प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! या पाक्षिक सदरातून शेफ वरुण नव्या-जुन्या चॉकलेटी दुनियेची सैर घडवतात. नट्स आणि चॉकलेटच्या भन्नाट कॉम्बिनेशनबद्दल आणि ‘नटी’ चॉकलेटच्या देशी-विदेशी चवींबद्दल आजच्या लेखात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द चॉकलेट क्रिटिक

चवढव, चिमुरडय़ांना कळते का? प्रश्न बाका आहे. पण माझ्यावरून सांगतो. बालपणी चवच माहीत असते! बाकी सारं झूठ! मला आठवतंय. माझी आजी मागे लागायची. बदाम खा, काजू खा, अक्रोड खा!! तिचं समाधान इतकंच की मी ते आज्ञाधारी मुलासारखा खायचो. पण तिचा उद्देश कसदारपणासाठी, आरोग्यासाठी आणि माझा चवदारपणासाठी. तर नमनालाच घडाभर तेल कशासाठी? ‘नट्स’ हा या वेळचा विषय आहे. तर आजी म्हणायची, हे खाल्लंस तर धट्टाकट्टा होशील. आरोग्यवान होशील.
हे ऐकत ऐकतच, मी चवीच्या ओढीनं ‘नट्स’ खात मोठा झालो. पुढे मी पाकशास्त्रात पारंगत झाल्यानंतर या ‘त्रिमूर्ती’मधील म्हणजे बदाम, काजू आणि अक्रोडमधील पोषणतत्त्वांनी काठोकाठ भरलेली खाण सापडली. या साऱ्या ‘नट्स’चा कशात तरी संगम झाला, तर जिभेवर चवीची गंगाच अवतरते. चॉकलेटमधली ती मेव्याची चव म्हणजे गंगाच. या गंगेचा उगम प्रथम त्या पश्चिमेला म्हणजे पाश्चिमात्य देशात झाला; पण ती आज भारतीय खवय्यांच्या जिभेवर खळाळत आहे. म्हणजे नट्स चॉकलेटचे अनेक ब्रँड येथे उपलब्ध आहेत.
कॅडबरी ‘नटीज’ हे त्यातील पहिलं नाव. लाल खोक्यातील चॉटलेट आणि दुधाच्या घट्ट आवरणात लपलेले ते काजू, बदाम, अक्रोड आजही आठवतात. मनावर भूतकाळाचे आवरण चढते. आजकाल या नटीजचं उत्पादन काहीसं कमी झालंय. पण कॅडबरी सेलिब्रेशनच्या मोठाल्या पॅकेजमध्ये हे तिघे मित्र पाहायला मिळतात. चव ही नर्तिका आहे. तिच्या नर्तनात जसजशी ती पदन्यास बदलते, तसे चॉकलेटिअर चॉकलेट बनवण्याचा ताल बदलतात. मग नट्ससोबत फ्रुट्स येतात. यात बदाम आणि सुकलेल्या द्राक्षांचा (मनुका-बेदाणे आदी) मिलाफ असतो. आता हा चॉकलेटचा सर्वात मखमली अवतार. म्हणजे ते तोंडात टाकावं आणि काही क्षणात विरघळून त्यानं चवीसाठी लवलवणाऱ्या जिव्हेला परमोच्च आनंद द्यावा. कॅडबरीचा हा सिल्क ब्रँड.
आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या नट्स चॉकलेटचा विचार करू या. जेव्हा एखाद्या खाद्यपदार्थाची ओळख निर्माण करायची असते तेव्हा चॉकलेटमधल्या चवीचा दर्जा वाढवण्यासाठी फळांचा वा नट्सचा नवनवा प्रयोग करणं भागच असतं. आता फेरेरो रॉशर या गाजलेल्या ब्रँडचं घ्या. यांनी चॉकलेटचं स्वरूप आणखीनच रसदार आणि सौंदर्यपूर्ण केलं. हेजलनट, वेफर आणि चॉकलेट यांचं अनोखं मिश्रण. हा चॉकलेटचा लाडू पुन्हा सोनेरी कागदात बांधून दिला. कार्यालयात, वाढदिवसाच्या पार्टीत किंवा कुणाला तरी विशेष भेट म्हणून हे चॉकलेटचे लाडू समोर केले की, पसंतीला उतरतातच. अनेक कंपन्यांनी कन्फेक्शनरी क्षेत्रात दमदार पावलं टाकायला सुरुवात केल्यानंतरही रॉशरची अवीट गोडीवरील पकड सुटलेली नाही. या चॉकलेटची जादू दीर्घकाळ टिकून राहिली आहे.

चॉकलेट चवीच्या जागतिक मैदानात नटेला ब्रँडचा विसर पडून चालणार नाही. पाककलानिपुणांनी रसदार संकल्पनेचा विस्तार मोठय़ा खुबीने केला आणि सुकामेवा घालून चॉकलेट स्प्रेड हा प्रकार आणला. नटेलाच्या रेसिपींची यादी आठवायला कागद घेऊन बसावे लागेल, इतकी त्यांची संख्या आहे. त्या लहान मुलांसाठी आहेत, प्रौढांसाठी आहेत. मग त्या सकाळच्या नाश्त्याबरोबर, जेवणानंतरच्या गोडधोडाचे असेल. अनेक देशांमधील नागरिकांच्या डायनिंग टेबलावर नटेला हा खास घटक बनला आहे. हा ब्रँड अलीकडे भारतातही स्थिरावलाय.
स्नीकर्स हाही आघाडीचा ब्रँड. मिल्क चॉकलेटमध्ये भाजलेले पिस्ते, शेंगदाणे, नॉगट आणि कॅरामल यांची अफलातून युती म्हणजे किती खाऊ नि किती नको, अशी चॉकलेटप्रेमींची होते. या चॉकलेटची चव भुकेशी संबंधित आहे. चवीने खाणार त्याला स्नीकर्स देणार हे आहेच, पण भूकही भागवणार. दमलेल्या भागलेल्यांना हे चॉकलेट खाल्ल्यानं काही प्रमाणात ऊर्जा प्राप्त व्हावी हा उद्देश. त्यांच्या अलीकडील जाहिरातीमध्ये त्यांनी हाच उद्देश कायम ठेवला आहे.
किती खाऊ नि किती नकोच्या पंगतीत तुम्हाला टॉब्लेरोन फ्रुट अँड नट, हर्शेज नगेट आमंड, रिटर स्पोर्ट्स डार्क व्होल हेजलनट यांसारख्या ब्रँड्सनी अनेकांना जिभेवरचा ताबा सोडायला भाग पाडले आहे. ही सारी इ-कॉमर्सची किमया आहे. हे सगळे ब्रॅण्ड्स इ-कॉमर्सच्या वेबसाइट्समुळे आता घराघरात पोचले आहेत. भारतीय बाजारपेठेत अशा अनेक विविधांगी चॉकलेट ब्रँडची भर पडत गेली.
आता नव्याने बाजारात आलेल्या चॉकलेट्सचा विषय निघालाच आहे तर हॉपिट्स डार्क चॉकलेट बार विथ ग्रॅनोला अ‍ॅण्ड नट्स याचा उल्लेख करायचाच हवा. हॉपीट्स डार्क चॉकलेटची मजा त्याच्यात मिसळलेल्या ग्रॅनोलामुळे अधिकच वाढते. ग्रॅनोला म्हणजे भाजलेले ओट्स, तांदळाच्या लाह्य़ा आणि मध वगैरेचा मेवा. सकाळच्या नाश्याला ग्रॅनोला खाल्ला जातो. स्मिटनच्या नट्सचा उल्लेख केला नाही तर मोठा अपराध ठरेल. खरंतर हा भारतीय ब्रँड. या ब्रँडच्या बाजारातील आगमनाने अनेकांची पोट तुडुंब भरलीत आणि कंपनीचा गल्लाही बऱ्यापैकी भरलाय. म्हणूनच सांगतोय आजी अशा ‘नटां’ना वाटीत घेऊन तुमच्या मागे लागली तर त्यांच्यापासून पाठ फिरवू नका. चांगल्या आरोग्यासाठी ‘नटां’ना नमन करा!
(अनुवाद – गोविंद डेगवेकर)