मितेश रतिश जोशी

कोणताही सण म्हटलं की त्यानिमित्ताने केले जाणारे पदार्थ म्हणजे जिव्हातृप्ती सोबतच आत्मानंद देणारे असतात. नाताळ सणाच्या निमित्ताने आनंद व्यक्त करण्यासाठी देशोदेशी बनवल्या जाणाऱ्या पदार्थाविषयी वाचूयात आजच्या व्हिवामध्ये..

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग

नाताळचा सण हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण. महिनाभर आधीपासून त्याची तयारी सुरू होते. नवं वर्ष सुरू होईपर्यंत नाताळचं सेलिब्रेशन सुरू असतं. कोणताही सण म्हटलं की त्यात केले जाणारे पदार्थ हा एक अविभाज्य भाग असतो, कारण कोणताही आनंद व्यक्त करण्याचा एक मार्ग खाणंपिणं हासुद्धा आहे. नाताळच्या निमित्ताने देशोदेशी कोणते केक केले जातात, हे जाणून घेण्यासाठी पुण्यातील पेस्ट्री शेफ रत्नाकर जपे याच्याशी संवाद साधला असता, देशोदेशी बनवल्या जाणाऱ्या केकला वेगळी नावं आहेत व त्यासाठी वापरले जाणारे जिन्नसही निराळे आहेत, अशी माहिती त्याने दिली. ‘पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये बनवल्या जाणाऱ्या केकला ‘बोलो रे’ असं म्हणतात. हा केक मुकुटाच्या आकाराचा बनवला जातो. त्यामध्ये सुकवलेली फळं आणि ड्रायफ्रुट्स भरली जातात. स्पेनमध्ये किंग्स डे या ख्रिसमसच्या शेवटी असणाऱ्या उत्सवासाठी ‘रोस्का द रेज’ हा विशेष केक बनवला जातो. या केकमध्ये क्रीम आणि सुकवलेल्या फळांचं मिश्रण असतं. याखेरीज एक छोटी राजा-राणीची प्रतिकृती बनवून या केकमध्ये लपवली जाते. केक कापल्यावर ज्याच्या वाटयमला ही प्रतिकृती लपलेला तुकडा येतो त्याला त्या दिवशी विशेष मान दिला जातो. त्या व्यक्तीला पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या केकची ट्रीट द्यावी लागते. फ्रान्समध्ये ख्रिस्मसच्या स्पेशल डिनरनंतर ‘ल बॉश द नोएल’ हा केक डेझर्टमध्ये दिला जातो. यात लाइट स्पॉन्ज केक रोल चॉकलेट किंवा कॉफी क्रीमच्या आइसिंगने सजवला जातो. हा केक झाडाच्या खोडाच्या आकाराप्रमाणे तयार केला जातो. या केकचं डेकोरेशन करताना पानं, फुलं, फ्रेश बेरीजचा वापर केला जातो. आइसलॅण्डमध्ये खास ख्रिसमसकरिता ‘विनरतेर्ता’ हा केक बनवला जातो. सात व्हॅनिला केकच्या नाजूक थरांमध्ये व्हॅनिला बटर क्रीम, बदामाच्या क्रीमचे थर लावून हा केक केला जातो’ असं त्याने सांगितलं.

याशिवाय, स्वित्झर्लण्डमध्ये बुनस्ली (स्वीस ब्राऊनी), झिमस्टेन (दालचिनीच्या स्वादाचा केक), कोकोनट मॅक्रोन आणि बस्लर लकेर्ली अशा खास केकची मेजवानी देत ख्रिसमस साजरा होतो. इटलीमध्ये ख्रिसमसकरिता बऱ्याच प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. परंतु आजही इटलीमधील पारंपरिक ख्रिसमस केक ‘पांटोने’ हा आहे. हा केक बनवण्याची सुरुवात मिलानमध्ये झाली. रोमन साम्राज्यात हा केक मधाबरोबर खाल्ला जायचा. हा केक बनवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे, अशी माहिती रत्नाकरने दिली. नॉर्वेमध्ये ‘क्रान्स केक’ नावाचा पिरॅमिडच्या आकाराचा केक केला जातो. याला टॉवर केक असंही म्हणतात. क्रान्स केकमध्ये कुकीज आणि केक दोघांचाही समावेश असतो. बदाम, आइसिंग शुगर आणि अंडयमतील पांढरा भाग याच्या एकत्रित मिश्रणातून हा क्रान्स केक करतात. या केकचं डेकोरेशन फार मस्त असतं. बॉन बॉन, लॉलीज, स्पार्कल्स आणि नॉर्वेच्या छोटयम छोटयम  झेंडयमच्या साहाय्याने हा केक सजवला जातो, असं रत्नाकरने सांगितलं.        

