हिंदू चित्रपटांमध्ये जी गाण्यांची बांधणी पूर्वी पटकथेला अनुसरून केली जाई, तीत माफीछटांना वाव हा नायक-नायिकेंच्या गैरसमज परिवर्तनासाठी असे. म्हणजे नायिका तोंड वेंगाडण्याचा उत्कृष्ट आविर्भाव चेहऱ्यावर आणि, नायक नृत्यादी कलेत आपण किती निपुण आहोत हे दाखवत तो गानकौशल्यातील तरबेजपणाही सादर करी. म्हणजे नायक पटकथेत नृत्यकार किंवा स्वरसाधक नसला तरी त्याच्या या गुणांचे अतिरिक्त दर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळे. देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते ‘खाना’वळीतील प्रत्येक नायकाला नायिकेसमोर गान-नतमस्तक करणारे एकतरी गाणे सहज सापडू शकेल. तर रागावलेल्या नायिकेला मनवण्यासाठी माफीनाम्याचा महोत्सव अनुभवलेल्या आपल्या कानांना ‘रुठ ना जाना तुमसे कहू तो’ या ‘१९४७ ए लव्ह स्टोरी’तल्या किंवा ‘रूठ के हमसे कभी’ या ‘जो जिता वोही सिकंदर’मधील गाण्यातला फरक लक्षात येऊ शकेल. चाल आणि वाद्यसंगतीची विलक्षण सूरसंगती या गाण्यांमधून माफीचा आशय अधिक प्रखर करतात. इंग्रजी गाण्यांमधील माफीनामाही बॉलीवूड गीतांसारखा अधिकाधिक ‘शोबाजी’ करणारा असतो. पण या दिखाऊपणातून काही उत्तम गाणी झाली आहेत.
‘पॉप्यु’लिस्ट : माफीनामा महोत्सव!
इंग्रजी गाण्यांमधील माफीनामाही बॉलीवूड गीतांसारखा अधिकाधिक ‘शोबाजी’ करणारा असतो. पण या दिखाऊपणातून काही उत्तम गाणी झाली आहेत.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-06-2018 at 00:35 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pop song hindi movies