आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘काय व्ही’डेला स्पेशल?’, ‘अगं ती फोटोफ्रेम घे. आवडेल तुझ्या बॉयफ्रेंडला’, ‘मुलांना काय द्यायचं कळतंच नाही बघ’, ‘मुलींना काय आवडेल नेम नाही, दोन र्वष ओळखतो तिला, पण.. गिफ्ट देताना कन्फ्यूजन होतं अजून.’ आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काही तरी घेताना थोडं गोंधळायला होतं खरं. कारण त्याच्या/ तिच्या लक्षात राहणारं काही तरी द्यावंसं वाटतं आणि तेच नेमकं सुचत नाही. आपल्याकडे व्हॅलेंटाइन्स डे हा गेल्या काही वर्षांत गिफ्ट मार्केटिंगनेच मोठा झालेला सण असल्याने या दिवसात बाजाराच बक्कळ पर्याय उपलब्ध असतात.

व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त खास कलेक्शनही बाजारात येतं आणि काही सेलसुद्धा सुरू असतात. व्हॅलेंटाइन्स डेची धामधूम ऑनलाइन बाजारात जास्त दिसतेय. आताच्या काळात गिफ्ट शॉपमध्ये जाऊन गिफ्ट्स विकत घेणारे कमी होत आहेत. ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे आणि नोटबंदीमुळे ऑनलाइन खरेदीची सवय आणखी लागली आहे. व्हॅलेंटाइन्स डेचं सेलिब्रेशन घरच्यांना न सांगता होणार असेल तर जरा जपून. तुम्ही घरी नसताना गिफ्ट डिलिव्हर व्हायचं आणि नेमकं नको त्या माणसाच्या हाती पडायचं. बाकी या एका क्लिकच्या शॉपिंगचे बरेच पर्याय आहेत हे खरं. ऑनलाइन शॉपिंग साइट्स नुसती गिफ्ट्स विकतात असं नाही तर गिफ्टिंग आयडियादेखील देतात. काही फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवर अशा गिफ्टिंग आयडिया फिरत आहेत. पण त्यातलंसुद्धा नवीन काय आणि ट्रेण्डी काय हे शोधायला हवंच. या वर्षी गिफ्ट्समध्ये असे कुठले हटके पर्याय उपलब्ध आहेत यावर एक नजर..

पर्सनलाईज्ड अ‍ॅक्सेसरीज- तुमच्या किंवा पार्टनरच्या नावाचं डिझाइन असलेली अ‍ॅक्सेसरी घेऊ शकता. पार्टनरचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन अशा प्रकारे कॅलिग्राफी केलेले, वेगवेगळी प्रतीकं चितारलेले दागिने नक्कीच विचारात घेता येतील. मुलींसाठी ब्रुच, इअररिंग्ज, अंगठी, नेकलेस, बेसलेट, नोजपिन्स तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. मुलांसाठी हॅट, ब्रेसलेट, अंगठी, टाय यांचा विचार करता येईल.

लव्ह मेसेज लिहिलेल्या उशा, नॅपकिन्स सध्या मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत. मुलींना हमखास आवडणारी गिफ्ट म्हणजे मोठासा टेडी बेअर.

मेसेज बॉटल सेट – हा ट्रेण्ड सध्या सगळीकडे दिसतोय. छानशा काचेच्या बाटलीमध्ये आपल्या मनातील भावना लिहून ती बॉटल गिफ्ट करायची ही कल्पना आहे अफलातून. अशा सुंदर मेसेज बॉटल्सचे सेट अनेक गिफ्ट शॉप्समध्ये बघायला मिळतील. शिवाय हे ऑनलाइनही दिसतात.

रोझ िरग होल्डर विथ म्युझिक – सुंदर संगीताच्या सोबतीने आपल्या जोडीदाराला िरग देऊन प्रपोज करायची नामी कल्पना. रिंग होल्डरचे असंख्य कलात्मक प्रकार ऑनलाइन बाजारात बघायला मिळतील. सोबत फिंगर रिंग बॉक्समध्येही भरपूर व्हरायटी आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day gifts valentine day special