श्रवणदोषावर मात करत, प्राणिप्रेमाचा वसा जोपासणारी डॉ. निवेदिता सांगतेय पशुवैद्यक म्हणून राजस्थानच्या खरेखडी या खेडय़ात काम करतानाचे तिचे अनुभव. निवेदिता सहा महिन्यांपूर्वी चिपळूणला पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झाली आहे.
नमस्कार मंडळी.. आमचं मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. अडीच वर्षांची झाले तरी बोलत नसल्यामुळं मला डॉक्टरांकडं नेल्यावर श्रवणदोष hearing impaired असल्याचं निदान झालं. त्यानंतर आमच्या कुटुंबाचं आयुष्य बदललं. सगळे जण माझ्या स्पीच थेरपी आणि ट्रेनिंगमध्ये गुंतले. मला सर्वसाधारण मुलांच्या शाळेत घातलं गेलं. दुबईतल्या इंडियन हायस्कूल, पार्ले टिळक विद्यालय आणि गोकुळधाम हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झालं. सगळ्याच शिक्षकांनी आणि मित्रमैत्रिणींनी मला समजून घेऊन मदत केली. दहावीत ८४.६ टक्के मिळाले. ज्युनिअर कॉलेजला डी. जी. रुपारेल कॉलेज आणि B.V.Sc & AH (बॅचलर इन व्हेटर्नरी सायन्स अँड अॅनिमल हसबंड्री) आणि पुढं M.V.Sc. साठी बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मला नेहमीच ‘यू कॅन’ हेच शिकवलं गेलं. ‘यू कान्ट’ हे शब्द माझ्या शब्दकोशात नव्हतेच. कुठंही ‘बिच्चारी’ म्हणत माझ्यावर दया दाखवण्याचा प्रकार झाला नाही. कधी झालाच, तर त्याकडं दुर्लक्ष करून पुढं जाण्याचा निश्चय मनाशी झाला होताच; पण समाजात वावरताना कधीकधी आपल्याला दुखावणारे प्रसंगही येतात. माझ्या ताईचं ठरत आलेलं लग्न, मला नीट ऐकू येत नाही म्हणून मोडलं, तेही सुशिक्षित स्थळ असून. मला बॅचलर्सला ७६.६ टक्के गुण मिळूनही, याच कारणास्तव सुरुवातीला M.V.Sc.साठी प्रवेश नाकारण्यात आला. या गोष्टींनी खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अपंगत्वाच्या भीतीपेक्षा माझ्या कर्तृत्वाचं कौतुक आहे, अशा घरात ताईचं लग्न झालं. तसंच M.V.Sc साठी प्रवेशासाठी पुन्हा अपील करून प्रवेश मिळाल्यावर ८४ टक्के गुण मिळवत मास्टर्स पूर्ण केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा