वजन नियंत्रणात असणं ही फक्त चांगलं दिसण्यासाठी नाही तर फिटनेसच्या दृष्टीनं आवश्यक बाब आहे. त्यासाठी उपासमार आणि आवडत्या पदार्थावर बंदी हेच काही एकमेव सोल्युशन नाही. ख्यातनाम न्यूट्रिशनिस्ट डॉ. सरिता डावरे त्यासाठी ‘लिव्ह वेल डाएट’चा उपाय सुचवतात.
आजघडीला वजन कमी करण्याकडे केवळ सौंदर्यवृद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. निरोगी शरीर आणि आनंदमय जीवन हे सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशील जीवनमान आणि योग्य आहार यातून साध्य होतं. वजन कमी करणं म्हणजे उपासमार आणि आवडत्या खाद्यपदार्थावर बंदी हे समीकरण मांडण्याचे दिवस आता मागे पडलेत. आपल्या शरीराचं काम कसं चालतं, याबद्दल आज जागरूकता आहे. त्यातून एकूणच निरोगी, निरामय आयुष्यासाठीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.  
लिव्ह वेल डाएट हा सर्वसमावेशक कार्यक्रम असून संतुलित आणि निरोगी आयुष्य मिळावं या उद्दिष्टानं या आहारपद्धतीची संरचना केलेली आहे. जगात कुठलेही जादूई परिणाम घडवून आणणाऱ्या उपाययोजना नसतात. तुम्हालाच सुयोग्य मार्ग शोधावा लागतो तेही खाणं-पिणं, विश्रांती, आरोग्य, शारीरिक-मानसिक कृती याबाबत योग्य पर्यायांची निवड करून. पण त्यासाठी काही सूत्र पाळणं आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वत:वर प्रेम करा
आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करायला हवा, अशी इच्छा मनात निर्माण होण्यामागं अनेक कारणं असू शकतात; परंतु या कारणांपकी दीर्घकाळ परिणाम टिकून राहणारी आणि उद्दिष्ट साध्य होण्यास मदत करणारी कारणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं आणि स्वत:ला महत्त्व देणं.

जसा तुमचा आहार, तसे तुम्ही
आपण जो आहार घेतो त्याला आपलं शरीर थेट प्रतिसाद देत असतं. आपला आहार हा फक्त शरीराचं बाह्य़रूप, आकारमान आणि अंतर्गत रचना ठरवत नाही तर आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. आपल्या सवयी आणि आवडीनिवडींनुसार जे अन्न ग्रहण केलं जातं, त्याचा जीवनावर परिणाम होत असतो. जर अन्नाची निवड असमंजस आणि चुकीची असली तर शरीरात अनेक महत्त्वपूर्ण अन्नघटकांची कमतरता निर्माण होते, शरीरातील विविध क्रियांमध्ये बिघाड होतो, विष संचयन होतं, भावनिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि शरीर ऊर्जाहीन होतं.

सक्रिय व्हा
योग्य आहार हा आरोग्य संवर्धनाचा एक भाग आहे, दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शारीरिक चलनवलन. व्यायामामुळे चयापचय क्रिया उद्दीपित होते आणि शरीर कार्यक्षम राहातं. चालणं, योगक्रिया आणि आसनं अशा व्यायामांपासून मन उल्हसित राहातं आणि उत्कृष्ट जीवनप्राप्तीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक प्रेरणा मिळते.

खा आणि वजन घटवा !
सोपं, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचं योग्य तंत्र यांच्या वाढत्या मागणीवर मी ‘द लिव्ह वेल डाएट’ हे उत्तर दिलंय. पुरेसं खाऊनही वजन कमी होऊ शकतं आणि वजन कमी होण्याबरोबरच अंतिमत निरोगी आरोग्याची प्राप्ती महत्त्वाची असते.
डॉ. सरिता डावरे

आराम करा
मधुमेह आणि हृदयविकार अशा जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या विकारांमध्ये ताणतणाव हे महत्त्वपूर्ण कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. मनावरील दबाव वा ताणतणाव हा बाह्य़ घटकांमुळे असो वा स्वत:च स्वत:वर लादलेला असो, यातून तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरतो. उत्कृष्ट जीवन याचा अर्थ शक्य तितकं तणावमुक्त जीवन जगणं, विश्रांतीसाठी पुरेसा वेळ देणं आणि स्वत:चे छंद वा मनोरंजनाच्या माध्यमांतून आनंद प्राप्त करणं. पुरेशी शांत झोप, ध्यानधारणा आणि विश्रांती चांगल्या जीवनासाठी जरुरी आहेत.

