योग्य आहार घेतल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा बळकट बनतो आणि त्याचं शुद्धीकरणही होतं. मानवी शरीरात ज्या अन्नघटकांचं पचन सहजगत्या होतं, ते घटक आपल्याला भरपूर ऊर्जा आणि पोषण पुरवतात तर अयोग्य आणि अतिरेकी खाण्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. आपल्या मेंदूची वर्तवणूक, आपले मूड्स, विचारप्रक्रिया आणि ताणाचं व्यवस्थापन यामध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. नेहमीच ताजं, नैसर्गिक आणि हितावह अन्न खाल्लं पाहिजे. कारण या अन्नामध्ये औषधी, रोगनिवारक आणि पुनर्योजी गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारात फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्यं, चवळी वर्गातली धान्यं, अख्खी धान्यं, सुकामेवा आदींचा समावेश आवर्जून केलेला असावा. मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या-पोषक घटक, बुद्धी, वाढ आणि सर्जनशीलता या गोष्टी याच अन्नघटकांकडून मिळतात.
अन्न पोषण करणारं, शरीरातले अनावश्यक घटक काढून टाकणारं, शरीराचं शुद्धीकरण करणारं असावं. त्यामुळे शरीर सातत्याने स्वत:चं पुनर्योजन करू शकेल आणि त्याची योग्य वाढही होईल. या प्रक्रियांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अबाधित राहील आणि शरीर तसंच मनाची दुरुस्ती, पुनरुज्जीवन, रोगनिवारण होऊन त्यांना नवसंजीवनी मिळेल.
मिकीज् फिटनेस फंडा : स्त्रीच्या आरोग्याला बळकटी देणारे अन्नघटक
योग्य आहार घेतल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा बळकट बनतो आणि त्याचं शुद्धीकरणही होतं. मानवी शरीरात ज्या अन्नघटकांचं पचन सहजगत्या होतं, ते घटक आपल्याला भरपूर ऊर्जा आणि पोषण पुरवतात तर अयोग्य आणि अतिरेकी खाण्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. आपल्या मेंदूची वर्तवणूक, आपले मूड्स, विचारप्रक्रिया आणि ताणाचं व्यवस्थापन यामध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-06-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mickys fitness funda food component to support women health