फॅशन हा प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. कुठे बाहेर फिरायला जाताना, महाविद्यालयात जाताना, फॅमिली सोबत बाहेर जाताना किंवा मित्रांसोबत हिंडताना आपण कसे दिसतोय याचा प्रत्येकजण विचार करतो. ही फॅशन आपण कोणते कपडे परिधान केले आहेत? यापुरती मर्यादित न राहता त्यासोबत आपण कोणत्या अॅक्सेसरीज वापरतो हेदेखील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या अॅक्सेसरीजमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बॅग. कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या आऊटफिटवर कोणती बॅग साजेशी दिसेल कोणती बॅग ट्रेण्डी आहे हे प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्यात विशेष म्हणजे सध्या सुरू असलेला पावसाळा ऋतू , या ऋतूमध्ये आपण कोणत्या बॅग्ज वापरल्या तर त्या खराबही होणार नाहीत आणि आपला लुकदेखील छान दिसेल याचा तरुणाई फार बारकाईने विचार करताना दिसते. सावलीसारखी सोबत करणारी ‘बॅग’ ही आता तरुणाईचे नवे स्टेट्स सिम्बॉल ठरू लागली आहे. तुमच्या बॅगवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचपणी केली जाते आहे. विविध प्रकारच्या ट्रेण्डी व फॅशनेबल बॅग वापरण्यावर तरुणाई भर देते आहे. बॅगमध्ये प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे विविध प्रकारचे रंग व वैशिष्टय़पूर्ण टेक्श्चरही उपलब्ध असतात. सर्वसाधारणपणे भारतीय जीवनशैलीत लाइट वेट म्हणजेच कमी वजनाच्या बॅग बनवल्या जातात, पण तरीही पावसाळ्यात कोणत्या बॅग वापरायच्या याबाबतीत तरुणाईचा गोंधळ उडायचा तो उडतोच.
पावसाळ्यात किंवा एरव्हीही टोट बॅग हा एक उत्तम पर्याय असतो. टोट बॅगेचा वापर हा महाविद्यालयात जाणाऱ्या आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणीही करू शकतात. ही बॅग मोठी असल्यामुळे या बॅगेत पावसाळ्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक गोष्टी सामावू शकतात. टोट बॅग ही दिसायला फॅशनेबल देखील असते आणि मजबूत देखील असते. या बॅगसाठी काही क्लासिक रंगांची निवड केल्यास अधिक उठून दिसते. उदाहरणार्थ, काळा किंवा नेव्ही ब्ल्यू रंगाची मजबूत पट्टे असलेली ही टोट बॅग दैनंदिन प्रवासात आरामदायी ठरते. त्यामुळे पावसाळ्याच्या दृष्टीने ही बॅग उत्तम आणि क्लासी पर्याय आहे.
शहराच्या गजबजाटातून मॉन्सून वीकेंडला किंवा सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाताना, रोड ट्रिपला जाताना एक बॅगपॅक असणे गरजेचे आहे. नॅपसॅक, रुकसॅक, पॅक, बुकसॅक, बुकबॅग, हॅव्हरसॅक किंवा बॅकसॅक अशी या बॅगपॅकची अन्य नावे आहेत. बॅकपॅक सामान्यत: हायकर्स आणि विद्यार्थी अधिक प्रमाणात वापरतात. बहुतेक बॅकपॅक एकतर बकल मेकॅनिझम, झिपर किंवा ड्राय-बॅग प्रकारच्या असतात, त्यामुळे त्यामध्ये प्रवासादरम्यान वस्तू सुरक्षित राहू शकतात. तसेच या बॅगपॅकमध्ये कॅमेऱ्यासारखे उपकरण सहज राहू शकतात, त्यामुळे प्रवासही सोपा होतो. याचबरोबर मित्रमैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी किंवा जवळ फिरायला जाण्यासाठी क्यूट आणि कूल कॉम्बिनेशन असणारी बॅग म्हणजे स्लिंग बॅग. दिसायला आकर्षक आणि मोजकं सामान घेऊन जाण्यासाठी उत्तम अशी ही बॅग आहे. खास वनपीससारख्या ड्रेसवर ही बॅग शोभून दिसते. पूर्वीच्या काळात पोस्टमन ही बॅग वापरायचे हळू हळू या बॅगेच्या आकारात आणि पॅटर्नमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. ही बॅग वॉटरप्रूफ असल्यामुळे भिजली तरी आतले सामान खराब होत नाही. वेगवेगळ्या रंग आणि पॅटर्नची असलेली ही बॅग तरुणींनाच नाही तर तरुणांना देखील आकर्षित करते. तरुणांसाठी स्लिंग बॅगचे अगदी वेगवेगळे फॅशनेबल पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
सॅचेल बॅग ही खास करून महाविदयालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. ही बॅग ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या पारंपरिक कलेतून तयार करण्यात आलेली बॅग आहे. दिसायला ही बॅग शालेय दप्तरासारखी असली तरी यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. ही बॅग खास लेदरने तयार करण्यात आल्यामुळे पाहायला आकर्षक आणि वापरायला कम्फर्टेबल असते. हल्ली ही बॅग फक्त महाविद्यालयातील मुलांसाठी मर्यादित राहिली नसून या बॅगचा वापर ऑफिससाठी देखील केला जातो.
या अशा वेगवेगळ्या बॅग पाहायला आकर्षक आणि वापरण्यासाठी देखील उत्तम असतात. आणि विशेष म्हणजे सगळ्याच ऋतूंसाठी योग्य असतात. महाविद्यालय, ऑफिस किंवा अगदी बाहेर फिरायला जाण्यासाठी या बॅग विचारपूर्वक तयार केल्या असल्यामुळे त्यांना हाताळणे सोप्पे आहे. त्यामुळे सोय आणि फॅशन दोन्हींचा मेळ साधणाऱ्या या ट्रेण्डी बॅग्ज तुमच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भर घालायला नक्कीच मदत करतात.
viva@expressindia.com