प्रत्येक आई-वडिलांना आपलं मूल शारीरिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा आणि भावनिकदृष्टय़ाही निरोगी असावं, असं वाटत असतं. मुलांना उत्तम पोषण मिळाल्यास त्यांच्या एकंदरीत आरोग्यावर तसंच वाढीवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. याच वयात मुलांमध्ये आहाराच्या चांगल्या सवयी बाणवल्या पाहिजेत. त्यात नसर्गिक आणि र्सवकष पदार्थाचा प्रामुख्याने समावेश होतो, ज्यात निसर्गाचा चांगुलपणा ठासून भरलेला असतो.
आपल्या शरीरासाठी तसंच एकंदरीत वाढीसाठी अन्न किती महत्त्वाचे आहे, हे आपणा सर्वाना माहीत आहे. वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं, टीव्ही यावर आपण सातत्याने याबद्दल ऐकत असतो, वाचत असतो. पालकांना आपलं मूल शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा निरोगी बनावं, असं वाटणं स्वाभाविक आहे. मुलांना चांगलं पोषण मिळालं तर त्यांच्या एकंदरीत आरोग्य आणि वाढीवर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. वाढत्या वयात मुलांच्या पोषणाच्या गरजा अत्यंत महत्त्वाच्या असतात. रोगांपासून त्यांचा बचाव व्हावा तसंच त्यांची हाडं, दात, स्नायू आणि ऊतींचा योग्य विकास व्हावा, रोगप्रतिकारकशक्ती चांगली व्हावी यादृष्टीने पोषणाच्या गरजांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मूल वरचेवर जंतुसंसर्गाने तसंच डायरिया, कांजिण्या आणि इतर रोगांनी आजारी पडत असेल तर त्याच्या वाढीसाठी चांगलं नाही शिवाय त्यामुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची शरीराकडून होणारी मागणीही वाढत जाते. या आजारांमुळे भूक मंदावत असल्याने वाढत्या वयाच्या मुलांमध्ये वजन कमी होणं, लक्ष केंद्रित करता न येणं, ढिसाळपणा अशी लक्षणं दिसू लागतात.
मुलांचं वाढीचं वय हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. त्यांच्या वर्तणुकीतही या वेळी बदल होत असतात. मुलाचं भावी आयुष्य निरोगी आणि दीर्घ असावं यासाठी मुलाला सक्षम बनवणं गरजेचं असतं. पालक म्हणून मुलांना निरोगी आणि पोषक आहाराची सवय लावणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मुलं आहाराबाबत सजग होऊन योग्य आणि पोषक आहारच निवडतील. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, ठरावीक पदार्थाबद्दल मुलांना तिरस्कार वाटतो. घर, शाळा, भावंडं आणि समवयीनांकडून आलेल्या विचारांमुळे त्यांना हा तिरस्कार वाटत असतो. परंतु आयुष्य अधिक सकारात्मक बनवण्यासाठी या अडचणींचा सामना कसा करावा हे त्यांना योग्य आणि तरलपणे समजावून सांगितलं पाहिजे.
पोषणतत्त्वांचा अभाव, स्थूलता, हाडांची वाढ योग्यरीत्या न होणं, हृदयविकार, मधुमेह आदी विकारांपासून स्वत:ला वाचवायचं असल्यास संतुलित आणि योग्य पोषण हाच मार्ग आहे. अनेक वेळा पोषकतत्त्वांचा अभाव असणाऱ्या सॉफ्टिड्रक्स आणि फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे हे आजार आपल्याला ग्रासतात.
लहान आणि किशोरवयीन मुलांमधली स्थूलता ही आज अनेक पालकांची डोकेदुखी बनली आहे. वाढत्या वयामध्ये मोठय़ा प्रमाणावर चरबी साठते. उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा आणि स्थूलतेमुळे होणारे अनेक इतर आजार टाळण्यासाठी या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. सुजाण, आरोग्यपूर्ण आहार आणि व्यायामाच्या बळावर या समस्येशी लढलं पाहिजे.
तुमच्या मुलाला संतुलित आणि आरोग्यपूर्ण आहार मिळण्यासाठी खाली काही सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वं सांगितली आहेत. त्यांचं पालन केल्यास मुलांना निरोगी बनवणं कठीण नाही.
