‘दृश्य अनुभवाविना सौंदर्यशास्त्राची अनुभूती..’ या विषयावर अभ्यास करण्यासाठी जर्मनीला एकटी गेलेली आणि अंध असूनही तिथे सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मनमुराद जगणाऱ्या उर्वीचे अनुभव अनेकींसाठी प्रकाशदर्शी आहेत. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त उर्वीनं ‘विदेशिनी’साठी लिहिलेला हा खास लेख..
मी अगदी हाडाची मुंबईकर. माझा जन्म मुंबईचा, माझे सगळे शिक्षण मुंबईतच झाले. ज्युनिअर कॉलेजची दोन वष्रे मात्र मी पुण्यात फग्र्युसनला होते. तेथे मी जर्मन भाषेचा पर्याय निवडला आणि माझ्या भविष्यातील वेगळ्या मार्गाची पायाभरणी झाली. मुंबईतील गोरेगावच्या पाटकर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्याचबरोबरीने तीन वर्षांत चर्चगेट येथील मॅक्सम्युलर भवन गोथे इन्स्टिटय़ूटमधून जर्मन भाषेचे सहा स्तर पूर्ण करून जर्मन भाषेतील ग्रॅज्युएशन पातळीपर्यंत पोहोचले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून जर्मन स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मास्टर्स झाल्यानंतर लगेचच एका शिष्यवृत्तीवर मला जर्मनीतील स्टुटगार्टजवळील टय़ुिबगन युनिव्हर्सटिीत चार महिन्यांसाठी जाण्याची संधी चालून आली. ते चार महिने माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या कालावधीत युरोपातील एका अतिप्रगत देशातील एक वेगळेच विश्व माझ्यासमोर उलगडले गेले. तेथील समृद्ध आणि शिस्तबद्ध जीवन जवळून बघण्याची व अनुभवण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारख्या एका दृष्टिहीन मुलीसाठी तिथे उपलब्ध असलेले वातावरण अगदी अनुकूल आणि पूर्णपणे सुरक्षित होते. शिक्षणाला पूरक वातावरण, सोयीसुविधा बघून मी जर्मनीतच पुढील उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला. पीएचडी करायची हे तर आधीपासूनच ठरलेले होते. मी ‘यूजीसी’ची ‘नेट’ उत्तीर्ण करून JRF (ज्युनियर रीसर्च फेलोशिप) ही मिळविली. तसेच ‘पीईटी’ परीक्षा देऊन ‘पीएचडी’साठी रजिस्ट्रेशन केले. त्या दरम्यान मुंबई विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत होते.

‘पीएचडी’चा विषय निवडला ‘अॅस्थेटिक्स ऑफ अनसीन’ – ‘दृश्य अनुभवाविना सौंदर्यशास्त्राची अनुभूती’. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असता प्रकर्षांने जाणवले की, भारतीय सौंदर्यशास्त्रात दृश्य अनुभवांबरोबर इतर इंद्रियानुभवदेखील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी महत्त्वाचे असतात असे मानले आहे. याचाच अर्थ असा होता की, दृश्य अनुभवांची कमतरता असली तरीदेखील इतर इंद्रियानुभव सौंदर्याचा रसास्वाद करण्यास सक्षम असतात व ते कुठेही कमी पडत नाहीत. याउलट जर्मन तत्त्ववेत्ते Kant and Schopenhaur आदींच्या मते दृश्यानुभव हा एकमेव अनुभव रसास्वाद घेण्यास सक्षम असून जर तो नसेल तर सौंदर्यास्वाद घेणे शक्य नाही. या दोन परस्परविरोधी दृष्टिकोनांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मी हा विषय प्रबंधासाठी निवडला; परंतु यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, साहित्य मुंबईत उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या नामांकित जर्मन विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीच्या शोधात होते.

मला DAAD (जर्मन अॅकॅडमिक एक्स्चेंज सíव्हसेस) यांच्यातर्फे पीएचडीसाठी शिष्यवृत्ती मिळाली. यासाठी बरीच धावपळ करावी लागली, पण या शिष्यवृत्तीमुळे मला माझे स्वप्न पूर्ण होणार आणि एका नवीन जगात पदार्पण करावयास मिळणार याचा अतिशय आनंद झाला. या सर्व प्रक्रियेत मला माझ्या मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी मार्गदर्शक डॉ. विभा सुराना यांनी दिलेल्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाबद्दल आभार मानायलाच हवेत. त्यांनी मला जर्मन विद्यापीठात दुसरा मार्गदर्शक शोधण्यासदेखील मदत केली. माझ्या मुंबई विद्यापीठातील ३/४ वर्षांच्या कालावधीत डॉ. मेहेर भूत यांनी मला अनेक कसोटीच्या क्षणी बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि आधार दिला.

