मेकअप करताना बोटाऐवजी ब्रशेसचा वापर अनेक कारणांनी उपयुक्त ठरतो. हे आपण गेल्या आठवडय़ातील लेखात पाहिले. ब्रशने केलेला मेकअप हा इव्हन आणि पॉलिश्ड लुक देतो आणि हायजिनिकही असतो. ब्रशचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर याबद्दल आपण माहिती घेत आहोत. गेल्या भागात आय मेक अप करताना आवश्यक ब्रशची माहिती पाहिली. आता फेस मेक-अपचे ब्रश कोणते ते जाणून घेऊ या. प्रत्येक स्त्रीने एक ब्लश ब्रश विकत घ्यावाच, कारण मेकअप किटमधील हा ‘मल्टी टास्कर’ आहे. नॅचरल फायबर्स असलेले ब्रश खूप चांगला रिझल्ट देतात.
ब्लश / कंटूर ब्रश (Blush / Contour Brush) : प्रामुख्याने हा ब्रश ब्लशर लावण्याकरिता वापरतात. बाजारात याचेसुद्धा विविध आकार उपलब्ध आहेत. जसे की फ्लॅट, राउंड अगदी अँगलसुद्धा. ब्लशर लावताना ब्रश चीकबोन वर ठेवून खालच्या बाजूने ओढावा, याच्याने आपल्याला हव्या तेवढय़ा भागातच ब्लशर लागतो तोही समप्रमाणात.
चीक हाइलाइटर ब्रश (Cheek Highlighter Brush) : हा ब्लश / काँटूर ब्रशला पर्यायी ब्रश आहे. जर तुम्ही खूप कमी मेकअप करत असाल तर हा ब्रश विकत घेण्याची गरज नाही. पण ज्यांना मेकअपची आवड असेल आणि डीटेल्ड मेकप हवा असेल तर हा ब्रश विकत घेण्यास हरकत नाही. या ब्रशचा उपयोग नावाप्रमाणेच चीक बोन हाइलाइट करण्यासाठी होतो.
फाउंडेशन स्टिपिलग ब्रश (Foundation Stippling Brush) : या ब्रशच्या ब्रिसल्सचा पुढचा भाग हा सपाट आहे तो फाउंडेशनमध्ये डीप करावा आणि चेहऱ्यावर बारीक ठिपके ठेवावेत. असे केल्यास चेहऱ्यावर मेक-अपचे थर दिसत नाहीत, cakey वाटत नाही व अतिशय समप्रमाणात फाउंडेशन लागते. चेहरा गुळगुळीत दिसण्याकरिता व नॅचरल लुक येण्यास मदत होते. फाउंडेशन हा मेकअपचा बेस आहे आणि तो जर व्यवस्थित नाही लागला तर तुमचा चेहरा खराब दिसेल. म्हणून हा ब्रश तुमच्या ब्रश किटमध्ये आवश्यक आहे. या ब्रशला पर्यायी ब्रश आहे फ्लॅट फाउंडेशन ब्रश.
फ्लॅट फाउंडेशन ब्रश (Flat Foundation Brush) : जर तुम्ही एक्सपर्ट असाल तरच या ब्रशची निवड करा कारण याच्याने चेहऱ्यावर पॅचेस येण्याची शक्यता असते.
लिप ब्रश (Lip Brush) : सर्वसाधारण लिपस्टिक ही थेट ओठांवर अॅप्लाय केली जाते. परंतु ओठांचा आकार योग्य नसल्यास किंवा ओठ छोटे असल्यास लिपस्टिक ओठांबाहेर जाण्याची शक्यता असते. बाहेर गेलेली लिपस्टिक पुसल्यास बेस मेकअप खराब होतो. हे सर्व टाळण्यासाठी लिप ब्रश पर्फेक्ट आहे. ब्रशचे टोक लिपस्टिकवर किंवा लिपजेलवर बुडवून ओठांवर आउटलाइन द्यावी. नंतर आतील बाजू भरावी. गुळगुळीत ओठ चेहऱ्याला फिनिश्ड लुक देतात.
ब्रश वापरण्यासंबंधी टिप्स :
१. ब्रश स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात ब्रशची ब्रिसल्स बुडवा. हँडल बांबूचे असेल तर ते ओले होऊ देऊ नका.
२. बेबी श्ॉम्पूचे २-३ थेंब ब्रिसल्सवर टाका. ब्रशच्या साइज प्रमाणे शॅम्पूचे प्रमाण वाढवा. फाउंडेशन किंवा ब्लशरच्या ब्रशेससाठी थोडे जास्त ४-५ थेंब टाका, लहान साइज असलेल्या ब्रशसाठी २-३ थेंब पुरेसे होतात.
३. फेस येईपर्यंत ब्रिसल्स श्ॉम्पूमधे हलक्या दाबाने चोळा. खात्री करा की प्रत्येक ब्रिसल व्यवस्थित साफ झाला आहे. चोळताना काळजी घ्या की, ब्रशचा मूळचा आकार बिघडणार नाही व शॅम्पू/फेस ब्रशच्या मागील भागावर म्हणजेच हँडलवर (मेटल/ बांबूचा भाग) येणार नाही.
४. नंतर पाण्याने धुवा. जोपर्यंत फेस दिसत नाही तोपर्यंत पाण्याने धुवत राहा. ब्रिसल्सच्या आतील भागातीलसुद्धा फेस जायला हवा. ब्रश नळाखाली धुतले तरी चालेल पण नळाची धार जास्त नको.
५. कॉटनच्या मऊ कपडय़ावर ब्रशमधील पाणी टिपून घ्या. ब्रिसल्सचा मूळचा आकार बदलायला नको व ब्रिसल्स तुटायलाही नकोत.
६. आठ ते चौदा तास ब्रश मऊ कपडय़ावर कोरडे होण्याकरिता ठेवा व थोडय़ा थोडय़ा वेळाने गोलाकार पद्धतीने फिरवत राहा जेणेकरून ब्रिसल्सच्या सर्व बाजू कोरडय़ा होतील.
७. ब्रश वापरण्याआधी पूर्णपणे कोरडे झाले आहेत याची खात्री करून घ्यावी.
८. बेबी शॅम्पू ऐवजी सौम्य हँड वॉश किंवा िक्लजिंग मिल्कचा वापर करू शकता. हँड वॉश सौम्य असेल तरच वापरा नाही तर चेहऱ्याला अॅलर्जी येण्याची शक्यता असते.
९. ब्रिसल्सची प्रत उत्तम राखण्याकरिता कंडिशनरचाही वापर करतात.
१०. आठवडय़ातून एकदा किंवा दोन आठवडय़ांतून एकदा ब्रश साफ करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे नुसतेच ब्रश चांगले राहत नाहीत तर बॅक्टेरियांपासूनही संरक्षण होते.