‘ओल्ड इज गोल्ड’ हा फॅशन जगताचा मंत्रा आहे. सतत नवीन काही करण्याच्या नादात आपण कधी जुन्याची कास धरून पुन्हा तीच फॅ शन म्हणून लोकप्रिय करतो हे आपल्या लक्षातही येत नाही.
फॅशनवर चित्रपट-मालिकांमधील नायक-नायिकांच्या पेहरावाचा प्रभाव जास्त असतो आणि याच प्रभावामुळे आजची फॅशन पुन्हा एकदा जुन्या हिंदी चित्रपट नायिकांच्या फॅशनविश्वात डोकावतेय की काय, अशी शंका यावी इतका रेट्रो पेहराव आपल्या फॅशनमध्ये शिरला आहे. ‘पिकू ’ चित्रपटात दीपिकाने कोलकात्यातील आजची आधुनिक तरुणी म्हणून समोर येताना अँकल लेन्थ कॉटन पँट्स आणि टिकलीचा प्रामुख्याने वापर केला होता. आता तो ट्रेंड फॅशन जगतात ‘इन’ झाला आणि अजूनही तो टिकून आहे म्हणण्यापेक्षा त्याचीच आणखी वेगवेगळी रूपं कार्यालयीन ठिकाणापासून ते रोजच्या पेहरावातही पाहायला मिळतायेत. ‘रेट्रो’ फॅशनची हीच तर खरी गंमत आहे!
थोडंसं मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल आपण ज्याला ‘ओल्ड’ फॅशन किंवा जुन्या काळातली फॅशन म्हणतो ती बरीचशी जुन्या हिंदी चित्रपटातील नायिकांचे कपडे, त्यांची हेअरस्टाइल, लुक्स यांनी प्रभावित आहे. आणि सध्या फॅशन म्हणून जे पेहराव प्रचलित आहेत त्यांच्या स्टाइल्स या त्या ‘ओल्ड’ फॅशनशी मिळत्या जुळत्या वाटतात. आत्ताच्या नवनवीन स्टाइल्सची पाळंमुळं ही बरीचशी जुन्यातच दडलेली आहेत. त्याचं कारण फॅ शन डिझायनर्स सध्या आपापल्या सर्जनशीलतेनुसार प्रत्येक बदलता ऋतू आणि त्याला साजेसे लोकांना आवडतील आणि आरामयदायी वाटतील अशी नवनवीन डिझाइन्स बाजारात आणत आहेत. याबद्दल बोलताना डिझायनर परोमिता बॅनर्जी म्हणाल्या, ‘प्रत्येक दिवसाला नवनवीन ट्रेंड्स येतात. मात्र कित्येक वेळा नवनवीन करण्याच्या नादात आपण प्रत्येक दिवसागणिक ट्रेंड्सप्रमाणे वागू शकत नाही हे लक्षातच घेत नाही. आपण स्थिरता विसरून गेलो आहोत. एक काळ असा होता जेव्हा काय घालावं, कसं घालावं याचा फारसा विचार न करता जे आपल्याला सहज वापरता येईल आणि सुंदरही दिसेल असे कपडे घातले जायचे. हटकेच पाहिजे हा अट्टहास त्यामागे नव्हता. त्यामुळे त्या काळातील जे कलेक्शन होतं त्याच्याशी पुन्हा नाळ जोडत नवीन कलेक्शन बाजारात आणले जात आहेत’.
गेल्या वर्षी ‘लॅक्मे फॅशन’मध्येही रेट्रो काळातील पेहरावापासून प्रेरणा घेत त्याला कन्टेम्पररी पण क्लासिक आणि एलिगंट असं कलेक्शन तयार केलेलं बघायला मिळालं होतं. बऱ्याच डिझायनर्सचं कलेक्शन हे रेट्रो आणि व्हिक्टोरियन काळाची आठवण करून देणारं होतं. तर काहींनी जुन्या बेंगाली पद्धतीने तर अनेकांनी चक्क जुन्या बॉलीवूड स्टाइललाच आपल्या पद्धतीने सादर केलं होतं. या सगळ्याचा मिलाफ सध्या मुलींच्या रोजच्या फॅशन ट्रेंडवर दिसून येतो आहे अगदी टिकलीपासून मेकअपपर्यंत बदललेली ही ‘रेट्रो’ फॅशन..
