वरूण दिघे, ऑस्लो, नॉर्वे

शीर्षक वाचून काहींना कुतूहल वाटलं असेल, काहींना त्याबद्दल आधीच माहितीही असेल किंवा काहीजणांनी हा अनुभव घेतलाही असेल. पण तरीही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि निराळ्या ज्याच्या त्याच्या चित्तवृत्ती असं म्हणतात ते खोटं नाही. मात्र मी केवळ निसर्गाबद्दलच न लिहिता तिथल्या एकूणच वास्तव्याबद्दल सांगणार आहे. असो. लहानपणी ‘ट्वेंटी थाऊजंड लीगसीज अंडर द सी’ हे पुस्तक वाचण्यात आलं होतं त्यात शेवटी पुस्तकातले नायक नॉर्वेच्या समुद्रकिनारी येऊ न ठेपतात तसाच काहीसा मीही इथे येऊन ठेपलो होतो. मी पक्का पुणेकर. एफसीरोड, तळजाई, पर्वती, सिंहगड, हिंजवडी हे माझ्याभोवतालचं जग.

Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
Traffic changes in Baner Road area due to Metro works  Pune
मेट्रोच्या कामानिमित्त बाणेर रस्ता परिसरात वाहतूक बदल
Thane Diwali Traffic congestion,
ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
From BJP Devendra Fadnavis has been nominated for sixth time and Chandrashekhar Bawankule for fourth time
नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…

नॉर्वेला आलो ते २०१२ मध्ये एका मोठय़ा आयटी कंपनीच्या ऑनसाइट प्रोजेक्टसाठी. आलो होतो फक्त सहा महिन्यांकरिता, पण बघता बघता सहा वर्ष कधी उलटली ते कळलंही नाही. साधारणपणे १९६०च्या सुमारास नॉर्वे हे इतर युरोपियन देशांपेक्षा खालच्या मानंकावर होतं. त्यानंतर खनिज तेलाचा शोध लागला. मिळालेल्या नैसर्गिक संपत्तीचा नॉर्वेजियन सरकारने विचारपूर्वक योग्य वापर केला आणि अजूनही करत आहेत. हा देश इतर तेलसमृद्ध देशांपेक्षा वेगळा आहे. निव्वळ झगमगाटीपेक्षा सुयोग्य सार्वजनिक सोयीसुविधा पुरवण्यासारख्या गोष्टींवर नियोजनपूर्वक खर्च उदाहरणार्थ – निवृत्तीवेतन, मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक वगैरे.

इथे १९६६पासून सार्वजनिक वाहतूक कार्यरत असून त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात येतात. ट्राम, बस, ट्रेन, बोट ही वाहतुकीची साधनं एकमेकांना जोडलेली असल्याने प्रवास करणं सोयीचं ठरतं. एकच तिकीट सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला चालतं हे विशेष. ऑस्लोच्या मध्यवर्ती भागात जायचं म्हटलं तर पुण्याच्या पेठा किंवा जंगली महाराजरोडवर गाडी घेऊ न जाण्यासारखं खूपच महाग पडतं; कारण दोन्हीकडे ट्रॅफिक जाम असतो. त्याऐवजी बस किंवा मेट्रोने जाणं आर्थिकदृष्टय़ा परवडतं आणि वेळेतही पोहचता येतं. जवळजवळ २४ तास ही वाहनं उपलब्ध असतात. महिन्याभराचा पास सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला चालतो. तिकीट न काढता प्रवास केला आणि पकडलो गेलो तर बक्कळ दंड भरावा लागतो. कितीही बर्फवृष्टी झाली तरी वाहतूक विस्कळीत होत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. त्यासाठी अभ्यासक्रम शिकून परीक्षा द्यावी लागते. लायसन्स मिळालं तरी वाहतुकीचे कठोर नियम पाळावे लागतात. अन्यथा खूप मोठा दंड भरावा लागतो.

