लहानपणापासूनच तिला समुद्राची ओढ होती. शाळेला सुट्टी पडली की तिची पहिली धाव समुद्रकिनारी असायची. शंख, शिंपले गोळा करता करता त्या लहानग्या मुलीचे समुद्राशी एक वेगळेच नाते निर्माण झाले. बालपणी समुद्रकिनारी बागडणारी मुंबईची प्राची हाटकर आता ‘सागरी संशोधक’ म्हणून कार्यरत आहे. जंगल सफारी करणं, प्राणिसंग्रहालयात जाऊन तेथील प्राण्यांना पाहणं, झाडंझुडपं, पक्षीदर्शन हे सगळं विलक्षण आनंद देणारं असतं. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जागरूक होत असलेली युवा पिढी यापलीकडे जाऊन अभ्यास-संशोधनाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांचे जीवन, त्यांची वैशिष्ट्ये, वनस्पती-प्राणी यांच्या विविध प्रजाती आणि अशा विविध निसर्गसंपत्तीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. जंगल नावाचं खुलं पुस्तक उघडून पाहणाऱ्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या युवा संशोधकांविषयी ‘जंगल बुक’ या सदरातून जाणून घेता येणार आहे. प्राची हाटकर ही मूळची मुंबईची. समुद्रकिनारी रमण्याची आवड तिला होतीच, शिवाय पर्यावरणाचीही विशेष आवड होती म्हणून प्राचीने ‘झुओलॉजी’ या विषयातून शिक्षण घ्यायचे ठरवले. ठाकूर महाविद्यालयातून तिने झुओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिच्यापुढे शिक्षिका व्हायचे की संशोधक, असे दोन पर्याय होते. मात्र तिने संशोधनाची शिक्षण क्षेत्राशीच एका वेगळ्या अर्थाने जोडली गेलेली वाट निवडली. संशोधक म्हणून करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला. मात्र, कधीकाळापासून तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला समुद्र पुढे तिच्या करिअरसाठीही महत्त्वाचा ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा