२५ डिसेंबर दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो – सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक.  बेकरीमध्ये ख्रिसमसची तयारी एक महिन्यापूर्वी सुरू होते.  ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. या आठवडय़ात ख्रिसमस मेन्यू खास तुमच्यासाठी.

सोया नानकटाई
साहित्य : सोयाबीनचे पीठ अर्धी वाटी, कणीक अर्धी वाटी, पिठीसाखर १ वाटी, लोणी पाऊण वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, थंड पाणी भिजवायला.
कृती : सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व छोटे चपटे गोळे करून वर एक एक काजूचा तुकडा लावावा. १८० डीग्रीवर ८- १० मिनिटे बेक करावे.

shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…

खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
साहित्य : पिठीसाखर ७५० ग्रॅम, साजूक तूप ४५० ग्रॅम, अंडी ६ नग, सोडा (खाण्याचा) ५ ग्रॅम, दूध अर्धा लिटर, दळलेली खारीक ९०० ग्रॅम, अक्रोड १५० ग्रॅम, मदा ९०० ग्रॅम, दालचिनी ५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम.
कृती : दळलेली खारीक, दूध आणि मीठ एका पात्रात ठेवावे. साखर व तूप एकत्र फेटावे. त्यात अंडी टाकून पुनश्च फेटावे. यानंतर दूध व खजूर पीठाचे मिश्रण व इतर घटक पदार्थ वरील मिश्रणात टाकावेत आणि मऊ होईपर्यंत ते मिसळावेत. तूप लावलेल्या भाजण्याच्या थाळ्यावर (शीटवर) कुकीज् पाडून घ्याव्यात. भाजण्याची प्रक्रिया ३५० डिग्री फॅरनहाइट तापमानावर करावी. साधारण २० ते २५ मिनिटे भाजावे.

हनी बनाना ब्रेड
साहित्य : कुस्करलेली केळी २ वाटय़ा, अंडी २ नग, तेल अर्धा कप, कणीक ३ वाटय़ा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मध ५ चमचे, मीठ छोटा पाव चमचा, साखर ५ चमचे, लोणी ४ चमचे.
कृती : सर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइट वर गरम करून घेणे. नंतर कणकेमध्ये बेकिंग पावडर, सोडा, मीठ, पिठीसाखर मिसळून, चाळणीने चाळून एकत्र करा. सर्वात शेवटी अंडी, मध, लोणी, केळी मिक्सरमध्ये एकत्र करून कणकेत मिसळा व मिश्रण चांगले मळून घ्या. ब्रेडच्या भांडय़ाला ग्रिसिंग करून मळलेला गोळा ठेवून १० मिनिटे फुलू द्या. नतंर अर्धा तास बेक करा.

रम केक
साहित्य : साखर १ वाटी, तूप किंवा बटर १ वाटी, मदा १ वाटी, रम अर्धी वाटी, बेकिंग पावडर पाव चमचा, दूध आवश्यकतेनुसार, ड्रायफ्रुट्स अर्धी वाटी.
कृती : केक बनविण्याच्या १ महिन्यापूर्वी ड्रायफ्रुट्स रममध्ये भिजवून ठेवावे. जेव्हा केक बनवायचा आहे तेव्हा मदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने चाळून घेणे. त्यात रममध्ये भिजवत ठेवलेले ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घालणे. नंतर त्यात बटर आणि साखर घालून चांगल्या प्रकारे फेटून घेणे. शेवटी दूध घालून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केक बनविण्याच्या भांडय़ात घालून १५ मिनिटे बेक करावे. वरून ड्रायफ्रुट्सने घालून सव्‍‌र्ह करावे.

