विनय जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हम ‘बदला’ लेने के चक्कर में सब कुछ खोते है,
क्षमा ‘जिसने’ कर दिया वो लोग बडे महान होते है.
आटपाट सूर्यमाला होती. तेजस्वी सूर्य मध्ये तळपत होता. आठ ग्रह गुण्यागोविंदाने भोवती फिरत होते. त्यांचे उपग्रह, काही बटुग्रह, लघुग्रह, धूमकेतू यांनी सौरकुळ कसं गोकुळासारखं भरलं होतं. एकच दु:ख होतं. कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नव्हती. जीवसृष्टीसाठी नियम फार कडक. कोण घेणार हा वसा? पृथ्वी पुढे आली. विश्वदेवाला म्हणाली, ‘मी घेते हा वसा’. उतशील मातशील.. घेतला वसा टाकशील.. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’. विश्वदेव म्हणाला, ‘ठीक आहे. सांगतो तसं कर’. ‘सूर्यापासून योग्य अंतरावर जा. जास्त जवळ जाशील तर भाजशील. जास्त लांब जाशील तर गारठशील’. त्यानुसार पृथ्वी वास्तव्ययोग्य क्षेत्रात आली, योग्य ते तापमान मिळालं. ‘अहंकार ठेवू नको, नम्रतेने वाक’.. पृथ्वी २३.५ अंशातून झुकली, पृथ्वीला ऋतुप्राप्ती झाली.
‘गर्वाने जास्त फुगू नको की निराशेने खंगून जाऊ नको’. पृथ्वीने योग्य तो आकार ठेवला, योग्य तेवढं गुरुत्वाकर्षण मिळालं. ‘आतला राग शांत कर’. पृथ्वीने अंतरीचा लाव्हा शांत केला. कठीण पृष्ठभाग मिळाला, डोंगर-दऱ्या बनले. ‘सगळय़ांना धरून ठेव’. पृथ्वीने वायू बांधून ठेवले, वातावरण बनले, पाणी धरून ठेवलं, समुद्र तयार झाला. ‘शालीनतेचा पदर ढळू देऊ नको’. पृथ्वीने चुंबकीय क्षेत्राचा पदर ओढला, सौरवातापासून रक्षण झालं.
‘स्वत:भोवती फिर, गती काही सोडू नको’. पृथ्वीने तसं केलं, २४ तासांतच फिरू लागली, दिवस आणि रात्र मिळाले. ‘मोठय़ांचा आदर कर..’ गुरूला भाऊ मानलं.. उल्कांपासून रक्षण झालं. ‘लहानांना प्रेम दे..’ चंद्राला जवळ केलं.. भरती-ओहोटीचं चक्र मिळालं. पृथ्वीचा वसा पूर्ण झाला. विश्वदेवता प्रसन्न झाली. अंतराळातून एक धूमकेतू आला, जीवसृष्टीची बीजे ओटीत टाकून गेला.. समुद्राच्या गर्भात एकपेशीय जीवन फुललं. बहुपेशीय झालं. जीवसृष्टी वाढू लागली. पुढे चंद्राच्या प्रेमानं भरती आली.. त्याने जीवसृष्टी जमिनीवर आली. पशु-पक्षी, झाडे- झुडपे, कीडे-मुंगी जन्माला आले. मग उत्क्रांतीतून माणसा तुझा जन्म झाला.. आणि तेव्हापासूनच तुझं अवकाशाशी नातं जडलं !
अगदी आदिम काळापासून अवकाशाशी असणाऱ्या आपल्या नात्याचा मानव शोध घेतो आहे. अंतराळ हे कायमच आपल्या भावविश्वाचा भाग राहिले आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हळूहळू अंतराळाविषयीच्या भीतीची जागा कुतूहलाने घेतली. धर्म आणि संस्कृतीच्या विकासात जगभरातल्या बहुतांश संस्कृतींनी आपल्या देवतांचे निवासस्थान म्हणून अंतराळाची निवड केली. आकाशातील ठळक तारे, तारकासमूहांचे काल्पनिक आकार, ग्रह यांच्याविषयी अनेक दंतकथा-आख्याने भारतीय, ग्रीक, रोमन, चिनी, अरबी, जपानी पौराणिक साहित्यात आढळतात, पण थेट अंतराळाला स्पर्श करण्याची मानवाची इच्छा पूर्ण व्हायला मात्र विसावे शतक उजाडावे लागले. अंतराळात जाण्याच्या ऊर्मीतून अनेक अंतराळ मोहीम राबवल्या गेल्या, पण या मोहिमा आणि अंतराळ स्पर्धेतून अनेक नव्या समस्यादेखील निर्माण झाल्या.
