शन होईल. आपल्या देशातीलच दाबेली विक्रेत्याचा एक विद्युतवेगी अवतार दाखविणारा व्हिडीओ खूप लोकप्रिय आहे. त्याच्या दाबेली करण्यातील कौशल्याला आणि वेगाला सेकंदांच्या तुलनेत पकडताना, हे चित्रीकरण मुद्दाम वेगात केले गेले नाही ना, असा प्रश्न पडतो.
मल्टिटास्किंग उत्पादनक्षमतेवर कोणता परिणाम करतो याच्या फंदात न पडता, आपल्या प्रत्येकाकडे कोणत्याही गोष्टीमधील कार्यक्षमता वाढविण्याची शक्ती अंतर्भूत आहे, हे दाखवून देणारे हे व्हिडीओ आहेत. कुठलेही काम आनंदाने करणाऱ्याला त्याचे कौतुक वाटेल असे नाही, पण कामात आनंदही असतो, याचे दर्शन ते देतील. अन्यथा हे व्हिडीओ नुसते पाहताना आनंदच मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=fQ-24-5x0l8
https://www.youtube.com/watch?v=4J23ysR3jXc
https://www.youtube.com/watch?v=VBBO3787mxo
https://www.youtube.com/watch?v=HKHrlArVIoo
https://www.youtube.com/watch?v=4mq31MPeqt0
https://www.youtube.com/watch?v=Dd6cWw9_kfM
viva@expressindia.com