ख्रिसमसच्या निमित्ताने देशोदेशी बनवल्या जाणाऱ्या कुकीजबद्दल सांगताना ठाण्यातील ‘डोटोपीया’ या क्लाऊड किचनची शेफ मीरा जोगळेकर म्हणाली, ‘ख्रिसमससाठी झिमस्टेरन ही ताऱ्याच्या आकाराची खास बिस्किटं जर्मनीमध्ये बनवली जातात. बदाम, दालचिनीचा वापर करून चांदणीच्या आकारांत बनवलेल्या या बिस्किटांवर साखरेचं पांढरेशुभ्र कोटिंग असतं. स्वित्झर्लण्डमध्ये ख्रिसमसकरिता खास चारबेल कुकीज बनवण्याची परंपरा आहे. या कुकीज स्पेशल गिफ्ट बॉक्समध्ये भरून मित्र-मैत्रिणींना दिल्या जातात. या कुकीज बनवताना खास बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपच्या स्वादामुळे या कुकीज वेगळय़ा लागतात. नाताळच्या निमित्ताने मॅझिपॅन किंवा मॅझिपिन हा बदाम किंवा काजूपासून बनवला जाणारा पदार्थ केला जातो. त्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवतात. ते सकाळी सोलून त्यात गुलाबपाणी, साखर घालून वाटून घेऊन मग हे मिश्रण पॅनमध्ये लोण्यासह एकत्र करतात. त्यात गुलाबाचे इसेन्सही घालतात, थोडे पाणी आणि दूध घालून ढवळतात. मग पॅन बटर सोडत मिश्रण घट्ट झाले की ते गरम असताना मोल्डमध्ये सेट करतात. त्याचबरोबर नाताळनिमित्ताने जिंजर ब्रेड आणि जिंजर कुकीज बनवल्या जातात त्याचीही माहिती मीराने दिली.  ‘सुपरमार्केटमध्ये जिंजर ब्रेडचे तयार पीठ विकत मिळते. पीठ विकत आणून आपल्या घरातल्यांच्या आवडीनुसार सॉफ्ट केक किंवा क्रिस्पी बिस्किट तयार करता येते. वसई गावात तर चक्क डोनट्स घरी बनविण्याची परंपरा आहे. त्यासाठी अर्धा किलो मैदा, १०० ग्रॅम दही, ५० ग्रॅम तूप, एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, चिमूटभर खाण्याचा सोडा, एक अंडं, ५० ग्रॅम रवा, पाव किलो साखर हे सर्व एकत्र करून मऊ मिश्रण बनवतात. लगेच डोनट्स बनवायला घेतात. साच्याच्या सहाय्याने आकार देऊन गरम तेलात डीप फ्राय करून घेतात’ असं शेफ मीरा सांगते.

