लग्नाचा सीझन, सणवार लवकरच एकापाठोपाठ एक दारात उभे असताना नव्या, आधुनिक आणि त्याचबरोबरीने पारंपरिक दागिन्यांचा लुक ठेवण्याचा यंदाचा तरुणींचा जमाना आहे. त्याच हिशोबाने तरुणींचे आवडते इअरिंग या ट्रेण्डमधून वजा कसे होतील? प्लॅटिनम, मोती, मणी, सिल्व्हर, गोल्ड आणि मेटल या प्रकारच्या विविध इअरिंग्जचा ट्रेण्ड सध्या परदेशातील तसेच भारतीय ब्रँड्सनी आणला आहे. इअरिंग्जच्या आकारांपासून डिझाइनपर्यंत भरपूर विविधता तुम्हाला यात पाहायला मिळेल. तुमच्या मॉडर्न व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा लुक मिळवण्यासाठी या नव्या ट्रेण्डी पर्यायांवर नजर टाकू यात..
* चेनच्या डिझाईनचे इअरिंग गोल्ड आणि मेटलमध्ये उपलब्ध आहेत. हे इअरिंग ट्रॅडिशनल गाऊ नवर किंवा अगदी नेट किंवा सिल्क साडीवर शोभून दिसतील.
* स्पायरल आणि मल्टिकव्र्हमध्ये प्लॅटिनम आणि मेटॅलिकल इअरिंग्जचा समावेश आहे. जो नाजूक जरी असला तरी त्याचा क्वर्की लुक ट्रॅडिशनल आणि मॉडर्न वेअरवर अॅप्लिकेबल आहे.
* इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा लुक यंदा दागिन्यांमध्ये उतरला आहे; किंबहुना इअरिंग्जमध्ये तो जास्त दिसून येतोय. चेहऱ्यावरच्या मुद्रांचा उपयोग कानातल्यांच्या डिझाइनसाठी करण्यात आला आहे. जो भलताच लोकप्रिय ठरला आहे.
* लांब उंचीच्या कानातल्यांपासून रुंद गोलाकार इअरिंग ट्रेण्डमध्ये आहेत. अगदी साधा सिंपल लुक हवा असेल तर न्यूड कलरच्या ट्रॅडिशनल वेअरमध्ये या कानातल्यांचा उपयोग तुम्ही करू शकता.
* त्याचबरोबरीने फ्लोरल डिझाइन, मण्यांपासून नव्या कोरीव कामासह डय़ूएल कलरमध्येही इअरिंग्ज आहेत. तसेच टस्सेल असलेले इअरिंग्जही ट्रेण्डमध्ये आहेत.