उन्हाळ्याचे दिवस आपल्याला कितीही नकोसे होत असले तरी टळटळीत दुपारी रोजचा प्रवास करणं कोणालाही चुकलेलं नाही. अशा वेळी जीव अगदी हैराण होऊन जातो. ऊन आणि घामाचा चिकचिकाट यामुळे अंगाची लाहीलाही होते. अशा वेळी आरामदायी कपडे असणं आवश्यक वाटतं. अ‍ॅक्सेसरजीचं ओझं नकोच वाटतं आणि मानेवर रुळणाऱ्या मोकळ्या केसांऐवजी वर बांधलेला बन किंवा पोनीच बरा वाटतो. उन्हाळ्याचा लुक कम्फर्टेबल पण स्टायलिश कसा असावा हे सुचवणाऱ्या काही टिप्स..

उन्हाळा म्हणजे फॅशनच्या दृष्टीने उत्तम ऋतू खरा. पाश्चिमात्य देशात.. विशेषत: युरोपात उन्हाळ्यातच गरम कपडे सोडून नवनवीन फॅशन करता येत असल्याने फॅशनप्रेमींना थोडा दिलासा मिळत असल्याने हा सीझन महत्त्वाचा मानला जातो. आपल्याकडे मात्र उन्हाळा रखरखीत असतो. तरीही वसंत ऋतूचं आगमन आणि रखरखाटात थोडी रंगत म्हणून उन्हाळी फॅशनचे रंग नेहमीच ब्राइट असतात; पण या वर्षी फॅशन डिझायनर्सनी ठरलेले सगळेच ठोकताळे मोडलेले दिसले. यंदाच्या स्प्रिंग समर कलेक्शनमध्ये जास्त प्रभाव हलक्या रंगांचा दिसतोय.

maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mutton chops diwali meeting
चंद्रपूर: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Happy Tulsi Vivah 2024 wishes in marathi| Tulsi Vivah 2024 Quotes Wishes
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहनिमित्त मित्र-परिवारास द्या हटके शुभेच्छा; पाहा एकापेक्षा एक सुंदर मराठी मेसेज
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही

उन्हाळ्यातील रंग

स्प्रिंग- समर कलेक्शन म्हणजे हिरवा, पिवळा, नारिंगी, निळा असे रंगीत आऊटफिट्स आपल्याला आठवतात, कारण युरोपीयन फॅशनमध्ये हेच रंग चलतीत असतात; पण या वर्षीचं स्प्रिंग-समर कलेक्शन हे अत्यंत सटल रंगांचं आहे. यंदा डिझायनर्सनी पेस्टल शेड्स जास्त वापरल्या आहेत. या उन्हाळ्यात अति भडक रंग वापरण्यापेक्षा तुम्ही पिंक, ब्लू, रेड, यलो, ग्रीन यांच्या पेस्टल शेड्स वापरायला हव्यात. डिझायनर रीना यांनी आपल्या ‘एका’ या लेबलद्वारे संपूर्ण पेस्टल कलेक्शन रॅम्पवर उतरवलं होत. पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड सध्या खूपच इन आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुमच्या वॉर्डरोबमध्ये पेस्टल शेड्स असल्याच पाहिजेत.

कॉटन झिंदाबाद

जॉर्जेट, शिफॉन आणि त्या प्रकारची सिंथेटिक फॅब्रिक्स वेस्टर्न आऊटफिट्समध्ये जास्त वापरली जातात. तरुणाईला याचं आकर्षण असतं; पण आपल्याकडच्या उन्हाळ्यात या फॅब्रिक्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यंदा डिझायनर्सनी ट्रॅडिशनल खादी, कॉटन, मल, लिनन या फॅब्रिक्सना पसंती दिली. केवळ कुर्ता, साडी या आऊटफिट्सपर्यंतच मर्यादित असलेली ही फॅब्रिक्स हल्ली डिझायनर्सनी खूप वेगळ्या पद्धतीने हाताळली आहेत.