सोळा ते अठरा वयानंतर इथली तरुणाई वेगळं राहणं पसंत करते. उदरनिर्वाहासाठी पार्टटाइम जॉब करते. काम करणं आणि पैसा कमावणं यात त्यांना कमीपणा वाटत नाही. मुलगा किंवा मुलगी कोणीही असलं तरी प्रत्येक गोष्टीत समानता आदर आणि संधी योग्य प्रमाणात मिळते. केवळ ऑफिसच्या कामातच नव्हे तर घरकामातही हेच चित्र दिसतं. कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम अशा आखणीमुळे आणि ती प्रत्यक्ष आचरणात आणल्यामुळे वर्क-लाइफ बॅलन्स साधला गेला आहे. उगाचच वेळकाढूपणा, अतिकौतुक किंवा समोरच्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणारे संवाद कधीच होत नाहीत. ते थोडंसं वेगळं वाटतं कधी कधी. प्रवासात किंवा एरवीही इथल्या मुली व स्त्रियांना स्त्री दाक्षिण्य दाखवण्यापेक्षा समानतेची वागणूक द्यावी, हीच अपेक्षा असते. लोकसंख्येचा विचार करता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. विविध क्षेत्रांसह राजकारण, शासनव्यवस्था आदी ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे. तीन-चार महिला पोलीस घोडय़ावर बसून बंदोबस्त सांभाळतात.

सोमवार सकाळ ते शुक्रवार दुपापर्यंत ऑफिसला जातायेता एकदम शांतता असते. प्रसंगी काही भारतीय लोक आपापसात खूप मोठमोठय़ाने गप्पा मारतात, ते नॉर्वेजियन लोकांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं किंवा काहीतरी चुकतंय यांचं, असं त्यांच्या डोळ्यांत दिसतंही, पण ते तसं कधीच सांगत नाहीत. सकाळी ट्रेनमध्ये असणारी शांतता हीच का, असा प्रश्न संध्याकाळी पडतो. कारण तेव्हा पार्टीमूडमध्ये असणारी, हल्लागुल्ला करणारी, बीअर पिणारी तरुणाई मोठय़ा संख्येने असते. मात्र त्यांचा कुणालाही त्रास होत नाही. इथे लहानग्यांच्या पालनपोषणासाठी ठरावीक रक्कम पालकांच्या खात्यात सरकारतर्फे जमा केली जाते. तरीही ही काळजी योग्य पद्धतीने घेतली गेली नाही, तर त्यांना दत्तक दिलं जातं. लहान मुलांना उच्चशिक्षण आणि वयस्करांसाठी आरोग्य सुविधा मोफत असते.

सहा वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा उन्हाळा चालू होता. रात्री साडेअकरा वाजता सूर्यास्त होत होता आणि पहाटे तीन वाजता दिवस उजाडत होता. या अंधारउजेडाच्या खेळाची अर्थात ‘मिडनाइट सन’ची सवय व्हायला थोडासा वेळ गेला. तर थंडीच्या दिवसांत १८ तास काळोख असतो. निसर्गाच्या या प्रतिकूलतेचा विचार करण्यापेक्षा पदरी पडलेल्या अनुकूलतेला ते मोठय़ा कौशल्याने आपलंसं करतात. त्याचा कधीच बाऊ  करत नाहीत. उलट त्यासाठी योग्य ती काळजी घेऊन आपापल्या कामाला लागण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतो. ऑस्लोमधल्या जुन्या इमारतींचा दर्शनी भाग त्या इमारतीची अंतर्गत दुरुस्ती केली तरीही बदलता येत नाही. त्यामुळे एरवी अलीकडे सर्रासपणे आढळणारा चकचकाटीपणा इथे नाही. तर जुन्या तोंडावळ्याच्या इमारतींची संख्या अधिक दिसते. त्यांच्या आतल्या भागात अत्याधुनिक सुविधा केल्या आहेत, हे बाहेरून बघून खरंही वाटत नाही. बहुतांशी नॉर्वेजियन लोकांची दोन-तीन घरं असतात. डोंगराजवळ बांधल्या गेलेल्या या घरांना ‘हित्ता’ असं म्हणतात आणि ‘हित्ता’ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं.

