पाश्चिमात्यांकडून आलेली ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’संकल्पना नवी म्हणून आपण अंगिकारली. ती संकल्पना आणि मानसिकता आता तिथेच टाकाऊ बनतेय. सध्या तिथे दबदबा वाढतोय- ‘अपसायकलिंग’चा. म्हणजे आपल्या ‘टाकाऊतून टिकाऊ’चा.. या नव्या ट्रेण्डविषयी..

डिझायनर गौरांग यानं पर्यावरणपूरक फॅशन म्हणून यंदाच्या फॅशन वीकमध्ये खादी आणि इतर नैसर्गिक कापडातून वेस्टर्न गाऊन्स तयार केले.

Expectations have risen in the textile industry the countrys second largest business with the budget announcement
आजच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष, निर्यात परतावा कर, जीएसटी आकारणी, कर्ज पुरवठ्याबाबत अपेक्षा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
Loksatta viva Fashion and Statement Influencers Presidential Inauguration
फॅशन आणि ‘स्टेटमेंट’
Siddhivinayak Temple News
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, तोकडे कपडे घातल्यास प्रवेश बंदी; ‘अशी’ आहे नियमावली
NArendra modi Feta
PM Narendra Modi : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी परिधान केलेल्या फेट्याने वेधलं लक्ष; वैशिष्ट्य तर जाणून घ्या!
krushna abhishek bought 3 bhk flat to put new clothes there
प्रसिद्ध कॉमेडियनने कपडे आणि बूट ठेवायला खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट; दर सहा महिन्यांनी बदलतो कपड्यांचे कलेक्शन, म्हणाला…
Festival allowance of Rs 10 thousand for men and Rs 15 thousand for women weavers in state
राज्यातील पारंपरिक विणकरांना मदतीचा हात! राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार ‘उत्सव भत्ता’

नैसर्गिक घटकांपासून बनणारे कपडे आणि त्याचीच फॅशन म्हणजे सस्टेनेबल फॅशन. अशी फॅशन पर्यावरणपूरक असते. सस्टेनेबल फॅशनचा न्यूयॉर्क, मिलान, लंडन इथल्या फॅशन वीकमध्ये शिरकाव झालेला आहे आणि नैसर्गिक प्रेरणेने बनलेली ही फॅशनच चिरंतन टिकणारी असेल हे लक्षात आल्याने सारं जग भारतीय कापडाकडे लक्ष ठेवून आहे. कृत्रिम धाग्यांचे कापड ही पाश्चिमात्य फॅशनची ओळख तर नैसर्गिक धागे आणि हॅण्डलूम ही भारताची ओळख होती. पण आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ात अनेक फॅशन वीकमधून, माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक्सची ओळख लोकांमध्ये होऊ लागली आणि त्यामुळे खादीचा वापर कमी होत होता गेला. आता मात्र खादीचे ग्लोबल अपील लक्षात आल्यानंतर भारतीय डिझायनर पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे बनवण्यासाठीही खादीचा वापर करू लागले आहेत.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर गौरांग मेहता याने खादीच्या कापडापासून फेस्टिव्ह गाऊन्स तयार केले आहेत. ‘हे कापड फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये वापरण्यास योग्य नाही, हा गैरसमज आहे. खादीच्या कापडालाही उत्तम फ्लो असतो. मी तयार केलेले इव्हिनिंग गाऊन्स हेच सांगतात. देशाबाहेर खादी घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. लवकरच मिलान किंवा पॅरिस फॅशन वीकमध्ये माझं भारतीय कापडातून बनवलेलं सस्टेनेबल फॅशनचं कलेक्शन घेऊन मी जाणार आहे,’ असे गौरांग याने लोकसत्ता व्हिवाशी बोलताना सांगितलं.

फॅशनमधले अपसायकलिंग
डिझायनर परोमिता बॅनर्जी हिचं संपूर्ण खादीपासून बनलेलं कलेक्शन तिनं नुकतंच मुंबईच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर केलं. तिच्या मते, खादी हे असं टेक्सटाइल आहे ज्यामुळे कपडय़ाला क्लासी लुक मिळतो आणि त्याचा पुनर्वापरही करता येऊ शकतो. सस्टेनेबल फॅशनमध्ये खादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असं सांगताना तिने बनविलेल्या बटव्यांचं उदाहरण दिलं. ‘गेल्या वर्षीच्या कलेक्शनमधून उरलेल्या कापडातून मी या वेळच्या कलेक्शनच्या अ‍ॅक्सेसरीज बनवल्या. जुन्या खादी कलेक्शनपासून पोटली बॅग्ज (बटवे) बनविल्या आहेत. ज्याला खूपच क्लासी लुक आला आहे,’ परोमितानं सांगितलं. हे फॅशनमधील अपसायकलिंगचंच उदाहरण आहे.

कुर्ता, पायजमा, सलवार कमीज, साडी यापुरतीच मर्यादित असलेली खादी रंगीत होऊ लागली आहे असं दिसतंय. शर्ट्स, टॉप्स, पलाझो, स्कर्ट्सपासून इव्हिनिंग गाऊन्सपर्यंत खादीचा वापर होत आहे. यासंदर्भात डिझायनर मृणालिनी हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, ‘सध्या ग्लोबल फॅशन जगतात नैसर्गिक आणि पुनर्वापर करण्यास योग्य असलेली फॅशन मोठय़ा प्रमाणावर ट्रेण्डमध्ये आहे. भारतीय खादीचा वापर म्हणूनच वाढतोय. भारतीय खादी हे नैसर्गिक आणि पुनर्वापरास योग्य असलेले टेक्स्टाइल आहे. त्याचा फॅशनमध्ये किती चांगला वापर होईल याबद्दल आम्ही डिझायनर्ससुद्धा प्रयत्न करत असतो. जागतिक स्तरावर खादीचा विचार आणि प्रसार भविष्यात नक्कीच वाढणार आहे.’

Story img Loader