३० सप्टेंबर २०१४ हा दिवस मुंबईतून निघण्याचा ठरला. मी जर्मनीला एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेस साहजिकच घरच्यांनी कडाडून विरोध केला, पण माझा आत्मविश्वास पाहून त्यांनी परवानगी दिली. घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर जाणार याचे वाईट वाटत होते. मला तेथे मला स्वत:ची जबाबदारी घ्यायची होती, एकटीने स्वतंत्ररीत्या जगायचे होत, याचे चांगलेच टेन्शन आले होते. तशी मुंबईत मी स्वतंत्रपणे फिरत होते, प्रवास करीत होते; परंतु दुसऱ्या देशात जाऊन पूर्णपणे अपरिचित वातावरणात स्वत:ची जबाबदारी घेऊन स्थिरस्थावर होण्याचे धाडस मला करायचे होते.
शेवटी विमानतळावर पोहोचले. बाबांचा हात सोडताना भरून आले; पण क्षणभरच! फ्रॅन्कफर्टला पोहोचल्यावर तिथून ग्योटींगेनला जाण्यासाठी ट्रेनने दोन तास लागले. ग्योटींगेन स्थानकावर उतरल्यानंतर पुढील सगळी व्यवस्था तेथील डिपार्टमेंटने केली होती. ग्योटींगेन ही एक छोटीशी विद्यापीठ नगरी असून तेथील नागरिक निसर्गप्रेमी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक चालत अथवा सायकलने प्रवास करतात. मीही माझे सामान घेऊन मदतनीसाबरोबर चालतच हॉस्टेलवर पोहोचले. हॉस्टेलमधील माझ्या रूमवर पोहोचल्यानंतर मी एकदम रिलॅक्स झाले. ती मदतनीस मुलगी निघून गेल्यानंतर हॉस्टेल रूममधील ती संध्याकाळ, ती शांतता, तो एकांत माझ्यासाठी बरेच काही होता.

दुसऱ्या दिवशी हॉस्टेलच्या सामूहिक स्वयंपाकघरात एका चायनीज मुलीशी ओळख झाली. आज ती मुलगी माझी अतिशय जवळची मत्रीण झाली. जर्मनीतील इतर विद्यापीठांप्रमाणे ग्योटींगेनमध्येही विविध देशांतील मुले/मुली शिक्षणासाठी आहेत. जर्मनव्यतिरिक्त चीन, हाँगकाँग, तवान, इराण, कझाकिस्तान इत्यादी देशांतील बरेच मित्रमत्रिणी झाल्या आहेत. मी जर्मन अस्खलित बोलत असल्यामुळे येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांबरोबर सूर जुळण्यास जास्त विलंब लागला नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी तुझे जर्मनीत शिक्षण झाले आहे का? असा प्रश्न विचारून माझ्या भाषाकौशल्याला नकळत दाद दिली आहे.
जर्मनीतील सर्व विद्यापीठांमध्ये शारीरिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. अंधासाठी येथे टॉकिंग सॉफ्टवेअर, व्हॉइस आऊटपुट, स्कॅनर्स, ब्रेल िपट्रर्स आणि ऑडिओ बुक्स सहजरीत्या उपलब्ध असतात. फ्रँकफर्ट, बíलन, हॅम्बुर्ग, मारबुर्ग, मुन्सटर अशा काही मोठय़ा शहरांमध्ये मोठय़ा टॉकिंग लायब्ररीज आहेत. तुम्ही जर या वाचनालयांचे सभासद असाल तर तुम्हाला हवे असलेले ऑडियो बुक्स जर्मनीतील कुठल्याही शहरात पोस्टाने विनामूल्य पाठविले जाते. ऑडियो बुक ही आमच्यासाठी एक लक्झरी आहे. कोणाच्याही मदतीशिवाय डोळस वाचकांप्रमाणे आम्हाला वाचनाचा मनमुराद आनंद घेता येतो.