४ ऑक्टोबर १९५७, सोव्हिएत रशियाने स्पुटनिक या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करून अंतराळ प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली, पण हीच घटना अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील ‘स्पेस वॉर’ची नांदी ठरली. प्रतिस्पध्र्याच्या लष्करी हालचाली टिपण्यासाठी दोन्ही महासत्तांनी मोठय़ा प्रमाणात गुप्तहेर उपग्रह पृथ्वीभोवती फिरते ठेवले. एकमेकांच्या उपग्रहांना निष्क्रिय किंवा थेट नष्ट करण्यासाठी उपग्रहविरोधी शस्त्रे (एएसएटी) विकसित करण्यास सुरुवात झाली. १९५९ मध्ये अमेरिकेने बोल्ड ओरियन क्षेपणास्त्राच्या अँटी-सॅटेलाइट मिसाईल चाचणीत आपल्याच ‘एक्सप्लोरर – ६’ या उपग्रहाला लक्ष्य केले. सोव्हिएत रशियाने अशाच प्रकारच्या चाचण्या घेतल्या. भरीस भर म्हणून दोन्ही महासत्तांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित केली, ज्याद्वारे थेट अंतराळातून हल्ला करणे शक्य झाले. या सगळय़ा घडामोडींमुळे अंतराळ युद्धाचा नवा अध्याय सुरू होण्याची भीती निर्माण झाली.
या सगळय़ा पार्श्वभूमीवर अंतराळाचा उपयोग, मालकी यासंबंधी जागतिक स्तरावर कायदा आणि नियम असण्याची गरज निर्माण झाली. आणि यातूनच १० ऑक्टोबर १९६७ रोजी बाह्य अंतराळ- (Outer Space Treaty) अमलात आला. १९६८ साली संकटग्रस्त अंतराळवीरांच्या बचावासाठी सामूहिक सहकार्याचा करार (Rescue Agreement) सगळय़ा राष्ट्रांनी मान्य केला. १९७२ साली अंतराळ मोहिमांचे दायित्व आणि नुकसानभरपाई निश्चित करणारा कायदा (Liability Convention)लागू झाला. १९७९ ला चंद्र आणि इतर खगोलीय वस्तूंवर सामूहिक मालकी आणि वापर सुनिश्चित करणारा करार (Moon Treaty) अस्तित्वात आला. या आणि यानंतर आलेल्या अनेक अंतराळ कायद्यातून अंतराळाचा उपयोग फक्त संशोधन आणि इतर शांततापूर्ण कार्यासाठीच करण्यावर सगळय़ा राष्ट्रांचे एकमत झाले आहे.
या विविध करारांनुसार अंतराळ हे कोणत्या एकटय़ा देशाच्या मालकीचे नसून अखिल मानवजातीचा त्याच्यावर समान अधिकार आहे. या अधिकारासोबतच अंतराळाचे रक्षण करणे हे सगळय़ा मानवांचे कर्तव्य आहे. अंतराळ संशोधनात सगळय़ा देशांना समान संधी आहे. देशाच्या आर्थिक, वैज्ञानिक विकासाच्या मोजपट्टीने यात भेदभाव केला जाऊ नये. चंद्र आणि इतर खगोलीय घटकांवर कोणालाही मालकी हक्क सांगता येणार नाही. संशोधनासाठी खगोलीय वस्तूवर उतरलेले यान, तिथे केलेले बांधकाम यावर मात्र त्या देशाचे स्वामित्व असेल. सगळय़ा अंतराळवीरांना मानवजातीचे प्रतिनिधी मानले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या बचावासाठी सर्वाकडून मदत केली जाईल. अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत किंवा इतर ग्रहांवर देखील कोणतेही अस्त्र ठेवता येणार नाही. तसेच अंतराळात अण्वस्त्रांच्या चाचण्यादेखील घेता येणार नाहीत. उपग्रहभेदी शस्त्रे प्रतिबंधित आहे. आंतरराष्ट्रीय साहचर्यातून अंतराळ संशोधनाला गती मिळावी अशी अपेक्षा देखील केली गेली आहे.
अंतराळ मोहिमांतून अंतराळ प्रदूषण ही नवी समस्या भेडसावते आहे. अंतराळात गेलेली प्रत्येक कृत्रिम वस्तू ही खरंतर अंतराळाच्या दृष्टीने कचराच आहे, पण मानवाच्या दृष्टिकोनातून अंतराळात असलेली आणि आपल्यासाठी निरुपयोगी वस्तू म्हणजे अंतराळ कचरा (Space debris)असे म्हणता येईल. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंतराळात सोडलेल्या या सर्व उपग्रहांची नोंद ठेवणाऱ्या ‘युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेयर्स’च्या (UNOOSA)यादी नुसार जून २०२३ च्या अखेरीस पृथ्वीभोवती ११,३३० उपग्रह फिरत होते. अनेक संशोधन संस्थांच्या मते २०३० पर्यंत हा आकडा ६०,००० च्या पार जाऊ शकतो. कार्य संपल्याने किंवा तांत्रिक बिघाडाने निष्क्रिय होणारे उपग्रह अंतराळात प्रदूषण वाढवायला हातभार लावतात.