वेस्टर्न स्टाइल टॉप्स, पँट्स, जॅकेट्स, स्कर्ट, ड्रेसेस अशा मॉडर्न आऊटफिट्सची डिझाइन्सही  खादी, कॉटन, मल, लिननमधून साकारली आहेत. त्यामुळे यंदाची हायफॅशनही कम्फर्टेबल असणार.

लेयरिंग

हिवाळ्यात आलेला लेअरिंगचा ट्रेण्ड उन्हाळ्यातही कायम आहे. फक्त लेअरिंगची पद्धत बदलली आहे. सयंतन सरकार तसेच जया भट आणि रुची त्रिपाठी यांच्या ‘इंडिजी’ या लेबलअंतर्गत उन्हाळ्यातही वापरता येतील अशी लेअरिंगची स्टाइल दिसते. पातळ जॅकेट, केप जॅकेट, लेयर्ड डे ड्रेस, स्कार्फ अशा अनेक घटकांचा वापर त्यांच्या डिझाइन्समध्ये दिसतो. लेअरिंगचा ड्रेस, मल कुर्ती आणि स्कर्ट, फ्लेअर्ड कुर्ती विथ स्ट्रेट पँट्स सध्या ट्रेण्ड इन आहेत. तुमच्याकडे ते नक्कीच असले पाहिजेत. डिझायनर जया आणि रुची म्हणाल्या, ‘‘उन्हाळ्यात घट्ट कपडे आपल्याला सहन होत नाहीत. त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल फिटिंगचे कपडे आम्ही बनविले. कोणत्याही बॉडी टाइपच्या व्यक्तीला वापरता यावेत म्हणून आम्ही त्यात लेयरिंग अ‍ॅड केलं आहे. जॅकेट्स, केप जॅकेट्स वापरून आम्ही लेयरिंग केलं आहे. कुठल्याही मुलीला हे चांगलं दिसेल.’’

बचपन की यादें

यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही पुन्हा एकदा लहानपण एन्जॉय करू शकता. प्लीट्स असलेले फ्रॉक्स आपण लहानपणी वापरायचो. पिनाफोर तर अनेकींच्या शाळेच्या गणवेशाचा भाग होता. यंदा याच स्टाइल्सना पुनरुज्जीवन देऊन काही कलाकारांनी नवं कलेक्शन लाँच केलं आहे. ड्रेसमध्ये यंदा खूप प्रयोग केले गेले आहेत. डे ड्रेसेस, पिनाफोर ड्रेसेस, फ्लेयर्ड ड्रेसेस, स्ट्रेट ड्रेसेस डिझायनर्सनी बनवले आहेत. तुम्हीही तुमच्या आवडीपणाने अशा प्रकारचा ड्रेस शिवून घेऊ  शकता. हे ड्रेस वापरायला कम्फर्टेबल आणि दिसायला क्लासी दिसतील.

स्ट्रीट शॉपिंग

डिझायनर वेअर्सना पर्याय म्हणजे स्ट्रीट शॉपिंग. स्ट्रीट शॉपिंगमध्ये तुम्ही ओव्हरसाइज टी-शर्ट्स, लूज ड्रेसेस, पलाझो पँट्स, क्रॉप टॉप्स, स्कार्फ हमखास विकत घेऊ  शकता; परंतु हे सगळे कपडे घेताना फॅब्रिक नक्की तपासून बघा. स्ट्रीट शॉपिंग करताना तुम्हाला खूप पर्याय असतात. त्याचा पुरेपूर वापर करा. एकाच दुकानातून सगळं घेण्यापेक्षा सगळीकडे फिरून मगच शॉपिंग करा.

