विनय जोशी

मुंडा कुक्कड कमाल दा!अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या आगामी वेब मालिका ‘इंडियन पोलीस फोर्स’च्या ट्रेलर लाँचसाठी हा लुक केला होता. ब्राऊन ट्राउजर, लाइट ब्राऊन टीशर्ट, त्यावर ब्राऊन वेलवेट जॅकेट आणि पायात ब्राऊन वेलवेट शूज घालून त्याने हा लुक पूर्ण केला होता. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सिद्धार्थ सगळय़ात वेगळा आणि हटके दिसत असल्यामुळे चाहत्यांकडून त्याच्या लुकचे भरभरून कौतुक झाले.

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
baby john movie teaser
Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, वरुण धवनच्या अ‍ॅक्शनने अन् जॅकी श्रॉफ यांच्या लूकने वेधलं लक्ष
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
Aai kuthe kay karte fame Rupali bhosale bought a new car
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ
lawrence bishnoi brother anmol bishnoi
लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा ठावठिकाणा लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

कुठले पुस्तक कुठला लेखक

लिपी कोणती कसले भाकीत

हात एक अदृश्य उलटतो,

पानांमागून पाने अविरत

नवीन वर्षांचं स्वागत करताना शांता शेळकेंच्या कवितेतल्या या ओळी  हमखास आठवतात. काळाचा अदृश्य हात जणू कॅलेंडरचं पान उलटून नव्या वर्षांची नांदी करतो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात वर्षांची शेवटची खास खरेदी केली जाते ती म्हणजे पुढील वर्षांच्या कॅलेंडरची! कॅलेंडर आणलं की आधी त्यात आपला वाढदिवस, दिवाळी, इतर सुट्टय़ा कधी येतात ते अप्रूपानं पाहिलं जातं. नवंकोरं  कॅलेंडर भिंतीवर लावून नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं. दर महिन्याला प्रियजनांचे वाढदिवस, दुधाचं बिल, पेपर बिल, तातडीची टिपणं अशा नोंदी अंगावर मिरवत कॅलेंडर वर्षभराचं संचित साठवत असते. टेक्नोलॉजीच्या युगातही कॅलेंडरचं भिंतीवरील स्थान अबाधित आहे.

अगदी आदिम काळापासूनच मानवाला कालगणनेची गरज भासते आहे. सुरुवातीला दिवस-रात्र, चंद्राच्या कला, ऋतूबदल  अशा सोप्या आणि ठळक  खगोलीय घटनांवरून कालमापन होत असावे. सामाजिक विकासात  शेती, व्यापार, प्रशासन, सणउत्सव यांच्यासाठी सूत्रबद्ध आणि पूर्वनियोजित कालमापना ही आवश्यकता वाढत गेली. याच गरजेतून भारतीय, ग्रीक, हिब्रू , रोमन, चिनी,  इजिप्शियन अशा सगळय़ाच प्राचीन संस्कृतींनी  स्वत:ची कॅलेंडर प्रणाली विकसित केली.  ही सगळी कॅलेंडर फक्त सूर्याच्या गतीवर आधारित असणारे  सौर, चंद्राच्या कला बघत जाणारे चांद्र  किंवा या दोघांचा समन्वय साधणारे चांद्र-सौर यापैकी एका प्रकारात मोडतात. या सगळय़ा भाऊगर्दीत ग्रेगोरियन कॅलेंडर हे सायन सौर कॅलेंडर सगळय़ा देशात उपयोगात आणले जात जगन्मान्य ठरलं. या ग्रेगोरियन कॅलेंडरचा इतिहासदेखील तितकाच रंजक आहे.

कॅलेंडर या शब्दाचे मूळ लॅटिन शब्द ‘कॅलेंडे’ या शब्दात आहे, प्राचीन रोम काळात प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस ‘कॅलेंडे’ चौकाचौकात घोषणा करून सांगितला जात असे. रोमचा संस्थापक  सम्राट रोमलसच्या काळातील प्रारंभिक रोमन कॅलेंडर ३०४ दिवसांचे होते. प्राचीन रोमनांची १० आकडय़ावर श्रद्धा असल्याने वर्षांत मार्टियस, एप्रिलिस, मायस, ज्युनिअस, क्विंटिलिस, सेक्स्टिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे  दहा महिने होते. वसंत ऋतूत सुरू  होणारे वर्ष डिसेंबरमध्ये संपून पुढचे कडाक्याच्या थंडीचे ६१ दिवस सोडून दिले जात असत. रोमलसनंतर  इ.स.पूर्व ७१५ मध्ये राज्यावर आलेल्या नुमा पॉम्पिलियस याने या कॅलेंडरमध्ये सुधारणा केली. फेब्रुवारी आणि जानेवारी या दोन महिन्यांची भर पडत कॅलेंडर  चांद्रवर्षांइतके म्हणजे ३५४ दिवसांचे झाले. पण रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत. यामुळे जानेवारीमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडत वर्ष ३५५  दिवसांचे झाले.

सूर्याला ऋतुचक्र पूर्ण करण्यासाठी लागणारा काळ म्हणजे सांपातिक  वर्ष (Tropical year) ३६५.२४२२ दिवसांचे असते. रोमन कॅलेंडर मधल्या कमी दिवसांमुळे महिने आणि ऋतू यांच्यातील साहचर्य गडबडले.  इ.स.पूर्व ४५० च्या सुमारास  डेसिमव्हीरी  या दहा सदस्यांच्या मंडळाने कॅलेंडरमध्ये पुन्हा सुधारणा केली. महिन्यांचा क्रम बदलत जानेवारीनंतर फेब्रुवारी महिन्याला स्थान दिले गेले. १०-११ दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी अधिक महिन्याची (Mercedonius ) कल्पना मांडण्यात आली. फेब्रुवारीतील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यात आणखी २२/२३ दिवस जोडून अधिक महिना  जोडला गेला. परिणामी एका वर्षांतील सरासरी दिवस ३६६.२५  होत कॅलेंडर आता सांपातिक  वर्षांच्या जवळपास गेले.

इ.स.पूर्व ४६ मध्ये सत्तेवर आलेल्या ज्युलियस सीझरने कॅलेंडरमध्ये आमूलाग्र बदल केले. जानेवारी, सेक्स्टिलिस आणि डिसेंबरमध्ये दोन तर एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडण्यात येऊन  वर्ष सरासरी  ३६५.२५  दिवसांचे झाले. फेब्रुवारीत बदल न झाल्याने तो २९ दिवसांचा राहिला. १ जानेवारी इ.स.पूर्व ४५ पासून सुधारित ज्युलियन  कॅलेंडर सुरू झाले. 

ज्युलियन कॅलेंडर सुरू होऊन वर्षभरातच  ज्युलियस सीझरचा मृत्यू झाला. त्याच्या सन्मानार्थ क्विंटिलिस या  महिन्याचे नाव जुलै केले गेले. त्यांनतर लीप वर्ष ठरवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीने चार ऐवजी दर तीन वर्षांनी लीप वर्ष घ्यायला सुरवात केल्याने ज्युलियन कॅलेंडर पुन्हा गडबडले. सम्राट ऑगस्टसने यात सुधारणा करत चारने भाग जाणाऱ्या वर्षांला लीप वर्ष मानण्याची प्रथा सुरू केली. त्याच्या स्मरणार्थ सेक्स्टिलिस महिन्याचे नाव ऑगस्ट केले गेले. पण जुलैप्रमाणे आपल्या नावाच्या महिन्यालापण ३१ दिवस असावेत  या त्याच्या आग्रहाखातर फेब्रुवारीचा एक दिवस तोडून ऑगस्टला देण्यात आला.

ज्युलियन कॅलेंडरचे वर्षमान ३६५.२५ दिवस होते. ऋतुचक्राचा संबंध  असणाऱ्या सांपातिक वर्षांचे दिवस ३६५.२४२२ असतात. दोघांतील ०.००७८  दिवसांचा फरक क्षुल्लक वाटत असला तरी  त्याचा परिणाम साठत जाऊन १६व्या शतकापर्यंत ज्युलियन वर्ष आणि  सांपातिक वर्षांतील फरक तब्बल १० दिवसांचा झाला. परिणामी  पुन्हा एकदा  कॅलेंडर सुधारणेची गरज भासू लागली. या वेळी ही भूमिका तत्कालीन पोप  १३वे  ग्रेगरी यांनी पार पाडली. त्यांच्या आदेशाने १५८२ साली गुरुवार ४ ऑक्टोबरनंतर पुढचा दिवस ५ ऑक्टोबर न घेता त्याला १५ ऑक्टोबर  मानले गेले. यामुळे १० दिवसांची पडलेली तफावत दूर झाली. लीप वर्ष मानण्याचे  नियम बदलण्यात आले. दर चौथे वर्ष लीप असताना  १०० ने भागले जाणारे वर्ष लीप मानले जात नाही . पण ४०० ने भागले जात असल्यास ते लीप मानावे असा नियम करण्यात आला.

या सुधारणा कॅथलिक पोपकडून झालेल्या असल्याने ख्रिश्चन धर्माचे वेगळे पंथ मानणाऱ्या देशांकडून त्यांना मान्यता मिळायला बराच  वेळ लागला. प्रॉटेस्टंट पंथीय ब्रिटनने हा बदल १७५२ साली स्वीकारला तर ऑर्थोडॉक्स चर्च मानणाऱ्या रशियामध्ये ही सुधारणा मान्य  व्हायला १९१८ साल उजाडावे लागले. आणि अखेर व्यावहारिक उपयोगासाठी  ग्रेगोरियन कॅलेंडर जगन्मान्य ठरले. आज आपण वापरतो ते हेच  कॅलेंडर!

नव्या वर्षांच्या झुळकीनं कॅलेंडरची फडफडणारी पानं जणू आदिम काळापासून सुरू असणारी  ही कालपमापनाची गाथा सांगत असतात. जुनं  कॅलेंडर बदलताना गतवर्षीच्या अप्रिय घटनांनी कदाचित हुरहुर लागत असेलही, पण नवंकोरं कॅलेंडर नव्या वर्षांच्या नव्या आशा जागवतं.           

viva@expressindia.com