सध्या चर्चेत आहेत ती अमेरिकेच्या फर्स्ट लेडीची फॅशन स्टेटमेंट्स! फर्स्ट लेडी म्हणजे अमेरिकेच्या प्रेसिडेंटची अर्धांगिनी. देशाची फर्स्ट लेडी म्हणून ती ओळखली जाते आणि प्रेसिडेंटच्या इनॉगरेशन अर्थात शपथविधीनंतरचा पहिला डान्स याचं महत्त्व मानलं जातं. अमेरिकेच्या पहिल्या प्रेसिडेंटपासूनच ही पद्धत चालत आली आहे.
कपड्यांवरून माणूस ओळखला जातो ही आपल्याकडची पहिल्यापासूनची धारणा आहे. एकच आउटफिट किंवा कपडा कधी, कोण, कुठे, किती वेळासाठी, कोणत्या माणसांच्यात आणि कसा परिधान करतो त्यावरून अनेक गोष्टी ठरतात, अनेक निष्कर्ष निघतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कपडे कोणी घातले आहेत, यावरून मग त्या कपड्यांचा किती तपशीलवार विचार करायचा हे ठरवलं जातं. तुम्ही-आम्ही घातलेले कपडे, एखाद्या इन्फ्लुएन्सरने घातलेले कपडे, शिक्षक, अॅक्टर, राजकारणी अशा वेगवेगळ्या प्रोफेशन्सवरून ठरतं की त्यांच्या कपड्यांना किती महत्त्व द्यायचं. सध्या चर्चेत आहेत ती अमेरिकेच्या फर्स्ट लेडीची फॅशन स्टेटमेंट्स! फर्स्ट लेडी म्हणजे अमेरिकेच्या प्रेसिडेंटची अर्धांगिनी. देशाची फर्स्ट लेडी म्हणून ती ओळखली जाते आणि प्रेसिडेंटच्या इनॉगरेशन अर्थात शपथविधीनंतरचा पहिला डान्स याचं महत्त्व मानलं जातं. अमेरिकेच्या पहिल्या प्रेसिडेंटपासूनच ही पद्धत चालत आली आहे.
यावेळी असं काय वेगळं झालं की मेलोनीया ट्रम्प यांच्या ड्रेसकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं? का एवढं महत्त्व दिलं जातं फर्स्ट लेडीच्या फॅशनला? अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचा इतिहास सांगतो की फर्स्ट लेडीच्या आउटफिटवरून त्यांच्या स्टेटमेंटचा अंदाज घेतला जातो. आतापर्यंत झालेल्या फर्स्ट लेडीजपैकी काहींनी मिरवण्यासाठी फॅशन स्टेटमेंट केले नाही. तर त्यांना स्वत:च्या फॅशनमधून काहीतरी संदेश द्यायचा होता. आणि आपली विचारधारा लोकांच्या लक्षात यावी या उद्देशाने त्यांनी चोखंदळपणे आपापली फॅशन निवडली. आणि म्हणूनच फर्स्ट लेडीच्या आऊटफिटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं.
अमेरिकी जनतेत लोकप्रिय राहिलेल्या या फर्स्ट लेडीजपैकी काहींनी फॅशनच्या बाबतीत देशी फॅब्रिकला तर काहींनी देशी डिझायनर्सना प्राधान्य दिलं. काहींनी स्किन कलरचा विचार न करता आऊटफिटचा रंग निवडून रेसिझम अर्थात वर्णवादाला प्रत्युत्तर दिलं. तर काहींनी ब्राइट कलर निवडून त्यापद्धतीचे कपडे निवडणं पसंत केलं. त्यांच्यापैकी काही प्रचंड लोकप्रिय होत्या, तरीही त्यांनी सिंपल राहून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी त्यांच्या गाऊन्सचे रंग, फॅब्रिक, स्टाइल या सगळ्यांचा त्यांनी अत्यंत बारकाईने विचार केला.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही दुसरी टर्म. पहिल्यांदा त्यांच्या शपथविधीच्या वेळी मेलोनीया ट्रम्प यांनी बबली बेबी ब्लू रंगाचा नी-लेन्थ ड्रेस परिधान केला होता, मात्र यावर्षी त्यांनी ब्रॉड-रिम हॅट, आणि तिही काळ्या रंगाची हॅट निवडली. त्या ब्रॉड-रिम मुळे त्यांचा चेहरा, डोळे आणि एक्स्प्रेशन संपूर्ण झाकले जात होते. त्यांची ओळख दिसेल, मात्र डोळे दिसणार नाहीत अशा पद्धतीने ती हॅट स्टाइल केली गेली होती. काळ्या-पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर त्यांनी काळा कोट परिधान केला होता, जो त्यांनी इनडोअरलादेखील काढायचं नाकारलं. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकीर्दीपेक्षा यावेळी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्र ते हातात घेत असताना त्यांच्या फर्स्ट लेडीने फॅशनमधून खूपच वेगळं म्हणणं मांडलं आहे आणि त्यामुळेच ते चर्चेत आलं आहे.
माणसाचं व्यक्तिमत्त्व, त्याचं म्हणणं त्याच्या कपड्यावरून दिसतं असं म्हटलं जातं. पहिल्या इम्प्रेशनला एवढं महत्त्व याच कारणामुळे प्राप्त होतं. मात्र अमेरिकेसाठी त्यांच्या फर्स्ट लेडीचं फॅशन स्टेटमेंट हे त्यांच्या प्रेसिडेंटच्या येत्या पुढच्या कार्यकाळाची झलक देतं असं म्हटलं जातं. ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हा नारा यावेळी दिला आणि तोच त्यांच्या फर्स्ट लेडीनेही सांभाळला. अमेरिकेला प्राधान्य देणारी विचारसरणी आपलीशी करायचा हा विचार देण्यासाठी अमेरिकन डिझायनर्सचे कपडे मेलोनीया ट्रम्प यांनी परिधान केले होते. त्याच वेळी चेहरा अर्धा झाकून आपल्याबद्दल पूर्ण कल्पना न येऊ देण्याचं आणि अवास्तव प्रसिद्धीपासून दूर राहण्याचं तत्त्वही त्यांनी जाहीर केल्याचं जाणवतं.
आपल्याकडे राजकारण्यांचे, अॅक्टर्सचे, मोठ्या बिझनेसवुमनचे कपडे जसे स्टेटमेंट मेकिंग असतात, तसेच अमेरिकन फर्स्ट लेडीच्या मांदियाळीनेही कपड्यांच्या फॅशनमधून स्वत:ची भूमिका स्पष्ट करायची परंपरा आजवर पार पाडलेली आहे.
viva@expressindia.com