स्वत:ला ‘एक्स्प्लोअर’ करण्यासाठी, चांगल्या शिक्षणाची व करियरची आस धरत कितीतरी मैत्रिणी आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून एका वेगळ्या प्रवासाला निघतात… घरापासून दूर राहून स्वतला सिद्ध करण्याच्या! गर्दीत हरवून जाणे ते गर्दीत एक स्वतंत्र चेहरा बनण्याच्या या प्रवासाविषयी..
‘वेक अप सिड’ मध्ये कोंकणा सेननं रंगवलेली ‘ आयेशा’ आणि ‘कॉकटेल’ मध्ये दीपिकानं साकारलेली ‘वेरोनिका’.. खरं तर दोन किती वेगळ्या व्यक्तिरेखा.. त्या दोघींना जोडणारा दुवा एकच..त्यांचं एकटं राहणं.
स्वतला ‘एक्स्प्लोअर’ करण्यासाठी, चांगल्या शिक्षणाची व करियरची आस धरत यंगीस्तानातल्या कितीतरी फ्रेंडस् आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून एका वेगळ्या प्रवासाला निघतात. घरापासून दूर राहून स्वतला सिद्ध करण्याचा प्रवास. गर्दीत हरवून जाणे ते गर्दीत एक स्वतंत्र चेहरा बनणे हा प्रवास!
घर सोडून एकटं राहताना कुटुंबाची, मित्रमत्रिणींची आठवण येऊन अगतिक वाटणं अगदी साहजिक! ‘बीइंग अलोन’चं फििलग कॉमन असलं तरी त्याच्याशी डील करायची प्रत्येकाची पद्धत निराळी.
लातूरहून इंजिनीयर बनायचं स्वप्न घेऊन दोन वर्षांपूर्वी अमृता पुण्यात आली ती काहीतरी नवीन शिकायच्या निर्धारानेच.. सुरुवातीला इथल्या ‘कल्चर’मध्ये रुळायला अवघड गेलं थोडं.. आईच्या जेवणाला आता मेस च्या डब्याने ‘रीप्लेस’ केलं होतं. जेवणाची चव आवडेना म्हणून आधी कधी चहा करायलासुद्धा स्वैपाकघरात न जाणारी ही मत्रीण मन लावून स्वैपाक करायला शिकली..आधी कधी खर्चाचा हिशोब न ठेवणारी आता बाबांनी खात्यात महिन्याला टाकलेले पसे पुरवून पुरवून वापरायला शिकत होती. स्वतला इमोशनली कणखर बनवू पाहत होती.. एका वेगळ्या साच्यात स्वतला ‘मोल्ड’ करत होती. तेही आनंदाने…
लातूरहून इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगून पुणं गाठलं, तेव्हा सुरुवातीला इथल्या ‘कल्चर’मध्ये रुळायला वेळ लागला. – अमृता
आई-बाबा एकाच शहरात असताना वेगळं घर घेऊन मुलीने एकटीने राहणं आजही आपल्याकडे रुचत नाही. पण मी ठाम होते. – नमिता
सुरतहून साडेचार वर्षांपूर्वी पुण्यात आले तेव्हा मराठीही बोलता येत नव्हतं. इथे ओळखीचं कुणी नव्हतं. पण अनुभवातून शहाणी होत गेले. – नीरजा
दहावीनंतरच सुरतहून खास फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकायला म्हणून आलेली नीरजा आज साडेचार वर्षे झाली, एकटी पुण्यात राहते आहे. नीरजा सांगते, ‘जेव्हा मी अकरावीला पुण्यात आले तेव्हा एक तर मला मराठी अज्जिबात कळायचं नाही आणि माझे कुणीही नातेवाईक किंवा ओळखीचे लोक पुण्यात राहात नव्हते. त्यामुळे होस्टेलवर, कॉलेजमध्ये फार एकटं वाटायचं. कधी आजारी पडले तरी आपापली एकटीच जायचे डॉक्टरकडे. कित्येकदा तर सगळं सोडून घरी परत जायची इच्छा व्हायची.’
एका मत्रिणीला तर एकटं राहताना एक विचित्रच अनुभव आला. ती सांगते, ‘ मी रोज कॉलेजला जाताना एक मुलगा माझ्या मागे मागे यायचा.. काही करायचा नाही बोलायचा नाही. पण मागे यायचा. मला प्रचंड भीती वाटायची तेंव्हा. एक दिवस मी त्याला विचारायचं ठरवलं आणि चांगलीच रागावून आले त्याला.. त्याला चांगलाच दम भरला. पण त्यानंतर मीसुद्धाजरा घाबरले होते. त्या क्षणी नेमकं काय फििलग होतं ते शब्दात नाही पकडता येत. या प्रकारातून मी स्वतची सेफ्टी कशी करायची त्याबद्दल शिकले.’
घरापासून दूर एकटं राहतानाचा हा प्रवास ‘ क्विट’ करायला कितीतरी कारणं सापडली असती. आपल्या ध्येयावर, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत या मत्रिणी वाटचाल करत राहिल्या.
‘जेंव्हा मला छान मित्र-मत्रिणी मिळाले, तेव्हा माझं लोनलीनेसचं फििलग दूर झालं. मी हॉस्टेलवर राहते म्हणून फ्रेंडस् तर माझी काळजी घ्यायचेच, पण त्यांच्या घरचेही माझे लाड करायचे. जेव्हा तुमच्या वाढदिवशी तुमच्या मत्रिणीची आई खास तुमच्यासाठी घरी केक बनवून पाठवते आणि तिची आजी कुशीत घेऊन हळूच तुम्हाला खाऊसाठी पसे देते, तेव्हा डोळ्यात पाणी न आलं तरच नवल.. इतकी भरभरून प्रेम करणारी माणसं मिळाली म्हणूनच मी इथे राहू शकले.’ नीरजा आता छानपकी मराठी बोलत तिचे अनुभव सांगते.
‘आई-बाबा एकाच शहरात राहत असताना वेगळं घर घेऊन मुलीने एकटीने राहणे’ ही संकल्पना आजही आपल्याकडे फारशी रुचत नाही. पण नमिता मात्र तिच्या निर्णयाबाबत अगदी क्लियर आहे. ‘यूके’हून मास्टर्स करून परतल्यावर एका शाळेत नोकरी करता करता ती तिचा ग्राफोलॉजीचा छंद जोपासत होती. हळूहळू तिच्या ग्राफोलॉजी क्लासचा पसारा वाढला आणि तिने नोकरी सोडली. आता तिला क्लाससाठी मोठय़ा जागेची गरज होती म्हणून तिने घराजवळ एक जागा शोधली. तिला स्वतंत्रपणे राहून बघायचं होतं. जेव्हा तिने हा विचार आई-बाबांजवळ बोलून दाखवला तेव्हा त्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला एकटीने राहायची परवानगी दिली. नमिताच्या मते, भारतातल्या लोकांना ‘फ्रीडम’चा खरा अर्थच उमगला नाहीये अजून. कारण मिळालेल्या फ्रीडमसोबत एक रिस्पॉन्सिबिलीटी पण येते. ती म्हणते, ‘आपण फार उशिरापर्यंत आपल्या आईबाबांच्या पदराआड लपून राहतो आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची टाळतो. आज मी माझ्या घरातल्या अगदी स्वयंपाकापासून ते झाडूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी करते. एकटी राहून मी माझं आयुष्य अधिक सजगपणे आणि जबाबदारीने जगते आहे. मी आजही आई, बाबा, आजी यांच्याशी तितकीच कनेक्टेड आहे. वाटलं की लगेच भेटून येते त्यांना.. आई-बाबांनी माझ्या निर्णयाला समजून घेतलं म्हणून मी आज जास्त आदर करते त्यांचा..’ नमिता तिचं आयुष्य तिच्या पॅशनने, तिच्या स्वातंत्र्याने सजवते आहे.
पंख पसरवून उंच भरारी मारण्यासाठी घरटय़ातून बाहेर पडलेल्या या मत्रिणी त्यांना येत असलेल्या प्रत्येक अनुभवानिशी अधिकाधिक शहाण्या होत गेल्या. आजूबाजूला कित्येक प्रलोभनं असताना काहीतरी हॅपिनग घडत असतानाही आपल्या प्रायोरीटीज् ओळखून वागायला शिकल्या. आपापल्यासाठी एक चौकट आखून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला शिकल्या. परीक्षांची टेन्शन्स, अभ्यासाचे ताण एकटय़ाने मॅनेज करायला शिकल्या. बाहेरच्या जगाशी एकटय़ाने ‘डील’ करायचा कॉन्फिडन्स त्यांनी अंगी बाणवला.
घर सोडून राहणे ही एक संधी आहे, स्वतला घडवण्याची, आपल्या लाईफला आपणच आकार देण्याची. ‘न्यू गर्ल इन द सिटी’ ते ‘ इट्स माय सिटी’पर्यंतचा प्रवास अर्थातच जरा अवघड असणार आहे, पण त्यातून झालेलं ‘लìनग’ आपल्याला माणूस म्हणून खूप काही शिकवणारे असेल.
कधीतरी मागे वळून या प्रवासाकडे पाहताना या मत्रिणींना समाधानच असेल. कारण एव्हाना त्या धडपडणाऱ्या सुरवंटाचं फुलपाखरू झालं असेल. स्वतला घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या धडपडय़ा मत्रिणींना फुलपाखरू होण्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
चित्र – अनुप्रिया अंधोरीकर