क्रिकेट हा माझा आवडता खेळ. हा छंद इथे कसा काय जोपासणार, असा प्रश्न पडला होता. सुरुवातीला कंपनीतले सहकारी खेळायचो. नंतर कळलं की इथे नॉर्वेजियन क्रिकेट फेडरेशन आहे. त्यात श्रीलंकन, पाकिस्तानी, अफगाणी, भारतीय लोकांचा समावेश आहे. असोसिएशनतर्फे उन्हाळ्याचे चार महिने क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. भारतीय लोकांच्या फ्यॉर्ड क्रिकेट क्लबमध्ये मीही सहभागी झालो. हे सारे सदस्य मोठय़ा हौशीने खेळतात. थंडीतही इनडोअर प्रॅक्टिस करत आपली आवड पद्धतशीरपणे जोपासतात.

नॉर्वेजियन फ्यॉर्डचा देखावा अतिशय प्रसिद्ध आहे. फ्यॉर्ड म्हणजे दोन्ही बाजूंनी डोंगरांचे उंच कडे असलेला समुद्राचा अरुंद पट्टा. तो बघण्यासाठीच्या सहलीचं नाव – नॉर्वे इन नटशेल. ते पाहायला जगभरातून लोक येतात. डोंगरांच्या कडेकपारींतून वाट काढत बोट पुढंपुढं सरकत असतं. ऑस्लो ते बर्गन या टप्प्यातील सहलीत ट्रेनमधून जाताना मित्राने सांगितलं होतं की, पहाटे तीनच्या आसपास फिन्से नावाची जागा दिसेल. ते इथलं सर्वोच्च स्थानावरचं स्टेशन आहे. तो परिसर पूर्ण बर्फमय झाला होता. पहाटे तीन वाजता सूर्योदय होताना दिसतो. तो नजारा पाहिल्यावर आपण स्वर्गात आहोत की काय, असा प्रश्न क्षणभर पडला होता, इतकं ते भारी दिसत होतं.

मी आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्याने मला नॉर्वेजियन भाषा शिकायची गरज भासली नाही. व्यावहारिक कारणांसाठी इथे इंग्रजीचा वापर केला जातो. मात्र काही वयस्कर लोक म्हणा किंवा काही दुकानांमध्येही इंग्रजीचा वापर होत नाही. मी सुरुवातीला राहायचो, तिथल्या शेजारच्या आजीबाईंशी मी हातवाऱ्यांच्या साहाय्याने संवाद साधायचो. तेव्हा प्रकर्षांने जाणवलं होतं की आपल्याला नॉर्वेजियन भाषा यायला पाहिजे. दीड वर्षांपूर्वी माझी बायको संज्योत इथे आल्यावर जॉब मिळवण्याच्या दृष्टीने तिला ही भाषा शिकावीच लागली. त्यामुळे तिला नॉर्वेजियन व्यवस्थित कळते, बोलता येते. मी अजून तितका माहीर झालो नाही. मात्र आपण भाषा शिकायच्या केलेल्या प्रयत्नांमुळे स्थानिकांना निश्चितच आनंद वाटतो. इथल्या खाद्यविश्वाची खासियत सांगता येणार नाही. ख्रिसमससाठी स्पेशल डिश म्हणून पिन्न्ोजॉत् करतात. रेनडिअरचं मांस खातात. बर्गनला डोंगरावर फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे एक जोडपं सोलून सोलून काहीतरी खात होतं. निरखून पाहिलं तर बॉईल्ड प्रॉन्स सोलून खात होते. या लोकांना मासे नुसते खायलाही आवडतात. त्यांना भारतीय जेवण खूपच आवडतं. भारतीय रेस्तराँ खूप असून त्यांच्यासाठीचा स्वयंपाक खूपच सौम्य करावा लागतो.

