गायत्री हसबनीस

विविध पद्धतीने नाकावरील देखण्या रूपासाठी नोझ रिंग, नथ, नथिया यांना खूप महत्त्व आहे. लग्नात नवरीमुलीसाठी टिपिकल मराठी नथीची परंपरा तर खूप जुनी आहे. गुजरातच्या पट्टीवरील वस्तीकडे कुंदन नथीचे बरेच प्रकार लग्नात व नवरात्रीत वापरतात. राजस्थान, वडोदरा व सुरतकडच्या टिपिकल पारंपरिक नोझ रिंगही आपल्याला आवडतात. पण सध्या या पारंपरिक नोझ रिंगसोबत सणासुदीतही मॉडर्न पियर्सिग करायला मुलींना आवडतं. मुलींप्रमाणे मुलंही सणासुदीला, लग्नात किंवा एरवीही फॅशन म्हणून पियर्सिग करतातच. यंदाच्या फेस्टिवल सीझनमध्ये काही ट्रेण्डी नोझ रिंग पारंपरिक तसेच मॉडर्न लुकसह बाजारात आहेत.

Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Australia announce 15 members squad for Champions Trophy 2025 Pat Cummins as a Captain
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू करणार नेतृत्त्व
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Makar Rashi Bhavishya 2025 in Marathi
Capricorn Yearly Horoscope 2025: मकर राशीला वर्षभर गुरुची साथ! धनलाभासह शिक्षण, नोकरीत होतील मोठे बदल; सोनल चितळेंनी सांगितले १२ महिन्यांचे भविष्य
Indian cricket team to play warm up match in Dubai ahead of Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
Royal Enfield Himalayan 750 Launch Soon In India, Check Price & Specification Details
रॉयल एनफिल्डचा मोठा धमाका! पहिली 750 cc इंजिन बाईक लवकरच इंडियन मार्केटमध्ये करणार एन्ट्री; पाहा जबरदस्त फीचर्स

१. नोझ रिंगच्या साईजमध्ये ६, ८ आणि १० एमएमपर्यंत मापाच्या मिळतील. नाकाच्या एकाच साईडला किंवा मधोमध अशी फॅशन मिरवता येते म्हणून शेपिंगवर जास्त भर दिलेल्या नोझ रिंग चांगल्या वाटतील. प्रत्येकाच्या नाकाचा आकार हा वेगळा असतो. त्यामुळे आपल्या सोयीनुसार नोझ बोन, नोस्ट्रिल स्क्रू, एल शेप नोझ पिन, नोझ हूप, सक्र्युलर बार्बेल, बेड रिंग हे काही महत्त्वाचे शेप लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे बाजारात किंवा ई-कॉमर्स वेबसाईटवरून या शेप्सद्वारे आपल्या नाकाला शोभतील त्यावरूनच नोझ रिंगची निवड करावी. ज्यांना नाकाच्या मधोमध नोझ रिंग ठेवायला आवडते त्यांना तशी ठेवायला काहीच हरकत नाही. पण त्या भागाचीही विशेष काळजी घ्यावी यात हॉर्सशू या शेपचा विचार करावा. कारण यात तुम्हाला बऱ्याच डिझायनर नोझ रिंग मिळतील व त्याच्या शेपमुळे नाकाच्या भागाला जास्त दुखापतही होत नाही. ही माहिती ई-कॉमर्स वेबसाईटवर वर्णनामध्ये दिलेली असते ती वाचून घेऊनच खरेदी करावी.

२.यंदा ऑक्सिडाईज नोझ रिंग्सचा ट्रेण्ड उतरलाय. ज्यात क्यूबिक नोझ रिंग पाहायला मिळतील. त्यातही विविध देवदेवतांच्या, ग्रह-ताऱ्यांच्या, फुलांच्या, प्राण्यांच्या आकाराची डिझाईनींग असलेली कलाकुसर दिसेल आणि त्यातून ऑक्सिडाईज नोझ रिंग्स बऱ्यापैंकी स्वस्त आहेत. अ‍ॅमेझॉनवर गेलात तर १७५ रुपयांपासून त्यांची सुरुवात आहे, ज्यात गोलकार शेपच्या नोझ रिंग आणि सिंगल राऊंड असलेल्या ऑक्सिडाईज आणि तारेच्या नोझ रिंग मिळतील. २४६, २४९, ३९९, ३५० रुपयांपर्यंत तुम्हाला सिल्व्हर फिनिशिंग असलेल्या ऑक्सिडाईज नोझ रिंग्सही आरामात मिळतील.

