‘युथ इज इक्वल टू म्युझिक..’ हे समीकरण तुम्हाला मान्य आहे का? येता-जाता, उठता-बसता सतत म्युझिक ऐकणं हे तरुणाईचं एक कॉमन लक्षण आहे. सतत त्यांच्या कानात काही तरी वाजत असतं. त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या गॅझेटसच्या साहाय्यानं तरुणाई म्युझिक ऐकतेय. त्यांना संगीतातला कोणताही प्रकार वज्र्य नाहीये. रॉक, हिप-हॉप, पॉप म्युझिक, फोक, क्लासिकल, लाइट, गझल, अल्बम्स नि वैविध्यपूर्ण म्युझिक ऐकलं-पाहिलं जातंय. लगोलग ते शेअर केलं जातंय.
या म्युझिकची जादू आहे तरी काय? ते अनेकांचा बिघडलेला मूड घडवतं. कुणी असाइनमेंटस् करताना, कुणी कुणाच्या स्मृती जपण्यासाठी, तर कुणी संगीतप्रेमी म्हणून म्युझिक ऐकतं. कुणी केवळ मालिकेचं शीर्षकगीत किंवा त्यातलं प्रासंगिक गीत आवडतं म्हणून बाकी मालिका न बघता तेवढंच ऐकतात, तर कुणी फक्त टीपी म्हणूनच. मोबाइलच्या कॉलर टय़ूनपासून ते बाइकच्या हॉर्नपर्यंत संगीताचं लोण सगळीकडं पसरलंय. सध्या ठिकठिकाणी होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात तरुणांचा सहभागही लक्षणीय असतो. ते रागदारी मन लावून ऐकतात, तसंच शिवमणीच्या तालावर डोलतात, स्वप्निल बांदोडकरच्या गाण्यावर झुलतात नि ‘लुंगी डान्स’वर धुमाकूळ घालतात. एकुणात काय, तर म्युझिक म्हणजे जणू ‘धूम मचाले धूम’..
सध्या मराठी गाण्यांत ‘टाइमपास’मधलं ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गाणं हिट होतंय. स्वप्निल बांदोडकर ‘माझी गाणी’ या अल्बममधली ‘मंद मंद’, ‘घन आज बरसे’ ही गाणी गाजताहेत. ‘लाइफ इज ब्युटिफुल’ या अल्बममधलं ‘कुछ यारी कुछ मस्ती’ हे स्वप्निल बांदोडकर, योगिता चितळे यांचं गाणंही आवडतंय. वैशाली सामंतचं ‘स्वर पावसात भिजतात’ या अल्बममधलं गाणंही ऐकलं जातंय. एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं ‘निशिगंध’ या अल्बममधलं ‘लहरत लहरत’ हे गाणं श्रवणीय आहे. त्याखेरीज ‘मुंबई पुणे मुंबई’तलं हृषीकेश रानडेचं ‘कधी तू’, ‘झेंडा’मधलं ज्ञानेश्वर मेश्रामचं ‘विठ्ठला’, ‘नामंजूर’ या अल्बममधलं सलील कुलकर्णी-संदीप खरे यांची ‘ही तरुणाई’ ही गाणी अजूनही ऐकली जाताहेत.
िहदी गाण्यांत ‘आशिकी २’मधलं अरिजित सिंगचं ‘तुम ही हो’, ‘यह जवानी हैं दिवानी’तलं रेखा भारद्वाजचं ‘घागरा’, ‘रामलीला’तलं श्रेया घोषाल नि उस्मान मीरचं ‘ढोल बाजे’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’मधलं अतिफ अस्लमचं ‘मं रंग शरबतों का’ नि ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधलं हनीसिंगचं ‘लुंगी डान्स’ ही गाणी हिट आहेत.
इंग्रजी गाण्यांपकी ‘प्रिझम’ या अल्बममधलं केटी पेरीचं ‘ट्र रोअर’, ‘ट्रथ अबाऊट लव्ह’मधलं ‘जस्ट गिव्ह मी द रिझन’ , ‘फन’ अल्बममधलं ‘वुई आर यंग’, ‘मूस’ या अल्बममधलं ‘सम नाइट्स मॅडनेस’, ‘मायलो झायलोटो’चं ‘पॅराडाइज’ ही गाणी युथला आवडताहेत. ‘व्हिवा वॉल’मध्ये तरुणाईनं म्युझिक प्रेम शेअर केलंय..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा