वेदवती चिपळूणकर परांजपे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दहा वर्षांच्या मुलीला ओल्ड एज होममध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांचं दु:ख कळलं. तिने आपल्या परीने त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी प्रयत्न केले. आज या दहा वर्षांच्या अबिगेल लुपी या मुलीने केलेल्या प्रयत्नांतून एक मोठा सामाजिक उपक्रम उभा राहिला आहे.
ती केवळ दहा वर्षांची! तिच्या पणजीला भेटायला ओल्ड एज होममध्ये गेली होती. तिच्या पणजीचा शंभरावा वाढदिवस होता. त्यासाठी तिने गाणं गायलं, सेलिब्रेशन केलं. त्या वेळी तिला पहिल्यांदा जाणवलं की ओल्ड एज होममधल्या बहुतेकांना कोणी भेटायलाच येत नाही. ‘‘मला समजलं की कधी कधी ते एकटे पडतात. त्यांच्यासाठी कोणी काही करायला आलं की, ते खूप आनंदी असतात,’’ हे त्या वेळी त्या दहा वर्षांच्या मुलीच्या अबिगेल लुपीच्या तोंडून निघालेले उद्गार होते.
तीन वर्षांची असल्यापासून अबिगेल गाण्याचे आणि नाचण्याचे परफॉर्मन्स करत होती. मात्र त्या ओल्ड एज होममध्ये किंवा केअर होममध्ये तिच्या हे लक्षात आलं की आपल्या सादरीकरणाने हे सगळे वृद्ध व्यक्ती किंवा पेशंट खूप खूश होतात. तेव्हापासून तिने तिच्या वयाच्या मुलींना एकत्र गोळा करायला सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या अबिगेल लुपीने आपल्या वयाच्या मुलींना सोबत घेऊन ‘केअर गर्ल्स’ नावाचा ग्रुप तयार केला. या लहान लहान मुली प्रत्यक्ष आजारी वृद्ध माणसांची काळजी तर घेऊ शकत नाहीत, मात्र त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करू शकतात. या सर्वच मुली आठ ते दहा वर्षांच्या होत्या. त्यांनी सर्वानी मिळून गाणी बसवली, डान्स तयार केले आणि ओल्ड एज होम्स अर्थात वृद्धाश्रम, केअर होम्स, नर्सिग होम्स अशा ठिकाणी आपले परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली. अनेक वृद्ध माणसांना भेटायला येणारे नातेवाईक नसायचे, त्यांच्या आयुष्यात काही एन्टरटेनमेंट नव्हतं, आनंद नव्हता. अशा वेळी या लहान-लहान मुलींच्या आपुलकीने आणि त्यांच्या सादरीकरणाने त्यांना आनंद मिळू लागला. या लहान मुलींनी मग केवळ ओल्ड एज होमपुरतं मर्यादित न राहता मेडिकल केअर होममधल्या पेशंट्ससाठीसुद्धा ही अॅक्टिव्हिटी सुरू केली. अशा पेशंट्सना घरचे लोक किंवा मित्रमंडळीसुद्धा भेटायला वगैरे येत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अबिगेलच्या प्रयत्नांनी या उपक्रमात अनेक लहान मुली उत्साहाने सहभागी झाल्या.
या मुलींनी डिस्ने, ब्रॉडवे आणि पॉप बॅण्ड्स यांच्यासोबत कोलॅबोरेशन्स करायला सुरुवात केली. आधी ज्या मुली स्वत: गाणी बसवत होत्या, डान्स कोरिओग्राफ करत होत्या त्यांना आता वेगळं आणि मोठं पाठबळ मिळालं. त्यांनी लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आणि नर्सिग होम्समध्येसुद्धा आपले परफॉर्मन्स करायला सुरुवात केली. लहान मुलांना खूश ठेवणं हे सर्वात अवघड काम त्या मुलींनी साध्य केलं. हे सर्व अबिगेलच्या पुढाकाराने शक्य झालं. इतक्या लहानपणी अशी सोशल अॅक्टिव्हिटी सुरू करणारी मुलगी म्हणून अबिगेलला जागतिक पातळीवर ओळखलं जाऊ लागलं. ‘यांच्यापैकी कोणीच खूश नव्हते आणि इतरांना खूश करणं मला आवडतं. म्हणून मी हे करते. यातून मला मानसिक समाधान मिळतं,’ असं अबिगेल लुपी आपल्या कामाविषयी म्हणते. तिच्या या कामाची त्या वेळी पेरेंटिंग मॅगझिनने दखल घेतली. या मॅगझिनची डेप्युटी एडिटर स्टेफनी वूड म्हणते, ‘आम्ही अशी मुलं शोधत होतो ज्यांनी वेगळी काही कामं केली आहेत, किंवा करत आहेत, पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. आम्ही अनेक मुलं शोधली त्यातली एक अबिगेल होती. ती सीनियर सिटीजन्सचं आयुष्य सुकर करते आहे आणि हे जगासमोर आणण्याची आम्हाला गरज वाटली आणि आम्हाला ते योग्य वाटलं.’ या मॅगझिनने अबिगेलला त्या वेळी ‘किड्स ऑफ द इयर’मध्ये समाविष्ट केलं.
‘केअर गर्ल्स’चा आणखी एक ‘केअर एंजल्स’ नावाचा सबग्रुपसुद्धा आहे. यात काही मुली आपला वेळ इतर अॅक्टिव्हिटीसाठीसुद्धा देतात, जसं की कचरा साफ करणं किंवा इतर सामाजिक संस्थांसाठी देणग्या उभ्या करण्यासाठी वॉकेथॉन वगैरे ऑर्गनाइज करणं अशा विविध उपक्रमात त्या सहभागी होतात. अबिगेलची आई, जी केअर गर्ल्सची आर्टिस्टिक आणि मार्केटिंग डायरेक्टर आहे. या अॅक्टिव्हिटीमध्ये खूप मोठय़ा संख्येने अजून मुली जोडल्या गेल्या पाहिजेत, असं अबिगेलच्या आईचं म्हणणं आहे. यासाठी अबिगेलच्या कार्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे.
viva@expressindia.com