पोटॅटो ब्रेड
साहित्य : कणीक अर्धा किलो, बटाटे अर्धा किलो, मीठ २० ग्रॅम, साखर ४० ग्रॅम, यीस्ट २० ग्रॅम, पाणी ६०० ग्रॅम, तेल वा वनस्पती तूप ८० ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण १ चमचा.
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे व ते कुस्करून एकजीव करावे. यीस्टला थोडय़ा गरम पाण्यात, साखर व कणीक घेऊन काचेच्या ग्लासात फुगण्याकरिता ठेवा. कणकेत बटाटय़ाचे मिश्रण, १ चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, साखर, फुगलेला यीस्ट आणि पाणी मिसळून एकत्र करून घेणे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात तूप घालून पुन्हा हे मिश्रण चांगले मळून घ्यावे व १ तास झाकूण ठेवावे. १ तासानंतर पुन्हा कणकेला मळून घ्यावे. ब्रेडच्या साच्याला तेल लावून त्यात मळलेला गोळा व बारीक चिरलेला लसूण पसरवा. ४५ मिनिटांनी कणीक फुलल्यावर २०० डीग्रीवर ३० ते ४० मिनिटे ठेवावे. कुकरमध्ये जर शिजवायचे असल्यास कुकरमध्ये रेती टाकून गरम करावे. नंतर ब्रेडच्या कणकेचा डबा आत ठेवून ३० ते ४० मिनिटे शिजू द्यावे.

पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
साहित्य : मदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
सजावटीचे साहित्य : साखरेचे पाणी (पाक) पाऊण कप, फेटलेले क्रीम २०० ग्रॅम, पायनापल पिसेस १ कप, चेरी ८ ते १०.
कृती : मदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे तिन्ही साहित्य एकत्र करून तीनदा चाळून घेणे. एका बाऊलमध्ये बटर, पिठीसाखर आणि कन्डेस्ड मिल्क एकत्र करून कमीत कमी दहा मिनिटे फेटावे. हे मिश्रण हलके आणि फुगेस्तोवर फेटावे.
या मिश्रणात चाळलेला मदा घालून हे मिश्रण परत एकदा १५ ते २० मिनिटांपर्यंत एकजीव होईपर्यंत फेटावे. वरील मिश्रणात सोडा वॉटर आणि पायनॅपल इसेन्स घालून परत एकदा १ ते दीड मिनिटे फेटून घ्यावे. हे मिश्रण ताबडतोब बटर लावून सावरलेला प्लॅस्टिक केकच्या साच्यामध्ये ओतून मायक्रोवेव्हमध्ये न झाकता हाय पॉवरवर, (900 w/max/100%) तापमानावर ४ ते ५ मिनिटे ठेवावे.
केक थंड झाल्यावर साच्यातून बाहेर काढून आडवा कापून घ्यावा. एका भांडय़ात एक कप पाणी घेऊन या पाण्यात १ चमचा साखर घेऊन मायक्रोवेव्हमधे ३ ते ४ मिनिटे उच्च दाबावर (900 ६/ें७/100%) ठेवून साखरेचे पाणी तयार करून घेणे. मायक्रोवेव्हमध्ये हे भांडे झाकण न लावता ठेवावे. आडवा कापून घेतलेल्या केकचा खालचा भाग जो आहे त्या भागावर साखरेचे पाणी िशपडावे. केकचा भाग ओला होईस्तोवर या केकवर फेटलेले क्रीम पसरवून त्यावर अननसाचे तुकडे ठेवून त्यावर परत एकदा क्रीम पसरवून कापलेल्या केकचा दुसरा भाग त्यावर ठेवावा. केकवर साखरेचे पाणी शिंपडावे. या केकवर पण क्रीम घालून सर्व बाजूने एकसारखे करून घ्यावे. या केकला अननसाच्या तुकडय़ांनी आणि चेरीने छान सजवून घ्या.

कॉर्न नानकटाई
साहित्य : मक्याचे पीठ २ वाटी, पिठीसाखर १ वाटी, लोणी पाऊण वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, थंड पाणी भिजवायला.
कृती : सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व छोटे चपटे गोळे करून वर एक एक काजूचा तुकडा लावावा. १८० डिग्रीवर ८ ते १० मिनिटे बेक करावे.