अंतराळ कचऱ्याचा प्रश्न आता सर्व देशांनी गांभीर्याने घेतला आहे. २००७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अंतराळ कचरा उपशमनाची मार्गदर्शक तत्त्वे (space debris mitigation guidelines)घोषित केली गेली. यानुसार आता कमीतकमी अंतराळ कचरा होईल या दृष्टीने अंतराळ मोहीम आखल्या जात आहेत. उपग्रहात अतिरिक्त इंधनाचीही सोय केली जाते. त्याद्वारे कार्यकाल संपल्यावर उपग्रहाची दिशा बदलून त्याला पृथ्वीच्या वातावरणात ढकलणे शक्य होते. युरोपीय अंतराळ संस्थेने अशा पद्धतीने निर्मित आपला एओलस नावाचा उपग्रह २०१८ मध्ये कक्षेत सोडला होता. त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर जुलै २०२३ मध्ये त्याला पृथ्वीवर परत आणण्यात आले. अवकाश कचऱ्यावर नजर ठेवण्यासाठी जगात काही देशांमध्ये विविध यंत्रणा, रडार, दुर्बिणी कार्यरत केल्या आहेत.
या सगळय़ा मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनामुळे सध्याच्या आणि भविष्यातील सगळय़ा अंतराळ मोहिमा अंतराळाच्या रक्षणासह संशोधन करतील यात शंका नाही. अंतराळ मोहिमांची सुरुवात जरी शीतयुद्धातून झाली असली तरी आता मात्र परस्पर सहकार्यातून मोहीम राबवल्या जात आहेत. दीर्घकाळ अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांना अंतराळातून देशांच्या सीमारेषा न दिसता एकसंध पृथ्वी सतत दिसत असते. यामुळे त्यांच्या मन:स्थितीत एक सकारात्मक बदल होतो. देश, धर्म, जाती, वंश, वर्ण अशा भेदांची बंधने दूर होत सगळे मानव समान वाटू लागतात. याला विहंगावलोकन प्रभाव (Overview effect) म्हटले जाते. हाच दृष्टिकोन जणू पृथ्वीवरील विविध अंतराळ संस्थांमध्ये येतो आहे. आपल्या सूर्यमालेत आणि (सध्यातरी) आपल्या ज्ञात विश्वात पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे. आणि पृथ्वी हेच आपल्यासाठी सुरक्षित घर आहे. ही जाणीवच शहाणीव देऊन जाते.
तरीही अवकाशाशी आपले हे नाते नेमके काय हा प्रश्न उरतोच! प्रख्यात अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ कार्ल एडवर्ड सेगन यांच्या मते तर आपले अस्तित्व हीच मुळी अंतराळाची देणगी. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर आपल्या डीएनए मधला नायट्रोजन, आपल्या दातांमधला कॅल्शियम, आपल्या रक्तातील लोह हे दूरवरच्या कोण्या मृत पावलेल्या ताऱ्याच्या अवशेषातून उरलेले द्रव्य आहे. विश्वात पसरलेल्या धुळीत अनेक सेंद्रिय पदार्थ आढळतात. या पदार्थापासून बनणारी जीवरसायने जीवनाचे प्राथमिक घटक आहेत. कदाचित कोण्या धूमकेतूच्या शेपटीवर स्वार होत ही द्रव्ये पृथ्वीवर पोहोचली असावीत. कोणास ठाऊक? नव्या अंतराळ मोहिमांमधून अवकाशाशी आपले नाते अधिक उलगडले जाईलही.. पण अवकाशात जाण्याची ऊर्मी आपल्या रक्तातच आहे हे मात्र खरं !
पृथ्वीचा वसा पूर्ण झाला. बुद्धिमान मानवजात पृथ्वीवर गुण्यागोविंदाने नांदू लागली. आपल्या बुद्धिमत्तेने विश्वाचे आकलन करू लागली. अवकाशाशी जडलेले नाते विवेकाने जपू लागली. विश्वदेवता पृथ्वीवर प्रसन्न झाली. बाई बाई वर माग. स्वत:साठी काही नको. लेकरांसाठी मागते. जो कोणी ही कहाणी वाचेल त्याला खगोलशास्त्राचे ज्ञान दे. जीवसृष्टीच्या रक्षणाचे भान दे. विश्वदेव तथास्तु म्हणाले.
अशी ही साठाउत्तरांची कहाणी आकाशगंगेच्या पारी, काळय़ाकृष्णविवरी, तेजोमेघाच्या अंतरी सुफळ संपूर्ण.
viva@expressindia.com