कुस्ती आणि आखाडय़ांसाठी प्रसिद्ध कोल्हापूरच्या राही सरनोबतने नेमबाजीसारख्या एकाग्रतेवर आधारित खेळाची निवड केली. नेमबाज तेजस्विनी
सावंत या कोल्हापूरच्याच लेकीच्या यशातून प्रेरणा घेत राहीने पिस्तूल नेमबाजीची अवघड वाट स्वीकारली. राष्ट्रीय स्तरावरच्या दमदार प्रदर्शनानंतर राहीने २००८ मध्ये पुण्यात झालेल्या युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. दक्षिण कोरियात झालेल्या नेमबाजी विश्वचषकात पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी राही पहिली भारतीय खेळाडू ठरली. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. गेल्याच वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावत राहीने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अल्पावधीत दमदार भरारी घेणाऱ्या राहीला असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. नेमबाज म्हणून चमकदार कामगिरी करतानाच पुण्यात महसूल उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या या युवा नेमबाजपटूशी थेट संवाद.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा