स्वप्नील जोशीचा आंबा-भात, मोना सिंगचा मिल्कशेक, सिद्धार्थ चांदेकरचा खासा आंबा कॉच्युम आणि सेलिब्रिटींची अशीच ‘आम’बातें..
‘आंबा मला आवडत नाही!’ असं म्हणणारा मराठी माणूस सापडणे मुश्कील आहे. कधी एकदा मे महिना येतो आणि कधी एकदा आपल्याला आंब्याची लज्जत अनुभवायला मिळते याची प्रत्येकजणच वाट बघत असतो. कुणी म्हणतं आंबा उन्हाळ्यात येतो, त्यात तो उष्ण असतो, आंब्यानं वजन वाढतं. असे काही समज- गैरसमज आंब्याबाबत आहेत. पण फळांच्या या राजाविषयी चर्चा तर होणारच. हेच एक असं फळ आहे की ते खाण्याची प्रत्येकाची रीत, तऱ्हा न्यारी आहे. कुणी व्यवस्थित कापून आंबा खातो तर कुणी सरळ चोखून, कुणी फक्त रस काढून. प्रत्येकाच्या आंब्याच्या काही आठवणी असतातच. काही सेलिब्रिटींनी अशाच काही आंब्याच्या आठवणी ‘व्हिवा’शी शेअर केल्या आहेत.
आंबा आवडत नाही असा माझ्या आठवणीतला कोणी माणूस नाही. लहानपणी एका बैठकीत मी डझनाच्या वर आंबे फस्त करायचो. पण आता ते फिटनेस, जिमिंगमुळे एवढं खाणं जमत नाही. आंब्याने वजन वाढतं म्हणून गेली पाच र्वष मी एकही आंबा खाल्ला नाहीय. कारण एका वेळी एक किंवा दोन आंबे खाऊन माझं भागत नाही. मला आंबा नुसता खायला तर आवडतोच पण मला आंबा -भात खायला खूप आवडतो. (हे वाचल्यावर विचित्र तोंड करू नका. भन्नाट लागतो.. खाऊन बघा.) आपण जसं आमटी-भात खातो तसं मी आंबा भातात कुस्करून खातो.
मी आंब्याचा प्रचंड शौकीन असलो तरी आम्हा कलाकारांना एकूणच चित्रीकरण सत्र लक्षात घेऊनच आंब्यावर ताव मारावा लागतो. अन्यथा वाढतं वजन व्यक्तिरेखेच्या आड येऊ शकतं. सुदैवाने या वर्षी माझे मे महिन्यात पटकथावाचन वगैरे चालू आहे, पण चित्रीकरण नाही, म्हणून मी मनसोक्तपणे आंबा एन्जॉय केला. मी फ्रिजमध्ये दीर्घकाळ आंबा ठेवून तो प्रचंड थंड करतो व नंतर त्याची केळ्याप्रमाणे साल काढून तो खातो, त्याची चव काही वेगळीच लागते. पूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी कोल्हापूरला डॅडूच्या (अर्थात महेश कोठारे) चित्रपटाच्या सेटवर जाणं होई. तेव्हाच्या बालवयानुसार स्टुडिओच्या शेजारच्या आमराईवर दगड मारून आंबे पळवून सेटवर लपून राह्य़चो. डॅडूना हे कळल्याने ते मात्र खूप रागावत.
आंबा माझा अतिशय लाडका आहे. त्यामुळे आंब्याच्या मोसमात भरपूर व्यायाम करतो जेणेकरून भरपूर आंबा खाता येईल. माझ्याकडे आंबा खाण्यासाठीचा एक बनियान आहे. दर वेळी आंबा खाताना मी आधी तो घालतो. हा माझा दरवर्षीचा शिरस्ता आहे. त्या बनियानवर मागच्या वर्षीच्या आंब्याचे डाग पडलेले आहेत.(अर्थात तो बनियान दर वेळी धुतो मी.) त्यामुळे आंबे खाताना मस्त मूड येतो. आंबा चोखूनच खाल्ला पाहिजे असं माझं मत आहे. मस्त हापूस आंबा घ्यायचा (आंबा म्हणजे हापूसच असला पाहिजे इतर काही आपल्याला चालत नाही.) त्याच्या देठाला छोटीशी चीर पाडायची आणि मस्त चोखत चोखत तो आंबा खायचा. आंबा कापणं वगैरे मला माहीत नाही.
वजन वाढेल या भीतीने आंबा खायचाच नाही अथवा सावधपणे कमीच खायचा तर आंब्याचा मौसम दिलखुलासपणे कसा बरे एन्जॉय करायचा सांगा? मी लहानपणापासूनच आंबा खाण्याची शौकीन आहे. माझे एक आजोळ रांजणगाव, तर दुसरे कोकणात, त्यामुळे झाडावरच्या कैऱ्या पाडणे व आंबा पिकायची वाट पाहणे या गोष्टी खूपच एन्जॉय केल्यात. विशेषत: रायवळ, पायरी या आंब्याची मी शौकीन. कालांतराने ‘आंबामाहात्म्य’ समजू लागले तेव्हा अशोक हांडे यांच्यामुळे, त्यातही एक वेगळी चव आहे, तर संगीतकार मित्र मििलद इंगळे नेहमीच ‘पहिला आंबा आपल्याकडे’ याचा स्वत: आनंद घेतानाच त्यात इतरांनादेखील सहभागी करून घेणार. माझी ‘आंबा संस्कृती’ अशी बहरलीय अथवा विस्तारलीय.
‘छे, हो, या वर्षीच्या कोणत्याच आंब्याला गेल्या वर्षीची चव नाही. आणि किती ते महाग, काही विचारू नका, एवीतेवी आता आंब्यात खाण्यासारखे असतं काय..’, असं प्रत्येक वर्षी न चुकता म्हणायचे आणि पुन्हा एकदा या वर्षीच्या आंब्याचा गोडवा आनंदाने घ्यायचा. हीच तर आंबा संस्कृतीची खासियत आहे. यातच मजा आहे. दरवर्षी आंबा असं म्हणतच पुन:पुन्हा खाल्ला जातो. मी मूळची उरणची, म्हणजेच कोकणची सुरुवात तेथून होते. त्यामुळे आंबा खाणे मला लहानपणापासून आवडीचा उद्योग आणि सवयीचाही. जोडीला करवंदं, जांभळं इत्यादी इत्यादी. मला देवगड हापूस फारच प्रिय. अर्थात पायरी, रायवळ यांचाही मी भरपेट आनंद घेते.
आईच्या हातचा मिल्कशेक माझ्या लहानपणी मी शाळेतून घरी येण्याआधी आई छान आंब्याचा मिल्कशेक बनवून ठेवत असे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा आंबा मिल्कशेक पिणं म्हणजे स्वर्गसुख असे. आता डाएटिंगमुळे आंबा खाल्ला जात नाही. पण लवकरच माझी आई मुंबईत येणार आहे. त्या वेळी मी तिला भरपूर मँगो मिल्कशेक बनवायला सांगणार आहे. मग त्या एक दिवशी मी रात्रीच्या जेवणाला आनंदाने रजा देईन.