यावर्षीच्या ऑलिम्पिक्समध्ये भारताला सहा पदकं मिळाली. बऱ्याचशा फर्स्ट टाइम ऑलिम्पियन्सनी यावेळी भारतासाठी मेडल्स जिंकली आहेत. पिस्तूल शूटिंग, रायफल शूटिंग, हॉकी, भालाफेक, कुस्ती अशा खेळांमध्ये भारताला यश मिळालं. या सगळ्या खेळाडूंमध्ये वयाने सर्वात लहान मेडल विनर होता तो म्हणजे अमन सेहरावत. त्याने कुस्तीच्या फ्रीस्टाइल रेसलिंगमध्ये ५७ किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल मिळवलं. तो यंदाचा भारताचा यंगेस्ट मेडल विनर आहे.

मूळचा हरियाणाचा असलेल्या अमनने याआधी २०२२ मध्ये अन्डर-२३ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. अमन २०२३ चा एशियन चॅम्पियनदेखील होता. बिरोहर या हरियाणामधील गावातून आलेला अमन आधी मड रेसलिंग अर्थात मातीत कुस्ती खेळायला शिकला. २०१२ च्या ऑलिम्पिक्समध्ये सुशील कुमारला सिल्व्हर मेडल जिंकलेले पाहून त्याला अजून प्रेरणा मिळाली. वयाच्या दहाव्या वर्षीच त्याने दिल्लीत कुस्तीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्याचे आई-बाबा गेले. त्यानंतर त्याच्या काकांनी त्याचा सांभाळ केला. त्याचा भाऊ आणि बहीण त्याला या प्रसंगात मोठा आधार ठरले. या मोठ्या घटनेनंतर अमन खरंतर खूप खचला होता, मात्र त्याच्या कुस्तीच्या ट्रेनिंगने त्याला कोणत्याही वाईट मार्गाला लागण्यापासून रोखलं. कुस्तीच्या ट्रेनिंगमध्ये त्याने आपलं सर्वस्व शोधलं. वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाची छाया खेळावर पडू न देता सातत्याने आपली खेळातली कामगिरी उंचावत राहणं ही खचितच सोपी गोष्ट नाही, मात्र अमनने ते करून दाखवलं.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

२०२१ साली अमनने पहिली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २०२२ मध्ये अन्डर-२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. जानेवारी २०२४ मध्ये त्याने झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. टेक्निकल सुपिरिऑटीच्या बळावर त्याने त्या स्पर्धेत सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. यावर्षीच्या पॅरिस समर ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळवणारा तो सर्वात लहान भारतीय खेळाडू ठरला. ‘मी सेमीफायनलमध्ये खेळत असताना पॉईंट्स गमावत चाललो होतो, त्यावेळी मला अचानक प्रश्न पडला की आता मी काय करू? मी ऑलिम्पिकमध्ये खेळतो आहे! मग त्यावेळी मी स्वत:ला असं समजावलं आणि भासवू दिलं की मी स्टेट लेव्हलच्या स्पर्धेत खेळतो आहे. तेव्हा मला थोडं रिलॅक्स वाटलं आणि मी पुढे नीट खेळू शकलो’, अशा सहज शब्दांत त्याने त्याच्या विजयाचं आणि शांतपणे स्पर्धकाला टक्कर देण्यमागचं इंगित सांगितलं. स्पर्धेच्या अत्यंत तणावाच्या क्षणीही हातपाय गाळून न बसता धैर्याने सामना करणं ही अथक सरावाने, प्रयत्नाने जमणारी बाब आहे. इथे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मनाची मशागतही महत्त्वाची ठरते. ऑलिम्पिक स्पर्धेत जगभरातील कुशल खेळाडूंशी टक्कर देताना मनाच्या तयारीवरही खेळाडू तितकाच भर देताना दिसतात. अमनचं वय पाहता त्याने ज्या कमालीच्या शांततेने, एकचित्त खेळ केला आहे त्याला तोड नाही.

अमन सेहरावत हा उत्तर रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस अर्थात तिकीट चेकर म्हणून नोकरी करत होता. मात्र त्याने देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवल्यानंतर रेल्वेने त्याचं प्रमोशन करून त्याला ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी – स्पोर्ट्स अशी खास पोस्ट दिली आहे. त्याला आणि त्याच्यासारख्या इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून उत्तर रेल्वेने ही मोठी घोषणा केली आहे. कोणत्याही खेळाडूसाठी आर्थिक स्थैर्य आणि खेळासाठी प्रोत्साहन या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. अमनच्या निमित्ताने भावी खेळाडूंनाही खेळाबरोबरच आयुष्याची कमान उंचावण्याची संधी प्राप्त झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अमनवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना त्याने मात्र पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये मेडलचा रंग बदलायचं निश्चित ठरवलं आहे. पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये त्याला गोल्ड मेडल जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यादृष्टीने आत्तापासूनच त्याने अभ्यास आणि प्रयत्नही सुरू केले आहेत. ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं म्हणजे आपण जिंकलो या यशाच्या भावनेने वाहवत न जाता पुढच्या खेळासाठी स्वत:ला तयारीत बुडवून घेणारे अमनसारखे खेळाडू निश्चितच सर्व तरुणाईसाठी प्रेरणास्राोत ठरतील.

पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताला विविध खेळात पदकं मिळवून देणारे बहुतांशी खेळाडू हे वयाने लहान आहेत. तरुण वयात आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याच्या ईर्ष्येने लढणाऱ्या या भारतीय खेळाडूंच्या जिद्दीची, संघर्षाची प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे. या तरुण खेळाडूंमध्ये कुस्तीत ब्रॉन्झ मेडल मिळवून देणारा अमन सेहरावत हा वयाने सगळ्यात लहान आणि कामगिरीने महान खेळाडू ठरला आहे.

Story img Loader