ज्या वयात तरुणाई करिअरच्या बाबतीत गोंधळलेली असते, त्या वयात ती मेडल्सचा संग्रह करते. ज्या राज्यात कुस्तीपटू घडतात, त्या राज्यात तिने नेमबाजीसारखा वेगळा क्रीडाप्रकार निवडला. ज्या टीनेजमध्ये मुलांचे फोकस राहत नाहीत, त्या टीनेजमध्ये तिने फोकसचाच गेम निवडला. ऑलिम्पिक्समध्ये भारताचा रेकॉर्ड करणारी मनू भाकर केवळ एकोणीस वर्षांची आहे आणि आतापर्यंत तिने पिस्तूल प्रकारात अनेक मेडल्स मिळवली आहेत.

ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली नेमबाज, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक मिळविणारी पहिली महिला नेमबाज आणि एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई करणारी नेमबाज असे एकापेक्षा एक विक्रम नोंदवणाऱ्या मनूचा इथवर पोहोचण्याचा संघर्ष पाहिला तर तिच्यातली जिद्द आपलं लक्ष वेघून घेते. लहानपणी स्केटिंग, टेनिस, बॉक्सिंग अशा अनेक खेळांमध्ये आपलं कौशल्य अजमावणाऱ्या मनूने नेमबाजीवर आपलं ‘लक्ष्य’ एकाग्र केलं. २०१६ मधल्या रिओ ऑलिम्पिकनंतर तिला नेमबाजीमध्ये ट्राय करून पाहावंसं वाटलं आणि ते तिला आवडलंसुद्धा! तिच्या कौशल्यात पारंगत होण्यासाठी तिला स्वत:ची पिस्तूल हवी होती. तिच्या वडिलांचा तिला कायम पाठिंबा होता. त्यांनी तिला पिस्तूल घेऊन दिली आणि त्याच पिस्तूलने अचूक निशाणा साधत तिने इतिहास रचला. ऑलिम्पिक्समध्ये नेमबाजीतील पिस्तूल प्रकारात मेडल मिळवणारी पहिली भारतीय म्हणून तिची झालेली नोंद हे यश सहजासहजी साध्य झालेलं नाही.

student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Girl dies in leopard attack in sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

२०१७ च्या नॅशनल गेम्समध्ये आधीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हिना सिद्धूचा रेकॉर्ड मोडत तिने स्वत:चा नवा रेकॉर्ड सेट केला. त्याच वर्षी एशियन ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये तिने सिल्व्हर मेडलची कमाई केली. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या वर्ल्ड कपमध्ये तिने ज्युनिअर वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आणि त्यातसुद्धा अंतिम फेरीत स्थान मिळवलं. त्यात अनेक अनुभवी शूटर्सना मागे टाकत तिने गोल्ड मेडल मिळवलं. त्याच स्पर्धेत मिक्स्ड टीममध्येही तिने गोल्ड मेडल मिळवलं. दुसऱ्या वर्षी त्याच वर्ल्ड कपमध्ये पुन्हा स्वत:ला गोल्ड, टीममध्ये ब्रॉन्झ मेडल अशी वैयक्तिक आणि सांघिक दोन्हीकडे पदकांची कमाई मनूने केली.

२०१८ मध्ये युथ ऑलिम्पिक्समध्ये तिने नेमबाजीत गोल्ड मेडल मिळवलं. तेव्हाही ते मेडल मिळवणारी ती पहिलीच भारतीय ठरली. २०१९ मध्ये मनूने मिक्स्ड टीम आणि वैयक्तिक अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये सर्व वर्ल्ड कप्समध्ये गोल्डची कमाई केली. मात्र, २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये मनूचा परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे झाला नाही. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाला आणि तिला वेळ कमी पडला. तरी त्या परिस्थितीतही तिने लक्ष एकाग्र करून शॉट पूर्ण केले. मात्र ते तिला फायनलसाठीच्या टॉप आठमध्ये घेऊन जाऊ शकले नाहीत. तरी तिची घोडदौड तिथेच थांबली नाही. त्या ऑलिम्पिक्सनंतर मनू ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनली आणि त्यानंतर ज्युनिअर कॅटेगरीमध्ये तिने सातत्याने मेडल्सची कमाई केली आहे.

इतकं सातत्य असण्याबद्दल मनू म्हणते, ‘आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं पुढे काय होईल याचा विचार केला नाही, तर आपलं काम आपण मनापासून पूर्ण करतो. आपल्याला जे करायचं आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे केलं की त्याची चांगली फळं आपोआप मिळतात.’ याच विचारांनी तिला यावर्षी पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये फायनल राऊंडपर्यंत पोहोचण्यात मदत केली. फायनलमध्ये एक एक लक्ष्य गाठत सुरुवातीपासूनच टॉप ३ मध्ये पक्की राहत मनूने ब्रॉन्झ मेडलवर आपलं नाव कोरलं. पिस्तूल प्रकारातील नेमबाजीत ऑलिम्पिक्सच्या फायनलला पोहोचली आणि भारताची पहिलीच शूटर जिने ऑलिम्पिक्समध्ये मेडलही मिळवलं. इतकंच नव्हे तर केवळ एका मेडलवर ती थांबली नाही, तर मिक्स्ड टीममध्येसुद्धा तिने देशाला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं आहे. या दुसऱ्या विजयाने ती पहिलीच भारतीय ठरली आहे, जिने एकाच ऑलिम्पिक्समध्ये दोन मेडल्स मिळवली आहेत. मनू आता २५ मीटर पिस्तूल प्रकारातही सहभागी होणार आहे. त्यामुळे या प्रकारातही पदकाची कमाई करत मनू विजयाची हॅटट्रिक साधणार का? याकडे सगळ्या भारतीयांचे लक्ष लागले आहे. मनापासून आणि जिद्दीने आपला खेळ उंचावत देशाला विजय मिळवून देणारी भारताची ही रेकॉर्ड गर्ल सगळ्याच तरुणाईसाठी इन्स्पिरेशन आहे हे नक्की!

viva@expressindia.com