आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं भेटत असतात. कोणाशी कामाच्या निमित्ताने संपर्क असतो, कोणी आवडनिवड सारखी असते म्हणून एकमेकांशी जोडले जातात, तर काहींची गरज म्हणून ते एकत्र असतात. या ना त्या कारणाने त्यांच्यात एक नातं तयार होतं. मैत्रीचं! असं नातं ज्यात वय, वजन, रंग, स्वभाव, पगार या आणि अशा असंख्य अटी-नियमांचं ओझं नसतं. खरंतर मैत्रीची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते. कोणाला मैत्री म्हणजे प्रेम वाटतं, कोणाला मैत्री म्हणजे आयुष्य; कोणाला मैत्री म्हणजे आनंद वाटतो. तर कोणाला कुटुंबातच मैत्रीचा धागा सापडतो. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा भारतासह अन्य काही राष्ट्रांमध्ये मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो, यंदा ४ ऑगस्ट रोजी मैत्री दिन आहे.

फ्रेंडशिप डे अर्थातच पाश्चात्त्य संस्कृतीचा भाग आहे. पॉप कल्चरद्वारे फ्रेंडशिप बँडचे व्यापारीकरण झालं. मैत्री साजरी करण्यासाठी गिफ्ट्स, बँड्स, ग्रीटिंग यांची गरज भासू लागू लागली. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी राष्ट्रीय स्तरावर मैत्री दिन साजरा करण्यात येऊ लागला. यासंदर्भात एक गोष्ट सांगतात की, युनायटेड नेशन्सद्वारे ‘विनी द पूह’ याला आदर्श मित्र समजलं जातं. १९८८ मध्ये यूएन जनरल असेंब्लीने पूह बीअर हा सहचर, निष्ठा आणि मैत्रीचा संदेश देण्यासाठी आदर्श प्रतीक असल्याचं घोषित केलं. तो दिवस ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्यात येतो. आपल्याकडे कॉलेजच्या आजूबाजूच्या वातावरणातील रंग बदलू लागले की फ्रेंडशिप डे जवळ आल्याची जाणीव होते. कॉलेजमध्ये उत्सवाचे वातावरण तयार होते. जवळपासच्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डेचे बॅण्ड दिसू लागतात. पूर्वी केवळ सॅटिन्सच्या रिबिन्स आपलं लक्ष वेधून घेत होत्या, पण आता मात्र फ्रेंडशिप डेच्या दिवशी हातात घातल्या जाणाऱ्या बॅण्डची जागा ब्रेसलेटने घेतली आहे. हे ब्रेसलेट वर्षभर फॅशन म्हणूनही हातात घातले जातात. सध्या या ब्रेसलेटमध्ये क्रिस्टल ब्रेसलेटची खूप चलती आहे. विविध कलर्समध्ये उपलब्ध असलेली ही ब्रेसलेट्स अनेकांना आकर्षून घेत आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या क्रिस्टलचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. ते गुणधर्म समाजमाध्यमांवरील रिल्सच्या माध्यमातून तपासून घेतले जात आहेत. एकमेकांना क्रिस्टल ब्रेसलेट भेट देण्याकडे मुलांचा कल जास्त आहे. क्रिस्टलबरोबरच रुद्राक्ष बॅण्ड्सही आता तरुणांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. यामध्ये खास मुलांसाठी रुद्राक्ष बॅण्डस् उपलब्ध आहेत, ज्यामध्ये महादेव किंवा शंभोसारखी नावं मधोमध आहेत. बॅण्ड बांधण्यासाठी असलेल्या धाग्यामध्येही विविध व्हरायटी आहेत. यामध्ये काहींना लटकन, घुंगरू पाहायला मिळत आहेत. क्रिस्टल आणि रुद्राक्ष ब्रेसलेट घेताना त्यात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

ब्रेसलेटमध्ये फ्रेंडशिप ब्रेसलेटची सुद्धा खूप चलती आहे. यामध्ये विविध रंगातील धाग्यांनी ओवलेली ब्रेसलेट तर आहेतच, पण आता बिड्सची ब्रेसलेट्सही उपलब्ध आहेत. काही बॅण्ड तर नुसते धाग्यांपासून तयार करण्यात आलेले आहेत. याला घुंगरू किंवा तुमच्या नावाचे अक्षर पाहायला मिळेल. तसेच कलाकुसर केलेले विविध नवीन पर्याय बाजारात आहेत. यात लोकरीच्या धाग्यांपासूनही तयार केलेले बॅण्डस आहेत. काही बॅण्डस तर पाहताक्षणी घ्यावेसे वाटतात. मुलांसाठी असलेल्या बॅण्ड्समध्ये डिझाइन्स आणि कलर्स वेगळे आहेत हे पाहताक्षणी लक्षात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून मुलींसाठी बांगड्यांच्या आकारांमध्येही फ्रेंडशिप बॅण्ड उपलब्ध आहेत. बांगडीवर कलाकुसर करून हे बॅण्ड बनवण्यात येतात. यामध्ये दोन रंगाचे धागे एकत्र करून डिझाइन्स तयार केले जातात. तुम्हाला यावर काही अक्षरं किंवा कुणाला द्यायचंय त्या व्यक्तीचं नावसुद्धा टाकून मिळेल. केवळ एका रंगातील बांगड्यांचे बॅण्ड्सही उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हवा तो रंगही मिळेल. पिवळा, लाल, गुलाबी या धाग्यांनी बांगड्या सजवलेल्या पाहायला मिळतील. त्यातील तुम्हाला हव्या असलेल्या बांगड्या निवडू शकता.

फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स रंगायला लागले असतील. कुठे भटकायला जायचं का? की घरीच बसून कल्ला करायचा? ते आता ठरलं असेलच. पण अजूनही सेलिब्रेशन प्लॅनवर मित्रांचं एकमत होत नसेल तर हे काही पर्याय आजमावून पाहता येतील…

भटकंती

सगळ्या कंपूला एकत्र भेटायची नामी संधी या निमित्तानं मिळते. तेव्हा एक पावसाळी पिकनिक नाही निघाली तरच नवल. वीकेंड आल्याने फ्रेंडशिप डेला भटकंती करता येईल. पावसाळा असल्याने सर्व नियमांचे पालन करत ट्रेकिंग किंवा धबधब्यावरची भटकंती मित्रांबरोबर आयोजित करता येईल. मुंबई-पुणे यांच्या मध्यावर असलेल्या लोणावळा येथील कातळधार धबधबा, कुणे फॉल्स, झेनिथ फॉल्स, भूशी डॅम या ठिकाणी किंवा ताम्हिणी घाट परिसरातील रिंग धबधबा, मिल्किबार, देवकुंड आणि सिक्रेट स्पॉट या ठिकाणी भेट देऊ शकता. तुमचा ग्रुप ट्रेकिंगप्रिय असेल तर प्रश्नच नाही. नेहमीचा ट्रेक करून कंटाळलात तर वॉटर राफ्टिंग, रॉक क्लाईम्बिंगसारख्या साहसी खेळांना प्राधान्य देता येईल.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !

दमदार कलाकारांचा ताफा असलेला ‘घरत गणपती’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे गंभीर भूमिकेच्या माध्यमातून ‘लाईफलाईन’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे दोन मराठी चित्रपट पाहात तुम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करू शकता. त्याचबरोबर ‘बारदोवी’, ‘औरों मे कहां दम था’, ‘उलझ’सारख्या चित्रपटांबरोबरच मार्व्हलप्रेमींसाठी ‘डेडपूल अॅण्ड वुल्वरिन’ दोघंही चित्रपटगृहात तळ ठोकून आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचा चित्रपट पाहात फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करू शकता.

नमन नटवरा…

तरुणाई ही नाट्यवेडी असते, त्यामुळे चित्रपटापेक्षा नाटकात रमणाऱ्यांसाठी सध्या नामवंत कलाकारांचा फौजफाटा असलेल्या ‘वस्त्रहरण’ या विनोदी नाटकाचे तसेच ‘चारचौघी’ या नाटकाचे रंगभूमीवर शेवटचे काही प्रयोग सुरू आहेत. याशिवाय, ‘जर तरची गोष्ट’, ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘नियम व अटी लागू’ सारख्या तरुणांशी संबंधित असलेल्या विषयांचे नाट्यप्रयोगही एकत्र एन्जॉय करू शकता.

होम थिएटर

मित्रांना घरीच बोलावून कल्ला करण्याचा प्लॅन असेल तर ऑल टाइम हिट अँण्ड फेव्हरेट चित्रपटांपैकी एखादा पुन्हा बघायला काय हरकत आहे? तुम्ही कॉलेजमध्ये असताना लेक्चर्स बंक करून मारलेला फर्स्ट डे फर्स्ट शो आठवून पुन्हा एकदा घरी तेच चित्रपट लावून मजा करता येईल. ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘थ्री इडियट्स’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘स्टुडंटस् ऑफ द इयर’, ‘रॉकस्टार’, ‘रंग दे बसंती’, ‘धूमधडाका’… असे कितीतरी चित्रपट आहेत.

टाईम इज मनी

सध्याच्या सॉलिड बिझी शेड्युलमध्ये वेळ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची झाली आहे. म्हणूनच वेळात वेळ काढून आपल्या ग्रुपला भेटलात तर तेच एक मोठं गिफ्ट ठरेल. त्यासाठी जंगी पार्टीच करायला हवी असं नाही. सगळ्यांना सोयीच्या कॉफी शॉपमध्ये भेटा किंवा तुमच्या आवडत्या कट्ट्यावर भेटून वाफाळत्या कटिंग-वडापावसोबत ढेरसाऱ्या गप्पा मारा.

न सांगताही समोरच्याला मनातलं कळतं, अशा हक्काच्या नात्यांपैकी एक म्हणजे मैत्री. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मावशी, आत्या वगैरे नात्यांचं त्या-त्या जागी महत्त्व आहे. ही नाती जन्मत:च प्रत्येकाशी जोडली जातात. ही नाती निवडण्याची संधी मिळत नसते, पण मैत्रीचं नातं आवड आणि इच्छेनुसार निवडलं जातं. ‘बाय चॉइस रिलेशन’ असं म्हणू या हवं तर. मैत्रीचं नातं कोणाशी, कसं, कुठवर टिकवायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. काही वेळा मैत्रीत ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असंही होतं. पण, यातच मैत्री खऱ्या अर्थाने खुलत जाते. मित्र-मैत्रिणींसोबतच राहात असाल तर ते दुसरं कुटुंब होऊन जातं. कुटुंब म्हटलं की घरातल्या सदस्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, व्यक्त होण्याची पद्धत हे सगळं माहिती असतं. त्याचा फायदाही होत असतो. रात्रभर गप्पा, वेळी-अवेळी चहा-कॉफी, मध्यरात्री भूक लागल्यावर तयार झालेली गरमागरम मॅगी, कामाविषयी चर्चा हे आणि बरंच काही मैत्री अनलिमिटेडमध्ये हमखास असतं. मैत्रीच्या षटकोनाकडे बघितल्यावर मैत्री अनलिमिटेडचा पुरेपूर अनुभव येतो. कुटुंबानंतर सांभाळून घेणारी हक्काची माणसं ज्या नात्यात भेटतात त्या मैत्रीचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतंच म्हणून ते मुद्दाम जपायला हवं!

viva@expressindia.com

Story img Loader