काही दिवसांपूर्वी टीव्हीवरची एक जाहिरात बरीच गाजली होती. मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये बसलेला तरुण, ‘मी लग्नानंतर बायकोचं नाव लावणार’, असं सांगतो आणि मॅरेज रजिस्ट्रारसकट प्रेक्षकही अचंबित होतात. एका पंख्याची जाहिरात आणि टॅगलाइन.. हवा बदलेगी. आता अगदी तंतोतंत नाही तरी अशा हवाबदलाची काही उदाहरणं नक्कीच दिसताहेत. हवेची दिशा नक्कीच बदलतेय. या बदलत्या हवेचेच काही झोत टिपायचा हा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लग्नानंतर नवऱ्याच्या गावी शिफ्ट व्हायचं किंवा लग्नानंतर नवऱ्याची बदली झाली, तर तिथे जायचं हे मुलींसाठी गृहित धरलेलं सत्य. पण तेही आता बदलतंय. होणाऱ्या बायकोच्या करिअरसाठी तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाणारे आणि लग्नानंतरही बायकोच्या करिअरला प्रायॉरिटी देत स्वत शिफ्ट होणारे तरुण आता दिसायला लागलेत.
‘काय रे तू जॉब का सोडतो आहेस?’
‘अरे मी बंगलोरला शिफ्ट होतोय. तिथे नवीन कंपनी जॉईन करतोय.’
‘काय! का पण? ते पण बंगलोरला? घरापासून इतक्या लांब?’
‘अरे बायकोला चांगली ऑफर मिळाली आहे तिथे. तिच्या करियरसाठी खूप महत्त्वाचा आहे हा जॉब. म्हणून मी माझा जॉब बदलतो आहे.’
हा संवाद अजिबात अतिशयोक्तीपूर्ण नाही. अगदी लहानपणापासूनच आपण ‘बाबांची’ बदली पाहिलेली, अनुभवलेली असते. पण आईची बदली आणि त्यासाठी शिफ्टिंग हे तसं न अनुभवलेलं. पण पुढच्या पिढीला हा अनुभव नक्की मिळणार. आत्ता पंचवीस-तिशीत असलेल्या मुली खूप करिअरिस्ट आहेत आणि त्यांचे पार्टनरही त्यांच्या करिअरला साथ देताहेत. त्यामुळे बायकोच्या किंवा गर्लफ्रेंडच्या नोकरीच्या ठिकाणी बदली करून घेणारे अथवा नवी नोकरी शोधणारे तरुण आता दिसायला लागले आहेत. मुलगा-मुलगी असा भेद न करता करिअरची समान संधी देणारं वातावरण हळूहळू निर्माण होतंय. त्यामुळे बायकोचं करिअर हादेखील प्राधान्यक्रम असणारे तरुण दिसताहेत.
सेटल्ड जॉब, सवयीचं शहर, कुटुंबीय यांना सोडून जाणं सोपं नाही. घर, खाणं-पिणं, भाषा, हवामान सगळंच बदलतं. पण पूर्वीपासून मुली केवळ नवऱ्याच्या नोकरीसाठी हे सगळं अॅडजस्ट करून घेत होत्या. त्यांनी तसं केलंच पाहिजे हाच समज होता. पण हल्ली अॅडजस्टमेंट दोन्ही बाजूंनी व्हायला लागली आहे.
नागपूरच्या सिद्धार्थने बायको प्रज्ञासाठी नागपूरहून पुण्याला बदली घेतली. सिद्धार्थ सांगतो, ‘आजच्या २१ व्या शतकात जगताना, लग्नानंतर केवळ मुलीनंच सगळ्या अॅडजस्टमेंट्स कराव्यात हे म्हणणं इररिलेव्हंट आहे. प्रत्येकासाठी त्याचं करियर महत्त्वाचं असतंच. फक्त नवरा-बायकोमध्ये अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा प्रज्ञा पुण्याला एका आयटी फर्ममध्ये काम करत होती आणि मी नागपूरला. माझ्यासाठी तिने तिची नोकरी सोडावी असं मला कधीच वाटलं नाही. मधला मार्ग काढायला आम्हाला जवळ जवळ एक वर्ष वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावं लागलं. मग मी पुण्याला शिप्ट व्हायचं ठरवलं. मला तिथे नोकरी मिळाली आणि आज आम्ही दोघंही आनंदात आपापले जॉब्स सांभाळत एकत्र राहात आहोत.’ सुरुवातीला बायकोसाठी बदली करून घेणं स्वीकारणं जड जाईल अनेकांना, पण खरोखर युवर जॉब इज माय प्रायॉरिटी असं म्हणत तिचं करिअर सांभाळून घेणारा तोच खरा जंटलमन.
निहारिका पोळ
खुलासा
गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या (व्हिवा दि. २२ मे)‘‘भारताच्या मुलीं’ना बदल कधी दिसणार?’ या लेखातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपट दिग्दर्शिकेचे नाव विभा बक्षी असे आहे. विभा दीक्षित असे चुकीने दिले गेले होते. त्याबद्दल दिलगीर आहोत.