     मुंबई पवई येथील ‘मेहुला द फर्न’ या हॉटेलचे शेफ परिमल सावंत यांनी नाताळच्या निमित्ताने भारतात व विशेष करून मुंबई जवळच्या भागात तयार होणाऱ्या पारंपरिक केकची व इतर पदार्थाविषयी माहिती दिली. शेफ परिमल म्हणाले, ‘आजकालचे खवय्ये दोन भागात विभागले गेले आहेत. काहींना पारंपरिक पदार्थ खायचे असतात. तर काहींना त्या निमित्ताने होणारे फॅन्सी पदार्थ खायचे असतात. आम्हाला दोन्ही गटाचा कायम विचार करावा लागतो. नाताळच्या निमित्ताने होणाऱ्या पदार्थाची यादी फार मोठी आहे. केकचे असंख्य पारंपरिक व घरगुती प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये सुके खोबरे आणि रव्यापासून बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक केकना मागणी खूप जास्त आहे. हा केक घरीदेखील बनवला जातो व बाहेर विकतही मिळतो. नाताळमधील दुसरा पारंपरिक केक म्हणजे ‘रेवाळ’. वसईमध्ये हा केक चुलीवर बनवला जातो’. रेवाळ हा केक नाताळ खाद्यसंस्कृतीमधील सर्वाधिक जुना केक असल्याचे सांगत तो बनवण्याची प्रक्रियाही शेफ परिमल यांनी सांगितली. ‘रेवाळ बनवण्यासाठी एक लिटर नारळाचे दूध, त्यात ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ (रव्यासारखे जाड) घेतात. त्यात एक ओला नारळ किसून घालतात. मग वेलची आणि रंग येण्यासाठी अगदी चिमूटभर हळद किंवा इतर कृत्रिम रंगही घालतात. हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घेतात. ते चिवट किंवा चिकट झाल्यावर काढून कूकरमध्ये किंवा वाफवण्याच्या भांडयमत ताटाला तूप लावून थंड न करता असेच घालतात. १५-२० मिनिटे वाफवून घेतात की झाले तयार, पण याचा स्वाद अधिक वाढविण्यासाठी १५ मिनिटांनंतर आच पूर्णपणे बंद करून संपूर्ण रात्र केक कुकरमध्येच ठेवला जातो. त्यामुळे हा केक आणखी चविष्ट लागतो. गाजर आणि खजुराचा केक प्रकाशझोतात जरी आले नसले तरी हे केक बनवायला अगदी सोपे व स्वादिष्ट आहेत. दह्याचा घरगुती केक हा वसईमधील स्थानिक पारंपरिक केक आहे.  त्यासाठी दोन वाटयम दही, एक वाटी साखर आणि २०० ग्रॅम तेल एकजीव करून घेतात. त्यात थोडा थोडा करत एक वाटी मैदा घालतात. मग १०० ग्रॅम कस्टर्ड पावडर, एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण एकत्र करून ते दोन तास ठेवतात. नंतर तूप लावलेल्या भांडयमत बेक करतात. हा केक कुकरमध्येही करता येतो. शिट्टी काढून व पाणी न ठेवता मंद आचेवर अध्र्या तासात हा केक तयार होतो’, असं त्यांनी सांगितलं.

केकच्या व्यतिरिक्तही अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यापैकीच एक जुजब. हा पदार्थ पपईचा रस काढून आटवून साखरेचा पाक एकत्र करून बनविला जातो. या जुजुब कँडीज मुंबईत चर्चच्या बाहेर विकायला असतात. ख्रिश्चनांचे काही पारंपरिक पदार्थ आपल्या मराठमोळय़ा पदार्थाशी मिळतेजुळते असतात. जसं पारंपरिक ख्रिसमस कलकल हा पदार्थ शंकरपाळयांसारखा असतो. ज्याप्रमाणे मैद्याचे शंकरपाळे तळले की तयार होतात. अगदी तसंच त्यांना तळून केवळ साखरेच्या पाकात मुरवले की ख्रिसमस स्पेशल कलकल हा पदार्थ तयार होतो. हिंगोळे हासुद्धा नाताळमध्ये केला जाणारा करंजीसारखा असणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. चण्याच्या डाळीचं सारण वापरून हिंगोळे बनवले जातात, अशी माहिती शेफ परिमल यांनी दिली.     

सध्या बाजारातही विविध प्रकारचे केक आले असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे. वेगवेगळय़ा हॉटेलमध्येही नाताळच्या निमित्ताने खास मेन्यू डिझाइन करण्यात आला आहे. प्लम केक, ब्लॅक फॉरेस्ट , पाइनअ‍ॅपल, रेड वेलवेट झेब्रा, ब्राऊनी स्क्वेअर, कुकीज चॉकलेट अशा प्रकारचे केक उपलब्ध असून चॉकलेट, दंडी आलमेण्ट आणि प्लम केकला सर्वात जास्त मागणी आहे. लहान मुलांसाठी असलेल्या मनुका केकलाही खूप मागणी आहे. त्याशिवाय, बनाना ब्रेड, कप केक्स, चॉकलेट मूस, चॉकलेट मिंट पॅन्डी, स्विस रोल्स विथ चॉकलेट, प्लम केक, न्यूरिअस, मार्श मेलो, जिजुक्स, जेली, चेरी, मर्जीपॅन, लॉलीपॉप, कुकूलस, स्मोबॉल, डेटरोल, वॉलनट पॅज, आणि मिल्क क्रीम आदी विविध पदार्थही बाजारात दाखल झाले आहेत.

viva@expressindia.com

Story img Loader