३. नोझ पिनवर तर ई-मार्केटमध्ये ६०% सूट आहे. गोल्ड, स्टर्लिंग सिल्व्हर, निकेल, व्हाईट स्टोन, मेटल यांपासून बनवलेल्या नोझ रिंग २१०, १८९, ४३५ रुपये या किंमतीमध्ये मिळतील. या नोझ रिंग १ ग्रॅमच्या आहेत. त्यामुळे अतिजडही वाटणार नाहीत. डायमंड नोझ पिनही तनीश्कने आणलीय. ६,००० – १२,००० या रेन्जमध्ये आहेत. पारंपरिक पेहेरावावर जसे की शरारा, चन्याचोली, घागरा, लेहेंगा, साडी इत्यादींवर उठून दिसतील. प्लॅटिनम नोझ रिंग्सही उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत ९६० रुपयांपासून आहे. पण यंदा प्लॅटिनम नोझ रिंग्सना वाव नाहीये. पण ज्यांना इच्छा आहे, त्यांनी मल्टिपियर्सींग करताना तारेच्या नोझ रिंगऐवजी एकच मोठय़ा साईजची प्लॅटिनम नोझ रिंग वापरू शकता. ज्यात विविध कलर आहेत. मल्टिपियर्सिंग करताना तारेच्या एकाच रंगाचा विचार होतो. पण एकाच रंगाची प्लॅटिनम नोझ रिंग घेतली तर विविध रंगाचे ऑप्शन मिळतील.

४. नथ, नथियामध्येही ऑनलाईनवर खूप बोलबाला आहे. क्राफ्ट्सविलाने काही विशेष या लग्नसभारंभ व सणासुदीला मार्केटमध्ये विविध डिझायनर नथिया व नथ आणल्यात. ५६० ते १,०९९ रुपयांच्या दरात नथिया क्राफ्ट्सविलावर उपलब्ध आहेत. ८००, ९००, १,३८० रुपयांपर्यंत नथ क्राफ्ट्सविलावर उपलब्ध आहेत.

अजियो.कॉमवर नथियावर ५०% ऑफ आहे. अर्थात कुंदनवर त्यांचा भर आहे. १,८५० रुपयांची सुरुवात आहे. गोल्डला जास्त महत्त्व अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टने दिलंय, तिथे २५०, ४६०, ३७७, २७५ रुपयांपर्यंत किंमत आहे.

५. स्टेनलेस स्टीलच्या नोझ रिंगही ४००, ५५०, ८५६ रुपयांपर्यंत आहेत. ज्यांत मल्टिकलर मिळतील. युनिसेक्स नोझ रिंग्सही ट्रेण्डमध्ये आहेत. कारण हल्ली मुलंही सणावाराला नोझ रिंगचा विचार करतात. ३४०, ५६७, ५४३, ५४२, १,२९९ पर्यंत युनिसेक्स नोझ रिंग मिळतील. ज्यात स्टेनलेस स्टीलला महत्त्व देण्यात आलंय. यात दोन नोझ रिंगचे पीस सुद्धा आहेत म्हणजे सिमिलर कलरच्या मल्टि नोझ रिंग कूल वाटतील.

६. स्टार, हार्ट शेपपासून ते त्रिकोणी, गोलकार वरून स्नेक शेपपर्यंत विविधता नोझ रिंगमध्ये आहे. नोझ स्टडमध्ये स्पायडर शेप, लिझर्ड शेपही आहेत. ट्रायबल नोझ रिंगमध्ये हॅन्डमेड वायर, कॉपर आणि सिल्व्हरचा वापर केलाय. फिश बोन, ह्य़ूमन स्कल, बॅट फर असे विचित्र पण आकर्षक डिझाइनमध्ये नोझ स्टड आहेत. हॅलोवीनला असं काहीतरी ट्राय करण्यासारखं आहे. या सर्व नोझ रिंग व स्टड हाताने बनवल्या असल्याने हजार रुपयांवर त्यांची किंमत आहे.

७. डबल लेयरिंग नोझ रिंगची यंदा फॅशन जोरदार आहे. ५६०, ४३९, ३४५, ३७० रुपये या दरात त्या मिळतील. जेणेकरून यात तुम्हाला हुप्समध्ये विविधता दिसेल. कारण क्रोस कलर, सेमिसाईज, ऑल्टरनेट डिझाइनमध्ये नोझ हूप आहेत. स्क्रूमध्येही फेदर डिझाइन ट्रेण्डी आहे.

Story img Loader