टिकली
जुन्या बॉलीवूड अभिनेत्री सिनेमांमध्ये टिकल्या लावलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर हळूहळू हा ट्रेंड कमी झाला होता. आता ‘पिकू’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा हा ट्रेंड हिट आहे. सध्या एखादी कुर्ती किंवा एथनिक वेअर घातलेल्या बऱ्याच मुली गोल मोठय़ा रंगीत टिकल्या लावतात. पूर्वी जीन्स-टॉप घातल्यानंतर कपाळावर टिकली लावणं हे खूपच अनफॅशन्ड मानलं जायचं. आता कुर्तीपुरतंच मर्यादित न राहता एखादा मस्त सैलसर टीशर्ट आणि शॉर्ट्स किंवा जीन्स टीम अप करा, भरपूर व्यवस्थित काजळ आणि बरोबरीने एक काळी टिकली लावल्यावर तुमचा लुक ‘कुल’ समजला जातो. टँक टॉप्स किंवा शर्ट्स आणि कुठल्याही वेस्टर्न वेअरवर अशा प्रकारे टिकली तुम्ही स्टाईल करू शकता.
ओव्हरसाइझ स्पेक्स
जुन्या हिरॉइन्स बऱ्यापैकी मोठय़ा चौकोनी किंवा गोल फ्रेम्स सिनेमात वापरत असत. विद्या सिन्हाचा ‘रजनीगंधा’ चित्रपटातला असा चष्यातील लुक प्रसिद्ध होता. त्यानंतरच्या काळात लहान, रिमलेस त्यानंतर फुल फ्रेम्ड, फ्रेमलेस असे चष्म्याचे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये होते. आता पुन्हा एकदा ओव्हरसाइज स्पेक्स, राऊंड स्पेक्स, गांधीजी स्पेक्स असे प्रकार हिट आहेत. शक्यतो लंबगोल किंवा चौकोनी चेहऱ्याच्या व्यक्तींना राऊंड फ्रेममधील चष्मे चांगले दिसतात. तरीही आपल्या आवडीनुसार तुम्ही व्यवस्थित फ्रेम निवडा. केवळ स्टाईल स्टेटमेंट म्हणून चष्मा वापरणार असाल तर कोणत्या वेळी आणि कोणत्या आऊटफिटवर चष्मा घालताय त्याकडे नक्की लक्ष द्या.
विंग्ड आय लाईनर
डोळे बोलके दिसावे, त्यांचा आकार सुंदर दिसावा, डोळे मोठे आणि उठावदार दिसावेत यासाठी आय लायनर वापरायला सुरुवात झाली. सध्या प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये आय लायनर असतंच. कित्येकदा कुठलाही मेकअप न करता केवळ आय लायनरवर आपली स्टाईल करणाऱ्या अनेक जणी आहेत.
आय लायनर लावायच्या पद्धतीतही अनेक प्रकार सध्या दिसून येतात. विंग हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. शर्मिला टागोर, लीना चंदावरकर, मीना कुमारी, वहिदा रेहमान, संध्या अशा अनेक हिरॉइन विंग आयलाइन करत होत्या. त्या वेळी कदाचित विंग आयलायनर हे नाव प्रचलित नसावं. विंग आयलायनर लावतानासुद्धा आपल्याला चेहरेपट्टीचा अंदाज घेऊ न ते लावावं लागतं. अगदी अचूक विंग आयलाइन करायची असेल तर डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यात चिकटपट्टी लावून घ्यावी आणि त्याच्या कडांना व्यवस्थित लायनर लावून झाल्यावर मग ती चिकटपट्टी काढून टाकायची. तुम्हाला परफेक्ट विंग आयलायनर मिळेल.
हॉट रेड व क्लासि ब्राऊन लिपस्टिक
पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये नायिका हमखास रेड लिपस्टिक वापरताना दिसत असत. आता या रेड लिपस्टिक पुन्हा एकदा तरुण मुलींच्या रोजच्या वापरातील भाग झाल्या आहेत. रेड लिपस्टिकच्या बरोबरीने ब्राऊ न लिपस्टिकसुद्धा सध्या खूप ट्रेंड इन आहेत. क्रेयॉन लीप कलर्समुळे सध्या पुन्हा एकदा रेड लिपस्टिकच्या अनेक बोल्ड शेड्स ट्रेंड इन झाल्या आहेत. साधारण तीन-चार वर्षांपूर्वी बोल्ड रेड लिपस्टिक खूपच आऊटडेटेड मानल्या जात होत्या. परंतु हल्ली पार्टीज, समारंभ किंवा नेहमीच्या वापरात रेड लिपस्टिक्स आणि त्यांच्या अनेक शेड्स आवर्जून वापरल्या जातात.
