राघव जैन

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

प्रेम या शब्दाचा अगदी योग्य अर्थ कोणी कधीच सांगू शकत नाही. प्रेमावर कोणी भरभरून लिहितात तर कोणाला त्यावर तसं काही विशेष बोलायलाही आवडत नाही, परंतु एखाद दुसऱ्या व्यक्ती अशा असतात ज्यांना प्रेमात पडायला आवडतं, त्यावर लिहायला, बोलायला आणि त्यावर एका काल्पनिक वास्तवाचा आघार घेऊन शोध घ्यायलाही आवडतं. ‘प्रिन्सेस ब्राईड’ या पुस्तकातील विल्यम ग्लोडमॅन या लेखकाने लिहिली प्रेमावरची ‘शोध’ कथा मला प्रचंड आवडली आणि त्यातली ही ओळ मला सर्वात जास्त भावली. या ओळीत लेखकाने अगदी खोलात जाऊन आपल्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्या वळणावर नेत मानवी मनातील प्रेमभावनेवर भाष्य केलंय. अंतरात्मा आणि निसर्ग यांना जोडणाऱ्या अदृश्य प्रेमाविषयी सांगणाऱ्या या ओळीत मृत्यूनंतर मातीचा देह असणाऱ्या माणसाचं मातीतच संपणं आणि तरीही त्या मातीशी जोडलेल्या आंतरआत्म्यात दडलेलं प्रेम न संपणं.. प्रेमाचं हे नातं वरवर न दिसणारं तरीही खोलवर रुजलेलं असंच असतं. देवाने आंतरआत्म्यात निर्माण केलेलं प्रेम हे आपल्याला जगण्याचं कारण देतं, हेतू देतं. आपण मात्र ते लक्षात घेत नाही, उलट स्वत:तच आनंद शोधण्यासाठी दिवसरात्र एक करतो. आणि तरीही प्रत्येकाला आपल्याच मनात असलेलं हे प्रेम, शांति मिळत नाही. त्यामुळे स्वत:च्याच आनंदशोधात मश्गूल होत आपण आपल्याच आयुष्याचं वाळवंट करतो, हे वास्तव आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न यात लेखकाने केला आहे.

पुस्तक – प्रिन्सेस ब्राईड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक – विल्यम ग्लोडमॅन ?