आपण कुणाचे पाहुणे म्हणून जातो तेव्हा :
* वक्तशीरपणा महत्त्वाचा असतो. ठरवलेल्या वेळेवर पोहोचणे आवश्यक. उशीर केल्याने टेबल बुकिंगमध्ये गडबड होऊ शकते.
* मनात येईल तिथे बसू नये. कोणी कुठे बसावं हे आपल्या यजमानांनी ठरवायचं असतं. हे बिझनेस एण्टरटेनिंगमध्ये पाळणं खूप महत्त्वाचं असतं.
* आपल्याला स्वत:ला बिल भरायचं नसल्याने, मेन्यूमधले सर्वात महाग पदार्थ ऑर्डर करू नये.
* यजमानांनी सुरुवात केल्यानंतरच आपण जेवायला सुरुवात करावी.
* आपल्या आवडी-निवडींचा बाऊ करू नये किंवा त्याची चर्चा करू नये.
* निघताना यजमानांचे आभार मानावे
आपण यजमान असताना :
* आपल्या पाहुण्यांच्या आवडीनुसार रेस्टराँ निवडावं.
* बिझनेस एण्टरटेनिंग करत असल्यास ओळखीच्या किंवा आधी पारखलेल्या रेस्टराँमध्येच एण्टरटेन करावं. तिथल्या गर्दीची आणि सव्र्हिसची कल्पना येते.
* मेन्यूमधले काही पदार्थ ऑर्डर करून पाहावे म्हणजे किंमत, ‘पोर्शन साइझ’ आणि प्रेझेंटेशनची कल्पना येते. नाहीतर भल्यामोठय़ा प्लेटमध्ये, मोठय़ा सॅलडच्या पानात दडलेला इवलुसा मुख्य पदार्थ शोधायची वेळ येते!
* आपल्या पाहुण्यांचं वय, हुद्दा, पोझिशन आणि त्यांना तिथे पोहोचायला लागणारा वेळ पाहून रेस्टराँ ठरवावं.
* टेबल बुकिंग करायला विसरू नये. नाहीतर महत्त्वाच्या पाहुण्यांना घेऊन रांगेत उभं राहायला लागेल.
* पाहुणे आल्यावर त्यांना कोणी कुठे बसावं, हे नम्रपणे सांगावं.
* अन्न ऑर्डर करायच्या आधी कोणती पेयं त्यांना आवडतील हे विचारावं. जे मदिरापान करत नाहीत त्यांना त्याचा आग्रह करू नये.
* जेवण ऑर्डर करताना आपण पाहुण्यांना स्पेशल डिशेस सुचवू शकतो, पण त्याबाबतीत फार आग्रही असू नये.
* सहसा महिलांनी भिंतीकडे पाठ करून बसावं. सोफा सीटिंग असल्यास त्यावरही महिलांचा हक्क पहिला!
* बिल भरताना आपल्या पाहुण्यांनी त्यासाठी ‘रस्सी खेच’ करू नये म्हणून आपलं क्रेडिट कार्ड अथवा पैसे आधीच मॅनेजरकडे ठेवावे आणि बिल टेबलपर्यंत आणूच नये ही सूचनाही द्यावी. पाहुण्यांचा निरोप घेतल्यानंतरही बिल भरता येतं.
या सदराची सुरुवात आपण भारतीय भोजन शिष्टाचारांपासून केली आणि आता सांगता पाश्चिमात्य किंवा हल्ली ज्याला ग्लोबल म्हटलं तरी चालेल, अशा शिष्टाचारांनी करणार आहोत. वर्षभरात फाइन डाइन एटिकेटबद्दल आपण बोललो. हे करत असताना वेगवेगळे कोर्सेस पाहिले आणि त्यामधले विशेष खाद्यपदार्थ, ते सव्र्ह करण्याची आणि खाण्याची पद्धत याचा विचार केला. ‘फाइन डाइन’मध्ये एण्टरटेन करताना, मग ते सोशल असो किंवा बिझनेससंबंधी असो, काही अलिखित नियम पाळल्याने, एण्टरटेनिंग हा एक सुंदर अनुभव होऊन जातो. आपण कधी गेस्ट असतो तर कधी होस्टही असतो. दोन्ही ‘भूमिका’ करताना आपण काय केलं पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे ते बाजूच्या स्तंभात वाचा. व्हिवामधील या सदर इथे संपत असलं तरी फाइन डाइनबद्दल गप्पा मारण्यासाठी hosquo@gmail.com यावर कधीही संपर्क साधू शकता. (समाप्त)