* मुलांना बळकट बनवण्यासाठी त्यांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असावेत. त्यामुळे मुलांचे दात आणि हाडं बळकट बनतील, केस निरोगी बनतील, लक्ष केंद्रित करणं सोपं बनेल, त्यांना अधिक ऊर्जा मिळून ते अधिक अ‍ॅक्टिव्ह होतील. आहाराचे पर्याय आकर्षक असावेत, ज्यात वैविध्य आणि चवीला प्राधान्य असेल. ज्या मुलांच्या आहाराच्या सवयी निरोगी असतील ती मुलं सर्वाधिक निरोगी आयुष्य जगतील.
* मुलांना त्यांच्या भुकेपेक्षा जास्त अन्न जबरदस्तीने खायला लावू नये.
* मुलांना काय आवडतं याचाही नेहमीच विचार केला पाहिजे. त्यांच्या आवडत्या आहारामध्ये सॉफ्टिड्रक्स, चॉकलेट्स, आइस्क्रीम, बर्गर, पिझ्झा आदींचा समावेश असू शकेल. असे पदार्थ अजिबातच खायला न देणं योग्य नाही. कंटाळा, तोचतोचपणा घालवण्यासाठी किंवा वीकएण्ड ट्रीट म्हणून प्रमाणात त्यांना हे पदार्थ खायला देण्यास काहीच हरकत नाही.
* आहाराच्या वेळा सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. अशाने त्यांच्यात आहाराच्या चांगल्या सवयी बाणवल्या जातील. यासाठी तुम्ही तसं वागून त्यांच्यासाठी आदर्श बनलं पाहिजे.
* मुलांना ताजी फळं, भाज्या आणि अख्ख्या धान्यांची उत्पादनं खाण्यास प्रेरित करा.
* चहा, कॉफी, सॉफ्टिड्रक्स आणि इतर एरिएटेड पेय पिण्यास उत्तेजित करू नका. कारण त्यांची पुढे सवय लागते. या पेयांमुळे त्यांच्या पचनसंस्थेला जास्त काम करावं लागू शकतं.
* लो-फॅट दूध आणि दही खाण्याची सवय लावा.
* तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन, मासे खाण्याची सवय मुलांना लावा. लाल मटण, हॅम, बेकॉन हे पदार्थ टाळा.

बनवायला अत्यंत सोप्या असलेल्या पौष्टिक स्नॅक्ससाठी या काही टिप्स
थोडी कल्पनाशक्ती वापरली आणि प्लॅिनग केलं तर रोजचे स्नॅक्स आकर्षक बनू शकतील.
* योगर्ट डिप, साल्सा, हमस या डिप्सबरोबर रंगीत कच्चं भाज्यांचं सॅलड खायला द्यावं.
* अख्ख्या गव्हापासून किंवा विविध धान्यांपासून बनवलेल्या ब्रेड स्टिक्स किंवा पिता, हमसबरोबर खाव्यात.
* बटर न लावलेले पॉपकॉर्न
* भाजलेल्या कुरमुऱ्याची घरी बनवलेली भेळ
* अख्ख्या गव्हापासून बनवलेल्या ब्रेड स्लाइसेस किंवा क्रॅकर्स, पीनट बटरबरोबर
* गूळ किंवा मधापासून बनवलेली तीळ किंवा शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू
* सॉय मिल्क, फळं, सुकामेवा
* घरी बनवलेले होल मिल मफिन्स
* अख्ख्या गव्हापासून बनवलेले हॉट डॉग्ज/ बर्गर्स, चिकन किंवा टोफू पट्टीजबरोबर.
मुलं नेहमी आपल्या पालक किंवा भावंडांकडे आदर्श म्हणून पाहतात. ते त्यांच्यासारख्याच गोष्टी करतात. निरीक्षणातूनही ते बरंच काही शिकतात.
त्यामुळे पालक म्हणून तुम्ही स्वत: खाण्याची निरोगी सवयी बाळगून मुलांपुढे एक आदर्श उदाहरण ठेवलं पाहिजे. घरातल्या प्रत्येकाने या आरोग्यपूर्ण सवयी स्वत:ला लावून घेतल्या पाहिजेत. त्याला नियमित व्यायाम, आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजची जोड दिली पाहिजे. हा अख्ख्या कुटुंबाचाच दररोजचा नेम असावा. मुलाची शारीरिक, भावनिक आणि मानसिक वाढ पूर्णत्वाने व्हायची असल्यास घरातल्या प्रत्येकाने या गोष्टी पाळल्या पाहिजेत. मुलाला दिवसातून ४ ते ५ वेळा खायची सवय लावा. त्यामुळे दिवसभरात त्यांना काबरेहायड्रेट्स, प्रोटिन्स, फॅट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबरचं योग्य पोषण प्रमाणात मिळेल.

Story img Loader