थंडीची फॅशन हिट करणाऱ्या भरपूर कूल अॅक्सेसरीज बाजारात आल्या आहेत. गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर, जॅकेट, झिपर, स्टोल, स्कार्फ यांच्या जोडीला फूटवेअर आणि अॅक्सेसरीज कशा प्रकारे टीमअप करावी त्याबद्दल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिवाळ्याच्या फॅशनसंदर्भात आपण बऱ्यापैकी जागरूक असतो, पण अॅक्सेसरीज कशा टीम-अप कराव्यात याबाबत गोंधळ होतो. आपल्या कपाटात स्कार्फ, स्वेटर, जॅकेट, स्टोल्स, वुलन कॅप अशा गोष्टी एव्हाना वर आल्या असतीलच. फुलस्लीव्हज टॉप्स आणि ड्रेस, हाय नेक टीदेखील कपाटाबाहेर आलं असेल. बऱ्याचदा याबरोबर हाताला लागेल ते कानातले आणि त्यावर असेल ते फूटवेअर घालून बाहेर पडाल तर हिवाळ्याच्या फॅशनचं कूल स्टायलिंग चुकेल. कपडय़ांसोबतच ट्रेण्डी अॅक्सेसरीज विंटरचा कूल लुक पूर्ण करतात.
अँकल बूट्स
आउटडोअर मिटिंग्स किंवा इन्फॉर्मल मीट अप्ससाठी अँकल बूट्स अगदी साजेसे आहेत. स्कर्ट्स, डेनिम्स, पँट्स अशा कोणत्याही आउटफिटसाठी हे बूट्स शोभून दिसतात. हे बूट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. थंडीत पायाचं संरक्षण करतात बरोबरीने फॅशन स्टेटमेंट म्हणूनसुद्धा अगदी योग्य आहेत. हे बूट्स घेताना आपण कशासाठी आणि कशावर घालणार आहोत ते लक्षात घेऊन रंग निवडावा. ब्लॅक, ब्राउन, मरून हे कलर नेहमीच चांगले दिसतात.
ब्लॉक हिल्स
ब्लॉक हिल्स सध्याच्या सीझनमध्ये खूप ठिकाणी दिसताहेत. एखाद्या फॉर्मल ड्रेसबरोबर किंवा जॅकेट आणि ट्राउझर्सबरोबर या हिल्स टीम अप होऊ शकतात, तशा स्कर्ट्स, डेनिम्स यावरही होतात. फुल शर्ट, कुर्ती, कुलॉट्स या सगळ्यावर बॉक्स हिल्स मस्त दिसतील.
स्नीकर्स
मागच्या हिवाळ्यापासून सुरू झालेला स्नीकर्सचा ट्रेण्ड अजूनही मागे पडलेला नाही. स्नीकर्स पूर्वी केवळ जीन्स किंवा ट्रॅकपँटवर वापरल्या जात. आता मात्र कोणत्याही आउटफिटसाठी स्नीकर्स वापरायची फॅशन आली आहे. थंडीसाठी स्नीकर्स उत्तम. पायांचे संरक्षण करतानाच ट्रेण्डी लुक मिळवून देणारे स्नीकर्स वुलन ड्रेस, मॅक्सी ड्रेस, डे ड्रेस, लेदर जॅकेट, डेनिम स्कर्ट, कुर्ती या सगळ्या प्रकारच्या कपडय़ांवर बिनधास्त वापरा.
मोजडी
पारंपरिक मोजडी सध्या चलतीत आहेत. लग्नकार्यासाठी फेस्टिव्ह वेअरवर वापरायच्या मोजडय़ा हल्ली वेस्टर्न वेअरवरदेखील घातल्या जातात. घुंगरू असलेली मोजडी, गोंडेदार मोजडी, थ्रेड वर्क केलेली मोजडी सध्या बाजारात उपलब्ध आहे. मोजडय़ांमुळे इंडो वेस्टर्न लुक तुम्हाला मिळेल. नेहमीची सिम्पल जीन्स आणि टॉप घातला तरीही मोजडी त्याबरोबर टीम अप करता येतात. स्वेटर, स्कार्फ, शॉल याबरोबर मोजडी नक्कीच उठून दिसेल.
अॅक्सेसरीज वापरण्याच्या टिप्स
- स्कार्फची स्टाइल ठरवताना आऊटफिटची फॅशन बघून स्कार्फ स्टाइल करावा.
- स्कार्फ आणि कपडय़ाच्या रंगसंगतीकडे आणि प्रिंट्सकडे आवर्जून लक्ष द्यावं.
- गोंडय़ाची ज्युलरी घालताना शक्यतो स्वेटरशी कॉन्ट्रास्ट ज्युलरी घालावी.
- स्वेटर हाय नेक असेल तर लाँग नेकपीस घालावा क्लासी लुक मिळेल.
- कोट घालणार असाल तर आतील कपडय़ाला साजेशी ज्युलरी घालावी. लाँग बोहेमियन नेकपीस कोट्सबरोबर मस्त दिसतील.
- वुलन कॅप घातली असेल तर मोठय़ा इअरिंग्स नक्की घालाव्यात.