‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अस्सल भारतीय नृत्य हे शास्त्रीय संगीतासारखेच पुस्तकी, बांधीव मानले जाते. चित्रपट संगीताने जसे शास्त्रीय गानकौशल्य बिघडविले, तसेच चित्रपटीय नृत्याने देखील शास्त्राला फाटे फोडून नृत्य गंमतीजंमती केल्याचे दिसून येते. शम्मी कपूर या अवलीया कलाकाराने अंग थरकापीची जी अदाकारी हिंदी चित्रपटात आणून सोडली, त्यातून १९६०च्या दशकांत नृत्यबंडखोरीचे वारे वाहू लागले. रॉक अॅण्ड रोल या संकल्पनेला फार गांभीर्याने घेत हिंदी चित्रपटांमध्ये नृत्यविशारद नायक-नायिका तयार झाल्या. काही चित्रपटांमध्ये शास्त्रीय नृत्याला वाव दिला गेला असला, तरी बहुतांश वेळा अशास्त्रीय नृत्यांचीच गाणी लोकप्रिय झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. ‘डिस्को डान्सर’ नामे चित्रपटातील मिथुनजी चक्रवर्ती यांच्या नवनृत्य आविष्कारानंतर ‘स्ट्रीट डान्सर’ हा गोविंदाचा चित्रपट भारतीय तरुणाईला आपल्या दिवाणखान्यात करायच्या नृत्याचे धडे देणारा होता. मायकेल जॅक्सनचे विडंबन करीत असल्यासारखे हे नर्तन नंतर चित्रपटाचा अविभाज्य भाग झाले. ड्रम्स हे बडविण्यासाठी आणि गिटार ही वेगात वाजविण्यासाठीच निर्माण झाल्यासारखी संगीत रचना असलेली गाणी हीट होऊ लागली आणि वय वर्षे पाच ते २१ या शिक्षण संस्थांमधील वास्तव्यात पोरा-पोरींची गॅदरिंग्ज या गाण्यांवर लोकप्रिय ठरू लागली. पूर्वी गाणी रेकॉर्ड करण्यात मर्यादा असे. आता गॅदरिंगचे व्हिडीओ थेट यू टय़ुबवर पोहोचविण्याची टूम सुरू झाली आहे. आई-वडील, मित्र-मैत्रीण-नातेवाईक यांच्या हौसेतून हे व्हिडीओ तयार करून यू टय़ुबवर टाकले जातात. त्यातली उत्तम व्हिडीओज लोकप्रिय होतात. अशा लोकप्रिय व्हिडीओजमध्ये कुण्या एका कॉलेजमधील मुलींनी केलेले ‘बेबी डॉल मे सोने की’ हे गाणे सर्वाधिक पाहिले गेलेले आहे. यात चार तरुणींनी ‘आपले शरीर लवचिक किती’ याची स्पर्धा लावलेली दिसते. प्रत्येकाची वेशभूषा वेगळी, नृत्यअदा वेगळी आणि सर्वात म्हणजे गाण्यातील आशय मांडण्याची पद्धत वेगळी. मूळ नृत्यावरही इतकी मेहनत घेतली नसावी, हे या नृत्यात चौघींनी चार प्रकारांनी दाखवून दिले आहे. आता कुणाला या गाण्याच्या आशयाशी घेणे-देणे असल्यास पाहू नका, पण या सोन्याहून मूल्यवान असलेल्या नृत्यांगनांनी बाहुलीनृत्य करण्यासाठी प्राणांची बाजी लावली आहे. दुसरे गाणे ओदिशातील कॉलेजमधील मुलांनी नॉनस्टॉप बॉलीवूड गाण्यांवर केले आहे. एकलनृत्यापासून समूहनृत्यापर्यंत जाणारा हा कॉलेजच्या आवारातील रंगीत तालिमीतला भाग असावा. कॅमेराकर्त्यांच्या अँगलमधून या व्हिडीओमध्ये जितके दाखवायचे तेवढेच नृत्यकर्ते दिसतात. पण त्यांचे अचूकपण आणि नृत्यातील धाडसी पवित्रा पाहून थक्क व्हायला होते. सगळीच गाणी खूप लोकप्रिय आहेत. नृत्याचा समूह झाल्यानंतर हौशी मोबाइल कॅमेरामनही या व्हिडीओमध्ये चित्रित झाले आहेत. लखनौमधील एका कॉलेज आवारामध्ये ‘इश्कवाला लव्ह’ या गाण्यावर युगलनृत्य सादर करणारी नर्तकजोडी कॉलेजमध्ये किती लोकप्रिय आहे, हे दर्शविणारा एक नृत्य व्हिडीओ पाहायला मिळतो. नायक-नायिकांचे नृत्य आपल्या तरुणाईच्या डोक्यात कितीतरी फिट्ट बसलेले असते. या युगलाने छानपैकी या गाण्यावर स्वत:च्या काही अप्रतिम स्टेप्स तयार केल्या आहेत. सराईत नृत्यकर्त्यांसारखे त्यांचे कॉलेज आवारातील हे नृत्य लक्षवेधी आहे. त्यांना मिळणारा संयमी आणि शिस्तखोर प्रतिसादही आवडून जाणारा आहे.
भारतीय तरुणाईची मानसिकता कोणत्याही उडत्या चालींच्या गाण्यावर लुब्ध होते.
ठिकाणाचा उल्लेख नसलेल्या अरोरा नावाच्या कॉलेजमधील मुलांनी केलेला नृत्यपिरॅमिडी देखावाही पाहणीय आहे. अनेक लोकप्रिय डान्स नंबर्सना एकत्र करणारा हा परफॉर्मन्स नृत्य आणि क्रीडापटूंच्या सीमेवरचा आहे. पण त्या सर्वानी एकत्रित दाखविलेला नृत्यफुलोरा डोळे दिपवून सोडणारा आहे. कालिकतमधील एका कॉलेजमधील जॉन डॅनिअल नावाच्या मुलाने नृत्यस्पर्धा पटकावून टाकणारा परफॉर्मन्स कुणीतरी चित्रबद्ध करून यू टय़ुबवर टाकला आहे. रबराचे शरीर असल्यासारखे अतिकुशल नृत्य या मुलाने सादर केले आहे. त्याच्या प्रत्येक पदन्याला विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि परीक्षकांनी दाद दिली आहे. जिंकण्याच्या हेतूनेच परीक्षकांच्या जवळ जावून आपल्या कलेचे नाणे वाजविणारे हे पोर तल्लीनतेचे शास्त्र शिकून आल्यासारखे वाटते.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये असलेली कमालीची ऊर्जा त्यांना कमी साधनांमध्ये खूप काही घडविण्याची जिद्द मिळवून देते. देशी आणि परदेशी नृत्यांचा संकर घडवून एका वेगळ्याच दर्शनीय नृत्याचा जन्म दररोज घडत आहे. या सोन्याच्या बाहुल्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या आणखी लखलखतील, यात शंकाच नाही.
- https://www.youtube.com/watch?v=sgMg6QFRFsU
- https://www.youtube.com/watch?v=WtdCqyDtUC0
- https://www.youtube.com/watch?v=M2Rp8DUsaGA
- https://www.youtube.com/watch?v=DTcycNNgS2Q
viva@expressindia.com