लग्न हा विषय एकूण चलतीत आहे, असं सध्या दिसतंय. नाटक, चित्रपट, मालिका सगळीकडून वेगवेगळ्या नावांनी तोच विषय हाताळला जातोय. लग्नाच्या गोष्टींवर गोष्टी सांगितल्या जाताहेत. आजची पिढी मात्र लग्न आणि त्याच्या पारंपरिक चौकटीतल्या मतांचं माप ओलांडून त्यापल्याड जाऊन लग्नसंस्थेबद्दल काहीतरी बोलू पाहतेय. लग्नाचं वय, पद्धत, बदललेल्या प्रायोरिटीज याबद्दल आजच्या तरुण अभिनेत्रींना बोलतं केलंय अनुश्री फडणीस हिनं…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लग्न कितव्या वर्षी करायचं हा निर्णय प्रत्येक व्यक्तिगणिक बदलतो. काहींना लवकर लग्न केल्यामुळे अधिक सुरक्षित वाटतं; तर काही जण सेटल डाऊन होण्याच्या दृष्टीनेही विचार करतात. लग्न लांबवण्याचा त्यांचा कल असतो. आजची पिढी खूप करिअरिस्टिक झाली आहे. मुली खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायेत, त्यामुळे एखाद्या क्षेत्रात खरंच मुलीला कुटुंबासाठी वेळ देणं शक्य नसतं. प्रत्येकीची आपापल्या क्षेत्रातील करिअरची इंटेन्सिटी बदलत असते आणि त्यानुसार लग्नाचं वयसुद्धा बदलत जातं. आपण कितीही प्रॅक्टिकल झालो आहोत, असं म्हणत असलो तरीही आज बहुतांश मुली घरच्यांसोबत ठरवूनच लग्न कधी करावं हा निर्णय घेतात. माझ्या लग्नाचा निर्णय घेताना फार लवकर लग्न करायचं नाही याबद्दल आम्ही दोघंही क्लीअर होतो. एकमेकांना समजून घेणं ही टू वे प्रोसेस असायला हवी. मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये येणारा लग्न हा विषय म्हणजे निखळ मनोरंजन असलं तरी आजही प्रत्येक कुटुंबात लग्न आणि त्यासोबत येणारी मजा, समारंभ याबद्दलची उत्सुकता दिसून येते. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबं यामुळे एकत्रित जोडली जातात. एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि आता तिसरी गोष्ट यामुळे ‘कुटुंब’ लोकांना आवडतंय, असं दिसतंय. मुख्य म्हणजे तरुण पिढीच्या भाषेत या नात्यांचा उलगडा करण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे तरुणांनाचीसुद्धा पसंती मिळतेय.
मला नाही वाटत लग्नाला असं काही ठरावीक वय असतं. एकतर आता एज्युकेशन सिस्टीम बदललेल्या आहेत, त्यामुळे जास्त शिकण्याकडे, करिअर करण्यात आजची मुलं-मुली बिझी असतात. पूर्वी लग्नासाठी जे वय मुख्य मानलं जायचं ते वय आज शिक्षणात जातं. आजच्या काळात मुला-मुलींचं लग्नाचं वय पुढे सरकतंय. काही ठिकाणी सीनिअर सिटिझन्ससुद्धा सेकंड मॅरेज करताना दिसतात. त्यामुळे चांगला जोडीदार हा वयाच्या कोणत्याही टप्प्यात आयुष्यात येऊ शकतो. ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लग्न करायचं आहे अशा तरुण पिढीने लग्नाबद्दल काय विचार करायला हवा हे यात मांडलं आहे. माणसं एकमेकांना क्लिक झाली की, खऱ्या अर्थाने लग्न व्हायला पाहिजे. एखाद्याने लग्नाचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय टिकवण्याचीही जबाबदारी त्या व्यक्तीने पेलली पाहिजे. रंग, रूप यापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून जोडीदार आवडतोय हा विचार यानिमित्ताने मांडला गेला आहे. तरुण पिढीला लग्नसंस्था कळावी हा या माध्यमातून केलेला प्रयत्न आहे.
तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की, आजच्या काळातली मुलगी वयाचा विचार करण्यापेक्षाही आधी म्हणते- मला स्वत:ला स्वत:च्या पायावर उभी राहू दे. मग मी लग्न करेन. पूर्वी १८ ते २१ किंवा २२ हे वर्ष म्हणजे मुलीच्या लग्नासाठी डेडलाइन असायची. पालकसुद्धा याबाबतीत घाई करायचे; परंतु आज काळ बदललेला आहे. फक्त मुलगीच नाही तर तिचे पालकही ती काहीतरी स्वत:चं करिअर करू पाहतेय या गोष्टीला सपोर्ट करताना दिसतात. असं असलं तरीही बहुतांश पालकांचा कल ‘वेळेत लग्न’ करा या गोष्टीकडेसुद्धा असतो; पण तरीदेखील एखाद्या मुलीला तिशीपर्यंत लग्न करू नये, असंही वाटू शकतं आणि यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. खरंतर लग्न हा विषय अनेक चित्रपट-मालिकांमध्ये पूर्वापार चालत आलेला विषय आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे लग्न हीसुद्धा माणसाची गरज आहे. हीच संस्कृती आजच्या पिढीपर्यंत मालिका आणि चित्रपटांद्वारे त्यांच्या भाषेत मांडली जातेय. आजची पिढी कितीही फॉरवर्ड असली तरीही त्यांच्या जबाबदाऱ्यांशी ही पिढी जोडली गेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडूनही लग्न या संदर्भातल्या मालिका आणि चित्रपटांना प्रतिसाद मिळतो आहे.
लग्नाच्या वयाला मला नाही वाटत काही बंधन असावं; कारण एखाद्या कपलला वाटलं आमची लग्न करण्यासाठी आता तयारी आहे तेव्हा त्या वयात ते लग्न करू शकतात. पूर्वीच्या काळात मुलींची खूप कमी वयात लग्न होत. त्यामुळे काही कळण्याच्या आत त्या मुलीला सगळ्या बंधनांना बळी पडावं लागत असे; पण आजच्या युगातल्या स्त्रीने स्वत:ला सिद्ध केलंय. एकंदरच लग्नसंस्था किंवा लग्न ही विचार करूनच केली जातात. आजकाल बहुतेक मुलींची लग्ने २२ व्या वर्षांपर्यंत होतात, नाहीतर मग थेट ३० व्या वर्षी होतात. वयाच्या मधल्या टप्प्यात कोणी आजकाल लग्न करताना फारसं दिसत नाही. अर्थात हे माझं निरीक्षण आहे. मला वाटतं एकमेकांना ओळखायला लागल्यानंतर लगेचच दोन वर्षांत लग्न करणं हे कधीही उत्तम. माझं लग्न झाल्यानंतर आम्हाला एकमेकांविषयी अधिक जबाबदारी जाणवायला लागली. आज लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्येही अनेक कपल राहतात; परंतु नात्याला सुरक्षितता येण्यासाठी एक संस्था हवी असते आणि ती म्हणजे लग्नसंस्था, असं मला वाटतं. आधीच्या पिढीपेक्षा आजची पिढी लग्न खूप विचार करून करतेय. बदलत्या लग्नसंस्थेच्या युगात लग्न, त्यातली मजा, संस्कृती आज तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रयत्न होत असला तरीही शेवटी त्यातून किती बोध घ्यायचा हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मला वाटतं लग्न आणि ते कुणी, कधी करायचं, हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. मी असंही नाही म्हणणार की, लग्नासाठी सत्तावीस हेच योग्य वय आहे किंवा वीस हेच योग्य वय आहे. मुलाला आणि मुलीला दोघांनाही लग्न करणं म्हणजे काय हे समजणं आणि ती जबाबदारी घेण्याची मानसिक, शारीरिक आणि आíथक अशा तिन्ही बाजूंनी त्यांची तयारी असणं ही लग्नाची योग्य वेळ आहे, असं माझं मत आहे. ही वेळ जेव्हा येईल तेव्हाच त्यांनी लग्न करावं. माझं आणि उमेशचं लग्न होण्याआधी आम्ही सात वर्षे एकमेकांना ओळखत होतो; पण तरीही आम्ही लग्नाची घाई केली नाही; कारण मी लहान होते. माझ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी माझं लग्न झालंय. मी लग्नासाठी अजून थांबले असतेही कदाचित. परंतु उमेश माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे अजून किती दिवस थांबायचं हा सगळा विचार करून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. लग्न करताना एकमेकांना समजून घेणं हे खूपच महत्त्वाचं असतं; कारण मी जेव्हा सासरी आले तेव्हा मला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रात माझं करिअर लग्नानंतरही, सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडून करू शकते, असा विश्वास उमेशने दाखवला. पती-पत्नीचं नातं आणि त्या नात्यातल्या जबाबदाऱ्या समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कोणाला हे विसाव्या वर्षीदेखील चांगलं जमू शकतं; तर कोणाला ३५व्या वर्षीही ते जमणार नाही.