टीव्ही, सिनेमा, नाटक, लाइव्ह परफॉर्मन्स अशा विविध माध्यमातून काम करणाऱ्या तरुण कलाकारांना ‘व्हॅलेंटाइन डे’ नि ‘प्रेमा’विषयी काय वाटतं ते जाणून घ्यायचा हा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘प्रेम’.. फक्त अडीच अक्षरं.. दिसायला पिटुकली.. पण लई भारी. एकदम मॅजिकल.. या प्रेमात काय नसतं? आपुलकी, आकर्षण, जबाबदारी, समजूतदारपणा, खिलाडूपणा, अगदी खरे-खोटेपणादेखील असतोच.. प्रेमातल्या या साऱ्या भावनांच्या छटा चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो.. मग ते व्यक्त होतं त्या जाणिवेच्या आविष्कारांतून.. सुरांतून.. शब्दांतून.. गाण्यांतून.. अभिनयातून..
‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्तानं व्यक्त होणारं प्रेम सेलिब्रेट केलं जातंय, त्याला जोरदार मार्केटिंगची जोडही लाभल्येय. पण आता या प्रेमाला व्यापक स्वरूप येऊ लागलंय. ‘तो’- ‘ती’च्या प्रेमाची ‘तीच ती चौकट’ कधीच मोडल्येय नि ते ‘एक्स्टेंडेड’ झालं. या प्रेमळ एक्सटेंशनमध्ये आई-बाबा आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत. काही जण सोशल अँगलनं पॉझिटिव्ह विचार करून वृद्धाश्रम, अनाथालयादी संस्थांतील मंडळींशी त्यानिमित्तानं आपुलकीनं संवाद साधताहेत. ‘सारे दिवस प्रेमाचे’ असं म्हणणाऱ्या अनेकांचा सध्या एकच कल दिसतोय की.. ‘प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला..’
घराघरातला इडियट बॉक्स असो किंवा ७० एमएमचा मोठा पडदा असो किंवा मखमली पडद्याआडून उलगडणारं नाटय़.. अनेकदा त्यातल्या कहाण्यांतून ‘प्रेमा’चा कलरफुल कॅलिडोस्कोप उलगडत जातो. त्यामुळं ‘व्हॅलेंटाइन डे’ नि ‘प्रेमा’विषयी या विविध माध्यमांतून काम करणाऱ्या तरुण कलाकारांना काय वाटतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न ‘व्हिवा’नं केला.
केतकी माटेगावकर
मी एक्स्टर्नल शिकत असल्यानं ‘व्हॅलेंटाइन डे’चा कॉलेजमधला गुलाबी माहोल नि सेलिब्रेशन मी मिस करत्येय. खऱ्या अर्थानं कॉलेजमध्ये साजरा होणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ बघायला मला आवडेल. तेव्हाचं कॉलेजमधलं वातावरण बघायला आवडेल. हा खूप मस्त दिवस आहे. सध्या मी एका शूटमध्ये बिझी असल्यानं ‘व्हॅलेंटाइन डे’चं प्लॅिनग अजून ठरलेलं नाहीये. कदाचित ‘टाइमपास’च्या निमित्तानं आम्ही (दगडू-प्राजक्ता) काही कॉलेजेसमध्ये जाऊ. त्यानिमित्तानं लोकांपर्यंत हेच पोहचवण्याचा प्रयत्न करू की, प्रेम हे ‘टाइमपास’ नसतं. ते खूप सीरिअसली केलं तर त्याला काही अर्थ असतो. तर ते प्रेम असतं, नाही तर तो ‘टाइमपास’ असतो.
प्रथमेश परब
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी मी नेहमी मित्र-मत्रिणींच्या ग्रुपसोबत सिनेमा बघायला जातो. यंदा ‘फॅण्ड्री’ हा त्याच दिवशी रीलिज होणारा सिनेमा बघायला जायचं आमचं ठरतंय. आम्ही कट्टय़ावरच्या गप्पाटप्पांमध्ये काही वेळा कुणाला कुणावरून चिडवतो. ते चिडवणं नि चिडणं खूप मजेशीर असतं. त्याखेरीज मी आईबाबांबरोबर टाइम स्पेंड करतो. आम्ही पत्ते, कॅरम वगरे खेळतो नि भरपेट गप्पा मारतो. अर्थात केवळ गप्पांनी पोट भरत नसल्यानं आईच्या हातच्या फेव्हरेट पदार्थाचा आस्वाद घेतो. या ‘डे’च्या निमित्तानं प्रेमाबद्दल सांगायचं झालं तर, मुलगा आणि मुलीच्या प्रेमात महत्त्वाचं असतं ते अॅट्रॅक्शन. नॅचरली ते सगळं होतंच. पण अॅट्रॅक्शन असलं तरीही सगळ्यात महत्त्वाची असते ती जबाबदारी. प्रेमात जबाबदारी घेतली पाहिजे. कारण अॅट्रॅक्शन तसं खूप असतं. बऱ्याच जणांचं असतं. पण त्याचबरोबर जबाबदारी असली तर ते प्रेम असेल.
मी ‘व्हॅलेंटाइन डे’ला असं ठरवून खरं काही वेगळं करत नाही. पण मला हा दिवस आवडतो. आपलं आपल्या मित्र-मत्रिणींवर, जवळच्या लोकांवर प्रेम असतं. पण अनेक वेळा ते अव्यक्त राहातं. प्रेम व्यक्त करणं ही छानच गोष्ट आहे, असं मला वाटतं आणि ते करायला हा दिवस म्हणजे एक संधी मिळते असं वाटतं. त्यामुळं प्रेम व्यक्त आणि साजरं करायची ही संकल्पना मला छान वाटते. मला लोक आजूबाजूला असणं खूप आवडतं. लोकांना प्रेम आणि आदर देणं मला आवडतं. आणि ते एक दिवसच नाही कायमच मी द्यायचा प्रयत्न करत असते. त्यामुळं या दिवशीही ते माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करीनच. एक दिवसापुरतंच मर्यादित न रहाता प्रेम आणि आदर व्यक्त करणं हे आपल्या अवघ्या जीवनाचाच भाग व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच माझा वाढदिवस असतो. वाढदिवसाची प्रत्येक जणच वाट बघत असतो, तशी मीही बघते. या दिवशी वाढदिवस असल्यामुळं त्यावरून मला खूप चिडवलं जातं. लोक या दिवसाचा जेवढा हाईप करतात, तेवढं मला काही वाटत नाही. त्या दिवशी वाढदिवस असल्यानं म्हणून ते सेलिब्रेट केलं जातं. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही झकासपकी गाण्याची मफल जमवतो.
‘व्हॅलेंटाइन डे’ असा मी कधीच नाही सेलिब्रेट केलाय. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी आणि त्याआधी काही दिवस विविध माध्यमांतून त्याचा चिक्कार गाजावाजा केला जातो. त्यात मार्केटिंग ओरिएंटेड गोष्टींचा भरणा अधिक असतो. पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करता येऊ शकतो. अनाथाश्रमातली मुलं किंवा वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांना भेटून त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करता येईल. मी माझ्या वाढदिवसाला नक्कीच असं काही तरी वेगळं करते नि १४ फेब्रुवारीला माझा वाढदिवस नसता तरी ‘व्हॅलेंटाइन डे’च्यानिमित्तानं असं सामाजिक जाणिवेतून काही तरी नक्कीच केलं असतं.