पळा पळा कोण पुढे पळे तो, असं म्हणत सरलेलं बालपण, अ‍ॅडमिशन नावाच्या एका चक्रव्यूहात अडकून पडलंय. त्या चक्रव्यूहातच अविरतपणे चालू असलेला खो-खोचा खेळ ‘इथे अ‍ॅडमिशन मिळणार नाही, हवं असेल तर डोनेशन नामक प्रोसेसला सामोरे जाण्याची तयारी ठेवा!’ किंवा मग टेबलाखालून चालू असलेला, तरी पण आजच्या जगात ‘निरभ्र’ ठरलेला ‘शिक्षणाचा व्यापार’! प्रत्येक पावलागणिक होणारी विद्यार्थ्यांची दमछाक! पर्सेटेजेसची लागलेली ही लगोरी फोडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न. पशांची जमवाजमव अन् त्यातच कुठे तरी “this is mission admission”असं म्हणत पडणारे सुस्कारे! अ‍ॅडमिशनच्या या वातावरणाची सैर घडवत्येय अनघा पाटील
ट्रेनचा हा रोजचाच प्रवास कॉलेजच्या वाटेचा. गेली ४ र्वष अव्याहतपणे चालू असलेला. नियमित न चुकता. त्यामुळेच की काय, पण ट्रेनच्या टाइम टेबलपासून ते वाटेवरल्या सूक्ष्म खुणांची अगदी डिटेलमध्ये ओळख पटलेला. त्यात नावीन्यपूर्ण असं काहीच नाही, असेलच तर ते फक्त माणसांच्या बदलणाऱ्या चेहऱ्यांत!!
आज तशी गर्दीही बऱ्यापकी होती.. गेल्या आठवडय़ात लागलेले रिझल्ट्स आणि मग त्यामुळे मुलांची अन् पर्यायानं पालकांची सुरू झालेली ही अ‍ॅडमिशनची धावपळ-पळापळ. अगदी तारेवरची कसरत. त्या कसरतीतच कुठं तरी ट्रेनचा प्रवास पहिल्या-वहिल्यानं करणारे निरागस चेहरे कपाळावरील घर्मिबदू अलगद टिपत आता हे रोजचंच असं म्हणून मुंबईच्या ‘लाइफलाइनची’ सवय करून घेणारे. मागं पडणाऱ्या प्रत्येक स्टेशनसरशी मागं सरणारं त्याचं बालपण आणि पुढच्या स्टेशनप्रमाणे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं आणि खुणावणारं त्याचं कॉलेज लाइफ!!
पण या साऱ्यातही सर्वात आधी खुणावतेय ती अ‍ॅडमिशनची प्रोसेस! अनेक कॉलेजेसच्या नावांची यादी, त्यांच्या नावांची सरमिसळ, स्वत:च्या करिअरबद्दलचे अनेक प्रश्न, पालकांच्या अपेक्षा, स्वत:मधलं टॅलेंट.. स्वत:चा कल अन् मिळालेले पर्सेटेजेस! या साऱ्याचा बॅलन्स सांभाळण्याचा चालू असलेला नुकत्याच पंख फुटून भरारी मारण्याची स्वप्न पाहणाऱ्या अनेक पाखरांचा प्रयत्न! ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनं कुठं तरी जराशी कमी झालेली धावपळ, पण त्यातही आवडीचं कॉलेज मिळवण्यासाठी चालू असलेली धडपड अन् त्यासाठी करावी लागणारी अविरत स्पर्धा!! कशाची? तर फक्त मार्क्‍सची! का? तर म्हणे अमुक अमुक साइडला जायचं तर अमुक अमुक कॉलेज चांगलं, मग त्यासाठी एवढेच (?) पर्सेटेज हवेतच! हा पालकांचा अन् आजकाल ‘स्मार्ट’ बनलेल्या मुलांचाही निर्थक अट्टहास!
पळा पळा कोण पुढे पळे तो, असं म्हणत सरलेलं बालपण, अ‍ॅडमिशन नावाच्या एका चक्रव्यूहात अडकून पडलंय. त्या चक्रव्यूहातच अविरतपणे चालू असलेला खो-खोचा खेळ ‘इथे अ‍ॅडमिशन मिळणार नाही, हवं असेल तर डोनेशन नामक प्रोसेसला सामोरे जाण्याची तयारी ठेवा!’ किंवा मग टेबलाखालून चालू असलेला, तरी पण आजच्या जगात ‘निरभ्र’ ठरलेला ‘शिक्षणाचा व्यापार’! प्रत्येक पावलागणिक होणारी विद्यार्थ्यांची दमछाक! पर्सेटेजेसची लागलेली ही लगोरी फोडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न. पशांची जमवाजमव अन् त्यातच कुठेन तरी “this is mission admission” असं म्हणत पडणारे सुस्कारे!
    डोळ्यांसमोर चालू असलेली अन् कानांवर आदळणारी ही प्रत्येकाची कुतरओढ! कळतंय सारं. अगदी डोळ्यांसमोर सारं दिसतंयदेखील, पण शेवटी कुठे तरी जाणीव होते, आपणही त्यातूनच गेलोय आणि मग धारण केलं जातंय ते न सुटणारं मौन!
ही झाली निगेटिव्ह साइड. दुसऱ्याच बाजूला पॉझिटिव्ह साइडही तितकीच खुणावतेय अ‍ॅडमिशनच्या याच प्रोसेसमध्ये मिळणारे अनेक अनुभव, टप्प्याटप्प्यावर भेटणारे मदतीचे हात, पावला-पावलांवर होणाऱ्या अनेक ओळखी अन् प्रत्येक प्रोसेसमध्ये दडलेले कॉलेजच्या कर्मचारी वर्गाचे चेहरे नवख्या जगात ‘काका’ अशी हाक मारल्यावर लगेच मदतीला धावून येणारे, धीर देणारे अ‍ॅडमिशन घेताना वर्षभर केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवून हातात धरलेला रिझल्ट बघताना स्वत:चा आत्मविश्वास अधिकच बळावतोय, खुणावतंय ते नवं जग, नवी लाइफस्टाइल, नवे मित्र-मत्रिणी आणि सोबतीलाच नवा अभ्यास स्वत:च्या करिअरची दिशा दाखवणारा!
    स्वत:च्या आवडीचं कॉलेज न मिळाल्यानंच हिरमुसणारे निरागस चेहरेही याच प्रोसेसमध्ये पाहायला मिळणारे, पण कॉम्प्रोमाइज नावाचा एक फॅक्टर नव्यानं शिकणारे, आहे त्या परिस्थितीत मेहनत करून भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहणारे, तर काही ‘डोनेशन’ नामक पद्धतीत, केवळ एक ‘सीट’ न मिळाल्यानं कुठल्या तरी साध्याशा कोर्सवर समाधान मानणारे केविलवाणे चेहरे, तर उलटपक्षी त्याच ‘डोनेशन’वर र्निबधपणे पशाची उधळण करायला सज्ज झालेले उन्मत्त चेहरे! हजारो-लाखो चेहरे, हजारो-लाखो अनुभव, हजारो-लाखो अपेक्षा अन् मोजक्याच सीट्स, प्रत्येकाचं वर्णन तर जवळजवळ अशक्यच! पण तरीही नवं जग खुणावणाऱ्या अन् नवी स्वप्न पाहणाऱ्या निरागस चेहऱ्यांवर एकच एक प्रश्न दिसतोय, मनात उमटतोय –  “Mission Admission…!! Is it a success ?”

Story img Loader