मिडल पार्टिशन हेयर / बन्स
मध्यंतरीच्या काळात केसांचा मध्ये भांग पडलाय, के सांचा बन बांधलाय किंवा वेणी बांधली असेल तर तिला ‘काकू बाई’ ही बिरुदावली सहज चिकटवली जायची. पण दीपिका असो वा प्रियांका हॉलीवूडमध्ये गेल्यापासून अगदी केसांचा मध्ये भांग पाडून हेअरस्टाइल्स करत असल्याने हा ट्रेंड रुजू झाला आहे. त्याचबरोबर बन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. उन्हाळ्यात के सांचा बन बांधणे, वेणी बांधणे या हेयर स्टाईल हमखास केल्या जातात. क्रॅप टॉप, लूज टीशर्ट, शर्ट, डंगरी, डे ड्रेस अशा सगळ्याच आऊटफिटवर हेयर बन किंवा वेण्या घालणे हा चांगला पर्याय आहे. मध्ये भांग पडून हाय बन बांधणे, मध्ये भांग पाडून दोन्ही बाजूच्या के सांच्या स्टाईल करणे अशा अनेक हेअरस्टाईल पार्टीजमध्ये हल्ली दिसून येतात.
रेट्रो जमान्यातले काही ट्रेंड्स जसे नाव बदलून पुन्हा एकदा ट्रेंड म्हणून आपल्याकडे दिसायला लागले. त्याप्रमाणे त्याकाळी जसे केसात गजरे, फुलं माळली जायची तोच प्रकार आताही फॅशन म्हणून हिट झाला आहे. नैसर्गिक पाना-फुलांचे आकार कपडय़ावर वापरून डिझाईन्स बनवणे, प्राण्यांचे, झाडांचे आकार कपडय़ांवर वापरण्या बरोबरीनेच आता डिझायनर्स फुलांचे गजरे तसेच खरी फुलं यांचा वापर हेड गियर म्हणून करू लागले आहेत. के सांचा अंबाडा म्हणजे आजच्या काळातील बन जसा सध्याच्या नवनवीन हेअर स्टाईल्समध्ये पुन्हा एकदा विसावला तसाच त्याला सजवण्यासाठी फुलांचे गजरे आणि फुलं ही ‘हेड गियर’ म्हणून सध्या पुन्हा एकदा वापरात आली आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात दीपिका पदुकोनने आपल्या मैत्रिणीच्या लग्नात लेहेंगा व त्याला साजेसा बन आणि तो सजवण्यासाठी दोन गुलाबाची फुलं केसात माळली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील ही हेअरस्टाईल खूप गाजली होती. गुलाबाची फुलं पुन्हा एकदा माळण्याची सुरुवातही याच चित्रपटामुळे झाली.
टॉप आणि पँटचे विविध प्रकार
सध्या चालू असलेला हिट ट्रेंड हा छोटे छोटे तोकडे टॉप आणि त्याच्या बरोबरीने हाय वेस्ट पँट परिधान करण्याचा आहे. जो अगदी रेट्रोमधून सहीसही उचलला गेला आहे. अनेक हिंदी चित्रपटांमधून नायिकोंनी केलेलं हे पेअरिंग पाहायला मिळतं. पलाझो, पँट्स, स्कर्ट, कुलॉट्स हे सध्या खूपच ट्रेंड इन आहेत. मुलांमध्ये झब्बे घालण्याचा ट्रेंड त्या वेळी राजेश खन्नाच्या चित्रपटांमुळे सुरू झाला होता. आता पुन्हा एकदा लूज झब्बे आणि जीन्स मुलं सर्रास वापरताना दिसतात.
‘ब्लाऊज’चे वेगवेगळे प्रकार
हाय नेक ब्लाऊजेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. जुन्या फिल्म्समध्येसुद्धा हाय नेक ब्लाऊ जेस आपण पाहत होतो. काही काळासाठी आऊटडेटेड झालेला हा ट्रेंड पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर आला आहे. याशिवाय, कॉलर ब्लाऊज, बोट नेक ब्लाऊज, ऑफ शोल्डर ब्लाऊज हेही हिंदी चित्रपटांमधून एकेकाळी प्रचलित झालेले प्रकार सध्या पुन्हा पाहायला मिळतायेत.
पॅटर्न, रंग, आकारमान कमी जास्त करून प्रसंगी डिझाइन्स बदलून वेगवेगळ्या नावांनी आल्यामुळे हे ट्रेंड्स कन्टेम्पररी वाटतात. मात्र कन्टेपररीच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी आऊटडेटेड ठरवली गेलेलीच फॅशन पुन्हा एकदा इन झाली आहे हे वास्तव आहे. कॉटन, लिनन, मलमल, खादी या फॅब्रिक्सचा मोठय़ा प्रमाणावरचा वापरही याच ट्रेंडवर बोट ठेवणारा आहे. त्यामुळे काळ कितीही बदलला तरी नुसतंच हटके करण्यापेक्षा ते आरामदायी वाटेल, सहज-सुटसुटीत दिसेल अशा पद्धतीची रेट्रो फॅ शनच आजच्या काळातही प्रभावी ठरतेय हेच खरं!
viva@expressindia.com