दर वर्षी चातक पक्ष्यासारखी तरुणाई आंब्याची वाट पाहत असते आणि फायनली आंब्याचा सीझन चालू झालाय. आमरस पुरीच्या जेवणाला कधीही नाही म्हटलं जातच नाही. अशा या मधुर आंब्यांपासून जिभेची लज्जत वाढवणारे असंख्य पदार्थ तयार होऊ  शकतात. ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी त्यांच्या पोतडीतून फळांच्या राजाच्या हटक्या पाककृती खास ‘व्हिवा’ वाचकांसाठी पेश केल्या आहेत.

मँगो डोनट

साहित्य : कणीक १ वाटी, मँगो क्युब १०-१५, आरारूट पाव वाटी, फ्रुट सॉल्ट अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, टुथपीक १०-१२, तेल तळायला.

कृती : सर्व प्रथम कणीक, आरारूट, फ्रुट सॉल्ट, मीठ, २ चमचे तेल आणि थोडे पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा. नंतर यात टुथपीकच्या साहाय्याने आंब्याचे तुकडे मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा. मंद आचेवर तळून चीज मँगो सॉसबरोबर खायला द्या.

चीज मँगो सॉस – चीज क्युब ४ नग, आंब्याचा रस १ वाटी, अध्र्या िलबाचा रस, साखर हे सर्व साहित्य मिक्सरवर बारीक करून घ्या. चीज मँगो सॉस तयार आहे.

 

मिल्की मँगो बॉल्स

साहित्य : मिल्क पावडर ३ वाटय़ा, मँगो पल्प १ वाटी, मीठ चिमटीभर, मँगो जेली ४ चमचे.

कृती : २ कप मिल्क पावडर, मँगो पल्प एकत्र करून १०-१२ मिनिटे कुकरमध्ये शिजवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये मिल्क पावडर मिसळून घ्या. त्याचा गोळा व्यवस्थित मळून त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून वरच्या भागाने छिद्र करावे (वाटीचा आकार द्यावा) असे बॉल्स पुन्हा दूध पावडरमध्ये घोळून घ्या. सव्‍‌र्ह करते वेळी खोलगट भागात मँगो जेली घालून वाटल्यास चांदी वर्ख लावून सव्‍‌र्ह करा.

 

आमरस बर्फी

साहित्य : आंब्याचा रस १ वाटी, मिल्क पावडर २ वाटय़ा, सायट्रिक अ‍ॅसिड १ चमचा, चांदी वर्ख सजावटीकरिता, बदाम-पिस्ता पाव वाटी.

कृती : १ वाटी आंब्याचा रस नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर घट्ट करून घ्या. त्यानंतर यात २ वाटय़ा मिल्क पावडर, सायट्रिक अ‍ॅसिड एकत्र करून घ्या. हे मिश्रण एका छोटय़ा ट्रेमध्ये ओतून लगेच आठ ते दहा मिनिटे शिट्टी न लावलेल्या कुकरमध्ये शिजवा. थंड झाल्यावर चांदीचा वर्ख लावून वडय़ा कापून सव्‍‌र्ह करा.

 

चीज मँगो बाइट

साहित्य : हापूस आंबे २ नग, चीज ४०० ग्रॅम, दूध अर्धा लिटर, ब्रेड क्रम्स १ वाटी, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, तेल तळायला, टुथपीक ५-६.

कृती : सर्वप्रथम आंब्याचे चौकोनी तुकडे करून सोलून ठेवावेत. चीज किसून त्यात थोडे दूध घालून डबल बॉयिलग प्रोसेस पद्धतीने गरम करावे. ब्रेड क्रम्स व कॉर्नस्टार्च एकत्र मिसळून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून सर्वप्रथम टुथपीकला एक छोटा आंब्याचा सोललेला तुकडा लावावा. त्यावर आंब्याचे चौकोनी तुकडे लावून पुन्हा सोललेला भाग लावावा. अशा तयार केलेल्या स्टिक्स चीजमध्ये बुडवून लगेचच कॉर्नस्टार्च व ब्रेड क्रम्सवर घोळवून डीप फ्रीजमध्ये ठेवाव्यात. सव्‍‌र्ह करतेवेळी डीप फ्रीजमधून काढून गरम तेलात टाकून लगेच काढून खायला द्यावे.

 

मँगो रोल

साहित्य : आंब्याचा रस २ वाटय़ा, बदाम-पिस्त्याचे काप १ चमचा, पिठीसाखर २ चमचे, खवा ४ चमचे, चांदी वर्ख सजावटीकरिता

कृती : आंब्याचा रस नॉनस्टिक पॅनवर घालून मंद आचेवर जाळीदार डोसा तयार करून घ्या किंवा मायक्रोव्हेवच्या काचेला तेल लावून त्यात १० मिनिटे पसरवून ठेवल्याससुद्धा छान जाळीदार होतो. नंतर यावर खवा, सुक्या मेव्याचे काप, पिठीसाखर घालून चाकूच्या साहाय्याने लांब पट्टय़ा कापून प्रत्येक पट्टीची गुंडाळी करा. सुरळीच्या वडय़ासारखी त्यावर चांदी वर्ख लावून सव्‍‌र्ह करा.

 

मँगोला

साहित्य : आंब्याचा गर १ वाटी, साखर १ वाटी, कच्ची कैरी अर्धी वाटी, कॉर्नस्टार्च १ चमचा, सायट्रिक अ‍ॅसिड अर्धा चमचा.

कृती : साखरेचा पाक बनवून घ्या. त्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड, आंब्याचा गर घालून उकळून घ्या. सर्वात शेवटी कैरीच्या सालीचा वरचा भाग किसून घाला. कॉर्नस्टार्चच्या पाण्याने घट्ट करा. नंतर गाळून थंड करून प्यायला द्या.