रिशानने खिडकीतून पाहिलं. टेक्सासच्या आकाशात एव्हाना ढग दाटून येत पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पावसाच्या सरीनं त्याला रोज येणारी शनायाची आठवण अगदीच तीव्र झाली. पटकन त्याने मोबाईल उचलला आणि भारतात व्हिडीओ कॉल केला. देश आणि काळ यांची बंधनं क्षणात दूर झाली. पावसाच्या साक्षीनं प्रेमाच्या गप्पा फुलल्या. तिसेक वर्षांपूर्वी दिल्लीला बदली झालेल्या अनिलचंही पहिला पाऊस पडल्यावर असंच झालं होतं. नुकत्याच रुजलेल्या लँडलाईन सेवेमुळे घरी फोन करून आरतीशी मनसोक्त बोलता आलं होतं. त्या आधीच्या पिढीतल्या सुधाकररावांची वेगळी कथा नव्हती. पहिल्या पावसातून उमटलेल्या भावना पत्रात लिहून त्यांनी मालतीबाईंना कळवल्या होत्या. पिढ्या बदलल्या, संदेशवहनाची साधनं बदलली, पहिला पाऊस मात्र अजूनही तसाच बरसतो. दूर राहणाऱ्या प्रियजनाची आठवण अजूनही तशीच तीव्र करतो. त्या आठवणी प्रिय व्यक्तीला सांगण्याची ओढ अजूनही तशीच आहे.

कोण्या एके काळी असाच एक यक्ष होता म्हणे. प्रेमात ठार बुडालेला. प्रेमात भान हरपून त्याने कर्तव्यात काही कसूर केला आणि प्रेयसीपासून वर्षभर दूर राहण्याची शिक्षा शाप बनून त्याच्या जीवनात आली. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला दूर डोंगरावरून पावसाचे ढग येताना दिसले. एक ढग तर हत्ती सारखा डोंगरांना धडका देत होता. शांताबाई शेळकेंच्या शब्दात सांगायचं तर ,

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva love poem of the first rain messenger amy
First published on: 05-07-2024 at 07:13 IST