नोबेल पुरस्कार सोहळा ऑस्लोतील सिटी हॉलमध्ये होतो. विविध विषयांवरील पारितोषिक समारंभ सोहळा स्वीडनमध्ये होत असला तरी शांतता पुरस्कार सोहळा ऑस्लोमध्ये होतो. २०१४ मध्ये कैलास सत्यर्थी यांना नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला, तेव्हा भारतीय प्रसिद्धीमाध्यमं तिथं आली होती. सत्यार्थीना पुरस्कार मिळाला तेव्हा आम्हाला खूपच आनंद झाला होता. कैलास यांच्याबद्दल स्थानिकांना स्थानिकांनी अनेक प्रश्न विचारले आणि आम्ही त्यांना माहिती दिली होती. इथल्या लोकांच्या गप्पांमध्ये भारतीय हवामान, संस्कृती आदी विषयांबद्दल बोलणं होतं. एकदा माझे ज्येष्ठ सहकारी पुण्यात आले होते. त्यांना फिरायला गेल्यावर त्यांनी मोठय़ा कुतूहलाने इथे ‘हत्ती दिसतो का’, अशी विचारणा केली. मी हसून ‘नाही’ म्हणालो. तर पुढच्याच चौकात हत्ती दिसल्यावर त्यांची अवस्था लहान मुलासारखी झाली होती.

इथे ‘ऑस्लो मेला’ भरतो. या तीन दिवसांच्या कार्यक्रमांत एक वर्ष उस्ताद झाकीर हुसेन यांनी श्रोत्यांनी गच्च भरलेल्या हॉलमध्ये परफॉर्म केलं होतं. या ‘मेळ्या’त विविध देशांतील कलाकार आपल्या कला सादर करतात. अनेक खाद्यपदार्थाची रेलचेल असते. इथे पंजाबी लोकांची बैसाखी मोठय़ा प्रमाणात साजरी होते. शहराच्या मध्यवर्ती भागात भारतीय आणि स्थानिक लोक लंगरच्या रांगेत उभे राहतात. पंजाबी संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम पंजाबी लोक सादर करतात. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना मानाची पगडी बांधली जाते. ‘महाराष्ट्र मंडळा’त सगळे सणवार मोठय़ा थाटामाटात साजरे होतात. नवख्या लोकांना मंडळातर्फे मदतीचा हात दिला जातो. लोकसहभागातून एक मंदिरही बांधण्यात आलं आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने बरेच स्थानिक आपल्या पालकांना भेटायला त्यांच्या घरी जातात. त्यानिमित्तानं शॉपिंग आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होतेच. ३१ डिसेंबरला शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी फटाक्यांची आतषबाजी बघायला मजा येते. १७ मे हा नॉर्वेचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या सुट्टीच्या दिवशी मुख्य रस्त्यावर शाळकरी मुलांची परेड असते. पारंपरिक पोषाखातल्या लोकांमध्ये खूपच उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. त्यादरम्यान थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते.

आम्ही एकदा क्रुझवर फिरायला जायचं ठरवलं. मात्र बसप्रवासात संज्योतचं पाकीट हरवलं. त्यात कार्ड आणि महत्त्वाच्या अनेक वस्तू होत्या. ते मिळाल्याशिवाय आम्ही बाहेर जाऊ  शकत नव्हतो. हताश होऊन घरीच बसलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी फेसबुकवर संज्योतला मेसेज आला की तुमचं वॉलेट मिळालं आहे. आम्ही त्यांना रिप्लाय करून भेटलो. वॉलेटमधल्या सगळ्या वस्तू सुखरूप होत्या. ते त्यांना बसमध्ये मिळालं होतं. आम्हीच त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देत छोटीशी भेट म्हणून चॉकलेटचा बॉक्स दिला. प्रामाणिकपणा आणि विनम्र भाव जपणाऱ्या नॉर्वेकरांचं करावं तितकं कौतुक कमीच..

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com