आतापर्यंत आपण कपडय़ांवर चितारण्यात येणाऱ्या विविध चित्रकारीचा आश्चर्यचकित करणारा परिणाम पाहिला. तरीही अजून एका राहिलेल्या महत्त्वाच्या पलूबद्दल आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला फॅशनच्या दुनियेतील एक फंडा तर माहिती आहेच की, काही गोष्टी लपवण्यासाठी इतर काही गोष्टींचे प्रदर्शन करणे गरजेचे असते. मला सगळ्या वाचक ललनांच्या मनात आत्ता काय विचार आला असेल हे माहीत आहे, आमच्या पोटावरची वाढलेली चरबी किंवा अतिरिक्त वाढलेली कंबर कशी बरं लपवता येईल ? काय खरं की नाही ? हे सर्व वाढीव वजन झाकण्यासाठी काही करता येईल का ते पाहू.
आज आपण कपडय़ाच्या डिझायिनगमधल्या एका प्रमुख विषयावर चर्चा करूया. ‘सिलोएट’ म्हणजे कपडय़ाचा बाह्य़ाकार, किंवा शेप. उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या स्त्रियांमध्ये प्रचलित असणारे ए-लाइन किंवा फिश-कट हे ड्रेसचे पॅटर्नस् फॅशन डिझायनर्सच्या भाषेत आहेत ‘सिलोएट’. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कपडे परिधान केल्यानंतर त्याचा आकार कसा दिसेल याचे वर्णन. तुमच्या-आमच्यासाठी हे फक्त पॅटर्नस् असले तरी फॅशन डिझायनर्ससाठी तुमच्या शरीराच्या प्रत्यक्ष आकारातून आभासी आकार निर्माण करण्यासाठीचे हे एक प्रभावी आयुध असते.
इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे कपडय़ांनाही स्वत:चा असा आकार असतो. मुख्यत्वे करून चौरस, आयत, त्रिकोण याच प्रकारात परिवर्तन होऊन बेल (घंटा), फिश-टेल, अवरग्लास वगरे
जेव्हापासून माणसाने कपडे घालायला सुरुवात केली तेव्हापासून हे ‘सिलोएट’ म्हणजेच कपडय़ांचे बाह्य़ाकार अस्तित्वात आहेत. कपडय़ाचा आकार दूरवरूनच सर्वाचे लक्ष वेधून घेतो, म्हणूनच सिलहाउट्सचा वापर स्त्रीवर्गाकडून प्रभावीपणे केला जातो. अर्थात म्हणूनच गेल्या ५००० वर्षांत कपडय़ांच्या आकारात अनेक आकर्षक स्थित्यंतरे घडून आली आहेत. पूर्वी कपडे शिवले जात नसत तर वस्त्रे वेगवेगळ्या प्रकारांनी अंगाभोवती गुंडाळली जात असत. यामुळे एक तर देहाचा नसíगक आकार पूर्ण उद्धृत होत असे किंवा पूर्ण झाकला जात असे. गेल्या अनेक वर्षांत पाश्चिमात्य देशांतून, विशेषत्वाने युरोपात या बाबतीत बरेच नाटय़मय बदल झालेले आपल्या लक्षात येतील. जेव्हा फ्रेंच फॅशनची चलती होती तेव्हा फुगीर ‘क्रीनोलाइन्स’ वापरले जात असत. फार पूर्वी महिला अद्ययावत फॅशन दाखवण्यासाठी म्हणून असे घंटेच्या आकाराचे कपडे घालत असत, खालून घेरदार फुगीर आकार त्याला असायचा. या कपडय़ाचा घेर इतका मोठा असे की घालणाऱ्या स्त्रीला दारातून शिरणेही मुश्कील होत असे. पुढे पुढे या पॅटर्नस्मध्ये बदल घडत आला आणि ते वापरासाठी सहज सुलभ बनत गेले. अगदी मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या काळापासून मानवी शरीराचे चढउतार, गोलाई सहजपणे दर्शवणारे भारतीय वस्त्रालंकार नेहमीच लक्षवेधी ठरले आहेत. दूरदर्शनवरील अनेक पौराणिक मालिकांमधून त्या व्यक्तिरेखांच्या अंगावर दिसणारे तत्कालीन वस्त्रप्रकार तुमच्या नक्कीच नजरेसमोर आले असतील. उदाहरणार्थ आखीव-रेखीव शरीराचे मादक दर्शन घडवणारे उत्तरीय, लज्जारक्षणापुरतेच गुंडाळलेले अंतरीय, आपल्याला या गोष्टीची सहज साक्ष देतात. पारंपरिक भारतीय स्त्रियांचा पेहराव नेहमीच लक्षवेधी, मादक राहिला आहे. हेच पाहा ना.. ३००० वर्षांपासून वापरला जाणारा साडी हा प्रकार कोणत्याही पद्धतीने परिधान केला तरी तितकाच सेक्सी, क्लासी दिसतो.
आता आपण हे कपडय़ांचे हे बाह्य़ाकार म्हणजेच सिलोएट्स काय जादू करू शकतो ते यातून दिसेल. यांतील प्रमुख सिलोवेट्सचे प्रकार म्हणजे- चौरस, आयात, स्लिम, अवरग्लास, ए-लाइन, व्ही-कट आणि बेल. या आकारांबाबत आपण सर्वसामान्यपणे जागरूक असतो. पण त्या आकारांमुळे काय किमया साधता येईल याचा विचार मात्र फारसा करत नाही. ए- लाइनची फॅशन आहे, म्हणून तसा ड्रेस शिवून घेण्याचा अट्टहास करतो. पण सर्व प्रकारच्या, आकाराच्या व्यक्तींवर ए- लाइन शोभून दिसेलच असं नाही. उलट ठराविक फिटिंगच्या जीन्समध्ये आपली मैत्रीण छान बारीक दिसते, असं आपल्याला जाणवतं. पण ते म्हणजे नक्की काय हे कळत नाही. यालाच डिझायनर्सच्या भाषेत सिलोएट्सची जादू म्हणतात. कोणत्या सिलोएटमुळे काय परिणाम साधला जाईल, याचा थोडा विचार केला, तरी स्वत:चं स्वत:लाच सगळी जादू उमगत जाईल. कपडय़ांच्या आकाराचे म्हणजेच सिलोएट्सचे हे प्रमुख प्रकार त्यासाठी पाहिले पाहिजेत. ते पुढील भागात पाहू या.
(अनुवाद – गीता सोनी)
फॅशन पॅशन : कपडय़ांच्या सिलोएट्सची जादू
पोटावरची वाढलेली चरबी या ड्रेसमध्ये दिसून येतेय, मांडय़ा फारच जाड दिसताहेत, कंबर आहे त्यापेक्षा बारीक कशी दिसेल याची काळजी बहुतेक सगळ्याच मुलींना असते. हे असं वाढीव वजन कसं झाकायचं?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magic of silhouette clothing