जीन्सऐवजी स्ट्रेट पँट्स

जीन्स आणि लेगिंग्ज हे आपले नित्याचे कंफर्टेबल वेअर झाले आहे. यामध्ये बदल म्हणून कधी तरी स्कर्ट किंवा पलाझो वापरले जातात. वर टी-शर्ट, टॉप, कुर्ती, कुर्ता, टय़ुनिक, शर्ट यापैकी शोभेल ते घालायचं असा हा ट्रेण्ड. यात बदल होतोय बॉटम्समध्ये. घट्ट जीन्सऐवजी हलक्याफुलक्या कापडाच्या स्ट्रेट पँट्स सध्या इन आहेत. स्ट्रेट पँट्सवर वरीलपैकी काहीही टॉप म्हणून घालता येईल. शॉर्ट कुर्ता- लाँग कुर्त्यांपासून क्रॉप टॉपपर्यंत सर्व काही यावर शोभून दिसतं आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात स्ट्रेट पँट्सचा पर्याय सगळ्यात कंफर्टेबल असू शकतो.

पाडव्याचं स्टायलिंग

  • पेस्टल कुर्ती आणि पँट्स आणि त्यावर मस्त रंगीत दुपट्टा टीम अप करा.
  • साडी नेसणार असाल तर मराठमोळा खणाचा ब्लाउज आणि प्लेन साडी टीमअप करा. नेहमीचीच पैठणी किंवा साउथ सिल्क साडी वापरण्यापेक्षा इरकल साडी आणि त्यावर रंगीत ब्लाऊज छान दिसेल. क्रॉप टॉपही या साडय़ांवर मस्त दिसेल. ऑफशोल्डर्स, कोल्ड शोल्डर्स, स्लीव्हलेस किंवा फुल स्लीव्हस ब्लाऊझ सध्या ट्रेंड इन आहेत. छोटी नथ सध्या ट्रेण्डमध्ये आहेच.
  • फ्लेअर्ड कुर्ती आणि बरोबरीने पलाझो पँट्स खूपच क्लासी आणि कुल लुक मिळवून देईल. सोबत मोठी कलरफुल टिकली लावून लुक पूर्ण करा.
  • लाँग स्ट्रेट कट कुर्ती आणि बरोबरीनेच एखादी ब्रॉड बॉटम पँट हासुद्धा खूप परफेक्ट लुक आहे. यावर छानसे हेवी इयरिंग्स क्लासी लुक मिळवून देतील.

उन्हाळी स्टायलिंग

  • पेस्टल शेड्स वापरताना कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. टॉप आणि बॉटम वेयर्स अगदी विरुद्ध रंगाचे वापरण्यापेक्षा पांढऱ्या रंगाबरोबर त्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसेल. फॉर्मल लुक किंवा ऑफिस वेअरसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तसंच पेस्टल शेड्सबरोबरीने काही पॉप कलर्स वापरूनही तुम्ही लुक पूर्ण करू शकता. उदाहरणार्थ पेस्टल शेडच्या ड्रेसवर एखादं ब्राइट रंगाचं जॅकेट किंवा स्कार्फ उठून दिसेल.
  • लेअरिंग करणार असाल त्या वेळी जॅकेट्स, केप जॅकेट्स, स्कार्फ वापरून लेयरिंग करा. एखादा छानसा क्रॉप टॉप आणि त्यावर पलाझो पँट, स्ट्रेट पँट किंवा शॉर्ट्स टीम अप करून त्यावर केप जॅकेट घालता येईल. एखादा मस्त सिंगल स्टाइप टॉप आणि त्यावर मलचा शर्ट घाला. खूपच सिंपल आणि क्लासी लुक मिळेल.
  • फॉर्मल लुकसाठी तुम्हाला या वेळी खूप पर्याय आहेत. कॉटन किंवा मलमलचा फ्लेअर्ड कुर्ता आणि बरोबरीने स्ट्रेट पँट्स वापरा. एखादा स्ट्रेट कट ड्रेससुद्धा तुम्ही वापरू शकता. जोडीला एखादं मोत्याचे किंवा हिऱ्याचे इअररिंग्स वापरून लुक पूर्ण करा. एखादा मस्त क्रॉप टॉप आणि सोबत स्ट्रेट पॅण्ट, एखादी पलाझो किंवा स्ट्रेट कट स्कर्ट वापरून लुक पूर्ण करा.