प्रादाची हँडबॅग, झाराचा टॉप आणि कलर डेनिम, अॅक्सेसरीजमधलं चंकी ब्रेसलेट, क्लर्कसचे टकाटक शूज आणि गूचीचा परफ्यूम अहाहा .. ही शॉपिंग विशलिस्ट कधीच न संपणारी असू शकते. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला ही ग्लोबल ब्रँडची खरेदी परदेशात गेल्याशिवाय अशक्य वाटत होती. खरं सांगायचं तर या ब्रँडची नावंही आपण आजच्या इतकी सर्रास ऐकत नव्हतो. आता मात्र अगदी आपल्या शहरात जवळच्या मॉलमध्ये या परदेशी ब्रँड्सचं एखादं आउटलेट उघडलेलं नक्कीच दिसेल. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे अनेक विदेशी ब्रँड आलेत. एमअँडएस, झारा, फॉरएव्हर २१, व्हेरो मोडा हे जगप्रसिद्ध ब्रँड नुकतेच भारतात आलेत. फॉरएव्हर २१ या अमेरिकेतल्या प्रसिद्ध फॅशन ब्रँड चेननं नुकतंच मुंबईत आपलं आऊटलेट उघडलंय. मालाडच्या मोठय़ा मॉलमध्ये आता या अमेरिकन ब्रँडचे कपडे, फूटवेअर आणि इतर अॅक्सेसरीज मिळायची सोय झालीय.
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कची फॅशन थेट आपल्या दारात यायला लागलीय. टीव्हीवर फॅशन शो बघताना त्या मॉडेल्ससारखे कपडे आपल्याला जवळच्या दुकानात बघायलाही मिळायचे नाहीत. ते फक्त मॉडेल्ससाठीच आहेत की काय, असा समज असायचा. पण आता मात्र त्या टीव्हीवर ऐकलेल्या ब्रँडची दुकानं आपल्याही शहरात आलीत. नवनवीन शॉपिंग मॉल उघडल्याची वार्ता अगदी नेमानं येत असते. त्या मॉल्समध्येच अशा बहुतेक ग्लोबल मॉलची आउटलेट्स झालेली दिसतायत. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे अनेक विदेशी ब्रँड आलेत. प्रादा, गुची, क्लेअर्स, व्हिक्टोरिआज सिक्रेट ही नावं पूर्वी फक्त शॉपिंगसाठी सतत युरोप- अमेरिकेत फिरणाऱ्या सेलिब्रिटींच्या तोंडी ऐकलेली असायची. आता मात्र हे ग्लोबल ब्रँड्स आपल्या दारी आलेत. आदिदास, नायके, प्युमा, पेपे हे ब्रँड्स तर आजकाल तरुणाईचे फेव्हरेट बनले आहेत. ते इतके आपलेसे झालेत की काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात ते सर्रास मिळायचे नाहीत, हे खरंही वाटणार नाही. मॉल संस्कृतीमुळे हे विदेशी ब्रँड आता इथे चांगले रुजायला लागलेत.
ठाण्याला राहणारी नेत्रा म्हणते, ‘‘माझी दीदी यूएसला असते. ती इकडे सुट्टीवर येताना माझ्यासाठी नेहमी ब्रँडेड स्टफ घेऊन येते. माझ्या मैत्रिणींना या ब्रँडेड वस्तूंचं फार अप्रूप असायचं. पण गेल्या दोन वर्षांत आता या यूएस ब्रँडची तेवढी क्रेझ राहिलेली नाहीय. ते आपल्याकडेही मिळायला लागलेत.’’ बोरिवलीची अल्पा म्हणते, ‘‘मला लेटेस्ट फॅशनचे आणि स्टाइलचे कपडे घालायला आवडतात. आता इथेही सगळे ब्रँड मिळायला लागल्यामुळे किमान सध्याची इन थिंग काय हे थेट कळतं’’
कपडय़ापेक्षा अॅक्सेसरीज ब्रँडची क्रेझ
या ब्रँडच्या जादूमुळे अनेकजण ब्रँड कॉन्शस झालेत. कपडय़ापेक्षा अॅक्सेसरीज आणि मेकअप कीटमधले ब्रँड मुलींमध्ये लोकप्रिय आहेत असं दिसतंय. एकाच ब्रँडची कॉस्मेटिक्स
सीप्झमध्ये काम करणारी चिन्मयी म्हणते, ‘‘फॅशनपेक्षाही मी ब्रँडवर जास्त लक्ष देते. काही ब्रँड मला सूट होतात. ग्लोबल ब्रँडमध्ये लक्झरी ब्रँड भुरळ पाडतात. पण दर वेळी ते परवडतीलच असं नाही. पण परवडणारे ऑप्शनही बरेच असतात आणि मी ते प्रीफर करते.’’ कपडय़ांपेक्षाही इतर फॅशन अॅक्सेसरीज आणि कॉस्मेटिक्सच्या बाबतीत मुली जास्त ब्रँड कॉन्शस झाल्यात असं दिसतं. ‘‘ठरावीक ब्रँडचे मेकअप प्रॉडक्टच मी वापरते. त्यात एक्सपरिमेंट केले तर स्कीनवर परिणाम होऊ शकतो,’’ एका मोठय़ा सलोनमध्ये काम करणाऱ्या मीतानं सांगितलं.
मॉलसंस्कृतीमुळे अनेक नव्या ब्रँड्सची ओळख होतेय. परदेशी- देशी असा भेट तिथे मिटतोय असं वाटतं. नवे ब्रँड येतायत तसतसा आजच्या पिढीचा
ब्रँड कॉन्शसनेससुद्धा वाढतोय. ब्रँडेड जादू सगळ्यांनाच भुरळ घालतेय.
ब्रँडेड जादू
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची खरेदी परदेशात गेल्याशिवाय अशक्य वाटत होती. या ब्रँडची नावंही आपण आजच्या इतकी सर्रास ऐकत नव्हतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-09-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magic of brands