गतीपेक्षा दिशेला महत्त्व
अनेकदा उत्कृष्ट नियोजन असूनही कार्यवाही भरकटत जाऊ शकते. अनेकदा अचानक उद्भणारे प्रसंग, कौटुंबिक समारंभ, प्रवास आणि सहभोजने यांच्यामुळे आहारपद्धती अनुसरण्यात अडचणी निर्माण होत असतात. या अडचणींसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं पाळली तर तुम्हाला पथ्य पाळण्यासाठी कमीत कमी ताण वा अस्वास्थ्य जाणवेल. पण लक्षात असू दे प्रगतीमध्ये गतीपेक्षा दिशेला महत्त्व असतं.

कष्टाविना नाही उद्धार!
जुन्या सवयी या आचरणाचा भाग झालेल्या असतात आणि त्यात परिवर्तन घडवणं तितकं सोपं नसतं. म्हणून नव्या आहारपद्धतीशी जुळवून घेणं हे तुमची चिकाटी आणि निर्धार यांची परीक्षा पाहाणारं असतं. चमकदार गुलाबजाम, मलईदार, मधुर खाद्यपदार्थ आणि चमचमीत, कुरकुरीत तळलेल्या वस्तूंकडे हात वळू न देण्यासाठी तुमच्या मनातील निर्धार सतत जागृत ठेवावा लागतो.

अपयशी झालात तरी लक्षात ठेवा
 तुम्ही किती वेळा पडता हे महत्त्वाचं नसून उभारी धरत पुन्हा योग्य मार्गावर येता की नाही हे जास्त महत्त्वाचं असतं. निर्धारापासून ढळणं हे नराश्यकारक असतं. पण ध्येयावरील लक्ष्य विचलित होऊ न देता तुम्ही पुन्हा योग्य मार्गावर परत येणं हे जास्त महत्त्वाचं असतं.

काळजी सोडा, आनंदी राहा
स्वास्थ्यसंपन्न आयुष्याच्या मार्गावरील प्रवासात सकारात्मक भावना आणि कार्यप्रवणता इंधनाप्रमाणे काम करतील. आनंदी, निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी जरुरी ती साधनसामग्री तुमच्याकडे असेल. मनातली भीती काढून टाका आणि आनंदी व्हा!
(पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘लिव्ह वेल डाएट’ या  आगामी पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश)

डाएट मॅनेजमेंट
डाएट पाळत असताना मधल्या वेळी तीव्र भूक लागल्यावर खाण्याची उत्कट वासना नष्ट करण्यासाठी खालीत गोष्टी खाव्यात. फक्त त्याचा अतिरेक करू नये. दिलेल्या प्रमाणातच खाद्यपदार्थ खावेत.
* २ खजूर किंवा सुके अंजीर
* १ चौरस इंच गुळाची चिक्की – चणा किंवा तिळाची
* थोडे गूळ-चणे
* १ चुरमुऱ्याचा लाडू
* १ मोसंबं अथवा संत्रं
खाण्याची उत्कट इच्छा सतत असण्याची समस्या उद्भवली तर खालील उपाय अजमावून पाहा :
मन दुसरीकडे वळवा : अन्नावर जडलेलं मन दुसरीकडे वळवलं तर फायदा होऊ शकतो.
थोडी माघार घ्या : वासना जडलेल्या अन्नपदार्थाचा लहानसा तुकडा तोंडात टाका. त्या चवीनं तुमचं समाधान होईल. फारच खावासा वाटतो आहे, अशा प्रत्येक पदार्थाची चव घ्या, पण खाऊ नका.
दुसरा कोणता तरी आरोग्यदायक अन्नपदार्थ खा : त्यापासून कदाचित फायदा होईल. उदा. मिल्क चॉकलेटच्या ऐवजी कडू चॉकलेट.
बिनसाखरेचं च्युइंगम चघळा : तोंड हलतं राहिल्यामुळे आणि िमटच्या स्वादामुळे कदाचित मदत होईल.
दात घासा : बरोबर वाचलंत. दात घासल्यावर तोंड ताजंतवानं राहातं आणि गोड िमटच्या स्वादानं ही खाण्याची उत्कट इच्छा शमते.
भुकेचं व्यवस्थापन
भूक कधीही तुमच्यावर हल्ला करू शकते आणि तुमचा निर्धार, सद्हेतु आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना निष्फळ करते.
भुकेच्या कळा शमवण्यासाठी खाली दिलेल्या अन्नपदार्थापकी एका दिवसात जास्तीत जास्त दोन पदार्थ खावेत वा प्यावेत.
१ ग्लास ताक (२०० मिली), १ ग्लास नारळपाणी (२०० मिली), १ ग्लास कोल्ड कॉफी (२०० मिली),
१ मोसंबी / संत्री, २ बदाम / अक्रोड, २ खजूर / सुके अंजीर, १ छोटी वाटी (१०० मिली) भाजलेले चणे, मूग डाळ किंवा चना जोर गरम.
२- ३ चहाचे चमचे जवस
बिनसाखरेचं च्युइंगम चघळण्याचाही फायदा होऊ शकतो.