येथे लेक्चर्सना नियमित उपस्थिती फार महत्त्वाची असते. प्राध्यापकांइतकेच विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य असते. माझ्या येथील पीएचडी मार्गदर्शक डॉ. आंद्रिया बोगनर या अतिशय संवेदनशील व प्रयोगशील अशा हाडाच्या शिक्षिका आहेत. येथील एक प्राध्यापक मिसेस कोरेना अल्ब्रेष्ट या त्यांच्या प्रेमळ व कनवाळू स्वभावाने माझ्यासारख्या घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना मायेचा हात देतात. इथे अंधांसाठी बसेस, ट्राम, ट्रेनने प्रवास मोफत आहे. तसेच जर एकटय़ाने प्रवास करायचा असेल तर पूर्वसूचना देऊन तुम्हाला मदतीस उपलब्ध करून दिला जातो. कॉन्फरन्सेस व सेमिनारसाठी मला दुसऱ्या शहरात जावे लागते. एकटीने लांब पल्ल्याचा प्रवास करणे आणि हॉटेलमध्ये एकटे राहणे याची मजा काही औरच.
माझ्या मते, सांस्कृतिक उपक्रमांसाठी जर्मनी हा स्वर्गच आहे. मी एका जर्मनीतील राष्ट्रीय पातळीवरील ब्लाइंड ऑथर्स असोसिएशनची ((BLA) सभासद आहे. वर्षांतून दोन वेळा त्यांचे हॉर्न बाड माइनबर्ग संमेलन भरते. तेथे आम्ही सर्व सभासद एका हॉटेलमध्ये रहातो. या हॉटेलचे वैशिष्टय़ म्हणजे हे हॉटेल खास अंध ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून डिझाइन केले आहे. तेथे राहाणे हा माझ्यासाठी एक अद्वितीय अनुभव असतो.

जर्मन नागरिक हा अतिशय सुजाण असून जागरूक आहे. अंध वा अपंगासाठी येथे कोणीही दया अथवा सहानुभूती दाखवत नाही. तुम्हाला जर मदत हवी असेल तर विचारूनच तुम्हाला हवी असलेली मदत ते तत्परतेने करतात. इकडे रस्त्यावरून जाताना पादचारी, बस ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, सगळे जण मदत करतात. विशेषत: वरिष्ठ नागरिक आर्वजून मदतीचा हात पुढे करतात. मी प्राणिप्रेमी आहे. इकडे आल्यानंतर मी एक हॅमस्टर घेतले. त्यासाठी सुंदर छोटेसे घर व बरीचशी खेळणीही घेतली आहेत. त्याला स्वत:च्या हाताने दर दिवशी वेगवेगळे नटस्, चेरीज भरविणे हा माझा छंद आणि विरंगुळा झाला आहे. मी राहाते त्या शहराच्या दुसऱ्या टोकाला एक मांजरींचे अॅडॉप्शन सेंटर आहे. प्रत्येक शनिवारी तेथे मांजरींना खेळविण्यासाठी, खायला घालण्यासाठी जाणे हा माझा कार्यक्रम ठरलेलाच असतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक – की जो मुंबईत असतांना मी कधीही केला नव्हता. घरी आई आणि स्वयंपाकीणबाई असल्यामुळे स्वयंपाकघरात जाण्याचा संबंधच आला नाही, पण इथे येण्याआधी जवळजवळ महिनाभर आईने मला इलेक्ट्रिक कुकरच्या मदतीने काही मोजकेच, पण आवश्यक (वरण, भात, आमटी व काही भाज्या) करायला शिकवले होते. इकडे आल्यानंतर त्या टिप्सच्या आधारे आईने शिकवलेले आणि काही कॉन्टिनेंटल पदार्थही करायला लागले. एकटीने सुपर मार्केटमधून वाणसामान घेण्यापासून ते घरात अगदी व्यवस्थित लावण्यापर्यंत मी सारी कामे करते. मी हल्ली उत्तम स्वयंपाक करावयास लागले असून स्वत:ही भरपेट खाते व मित्रमत्रिणींनाही खाऊ घालते. शाकाहारी-मांसाहारी दोन्ही चालत असल्याने माझी इकडे तशी चंगळच आहे. अर्थात- आहे मनोहर तरी.. हे सगळे काही असले तरी मी माझा देश, माझे घर, माझे कुटुंबीय अतिशय मिस करते.

– उर्वी जंगम,
ग्योटिंगेन, जर्मनी

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com