गेल्या शुक्रवारी वसुंधरा दिन साजरा झाला. पर्यावरणपूरक जीवनशैली ही आजची गरज असल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात आलं. पण वेगवान जीवनशैलीच्या जमान्यात जुन्याकडे पुन्हा वळून बघण्यासाठी वेळ आहे कुणाला? प्रत्येक वस्तूचा पूरेपूर वापर करण्याची भारतीयांची सवय आता आपल्याकडेच ‘पुराने जमाने की’ मानली जाते आणि ‘यूज अॅण्ड थ्रो’मानसिकता नवी म्हणून आपलीशी करावीशी वाटते. पण ही मानसिकता चिरकाल टिकणारी नाही. ती आपण पाश्चिमात्यांकडून घेतली आणि आता तिथेच ती संकल्पना टाकाऊ बनतेय. सध्या तिथे दबदबा वाढतोय- ‘अपसायकलिंग’चा. रिसायकलिंगसोबत अपसायकलिंग ही संकल्पना आता जगात सगळीकडे आपलीशी केली जाऊ लागली आहे. अपसायकलिंग म्हणजे आपलं ‘टाकाऊतून टिकाऊ’. जुन्या वस्तू, कपडे फेकून देण्याऐवजी त्यापासून कलात्मक आणि उपयुक्त काही बनवण्याची युक्ती. अपसायकलिंग हा रिसायकलिंगचा कलात्मक अवतार. म्हणजे नुसताच पुनर्वापर नाही, तर वापरलेल्या वस्तूपासून सौंदर्यपूर्ण आणि नवी कलाकृती निर्माण करायची. हे पर्यावरणपूरक कलात्मक काम करणाऱ्या काही तरुण कलावंतांची आणि त्यांच्या कलाकृतींची ओळख ही ओळख..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा