सरीवर सरी कोसळू लागल्या की, तरुणांचा हात आपसूक खिशाकडे वळतो. मॉन्सून फॅशनच्या शोधात अनेक ठिकाणं पालथी घातली जातात. पॉकेटमनीचा बॅलेन्स साधून मान्सून फॅशन करण्यासाठी अनेक ठिकाणं पालथी घातली जातात.
पावसाळा म्हणजे सर्वाचा आवडता ऋतू. तीन महिने उन्हाची झळ सहन केल्यानंतर पावसाच्या सरी म्हणजे जणू काही शीतल गारवा. लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येक जण अगदी आतुरतेने या ऋतूच्या प्रतीक्षेत असतो. कुछ भी हो, कैसा भी हो लेकीन हर बात में स्टाईल होना चाहिये अशी आजच्या तरुण वर्गाची भाषा आहे. म्हणून तर पावसाला पाऊस न म्हणता ‘मान्सून ’ म्हणण्याची तरुण वर्गाची स्टाइल अलीकडचीच. आजचा तरुण वर्ग हा बाराही महिने आपल्या लूकबद्दल कॉन्शस असतो, मग ‘मान्सून’ तरी याला कसा अपवाद राहील..
‘मान्सून’ची चाहूल लागली की, तरुण वर्गाची शॉिपग जोरात सुरू होते. एकटय़ा दुकटय़ाची नव्हे, तर सगळा ग्रुपच किंवा कुटुंब फॅशनेबल शॉिपग करायला बाहेर पडतं. मग ती शॉिपग अगदी पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या छत्र्यांपासून ते अगदी पायातील चप्पलांपर्यंत. एवढेच काय तर अगदी आपल्या मोबाईल कव्हरचीही वेगळी शॉिपग केली जाते. शॉिपगसाठी कुठे भटकंती केली पाहिजे, हे तरुण वर्गास बरोबर ठाऊक असते. इंद्रधनुष्यासारखे रंग तरुण वर्ग स्वतच्या आयुष्यात भरून प्रत्येक ऋतूत आनंदी जगत असतो. सर्वाना हवाहवासा वाटणारा ऋतू असला तरी  या ऋतूत कसे कपडे व कशा प्रकारे फॅशन केली पाहिजे, या संदर्भातील काही मान्सून फॅशन टिप्स.
मान्सूनमध्ये नेहमी सिंथेटिक कपडय़ांची निवड करावी. सिंथेटिक कपडे पावसात भिजल्यावर लगेच सुकतात. कॉटन, डेनिम, वुल असे कपडे सहसा वापरू नयेत, कारण हे कपडे वाळण्यासाठी वेळ लागतोच. शिवाय त्याचा दमट असा वास येतो. मान्सूनमध्ये सिंथेटिक, पॉलिस्टर, टेरिकॉट, टेरिलीन, नायलॉन इत्यादी कपडय़ांचा वापर करावा.
पावसाळ्यात निसर्ग ज्या रंगांची उधळण करतो, ते व्हायब्रंट रंग असतात. पावसाळा हा प्रेमाचा ऋतू मानला जातो म्हणून आपण गुलाबी, लाल, हिरवा असे फ्रेश रंग वापरावेत. मिडल टोन किंवा मडी रंग वापरल्यास अधिक उत्तम. उदास वातावरणात निळा रंग वापरावा. कारण आकाश हे निळे असते. त्यामुळे तुम्हाला ‘फििलग ब्ल्यू’चा अनुभव येईल.
शॉर्ट मिडी तसेच जीन्स आणि डेनिम हे कपडे वापरायचे असल्यास थ्री फोर्थ, केप्रीज वापरावेत. लवकर सुकतील असे हाफ स्लिव्हज केव्हाही बेस्ट. सलवार व कुर्ता घालणे टाळावे त्याएवजी लेगिन्स आणि सल गुडघ्याएवढा कुर्ता घालावा.
चपलांची निवड करताना रबराची चप्पल, बूट, उंच टाचांचे चप्पल, फ्लोटर्स, बंद बूट वापरावेत. कापडी व चामडय़ाच्या बॅगा पावसाळ्यात वापरू नयेत. रेग्झिनच्या डिझायनर बॅग्स बाजारात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात बॅग निवडताना काळ्या व निळ्या रंगांना प्रथम प्राधान्य द्यावे.
मान्सूनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आणि रेनकोट उपलब्ध आहेत. तरुणींना सुशोभित अशी हलक्या रंगाच्या छत्रीची निवड करावी. हल्ली पारदर्शक छत्र्याही इन फॅशन आहेत. वेगवेगळ्या रंगांचे पारदर्शक तसेच जॅकेटसारखे रेनकोट शोभून दिसतात.
कपडय़ांसोबतच पावसाळ्यात मेकअपकडेही तेवढंच लक्ष द्या. पावसाळ्यात वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करावा. मुलींपेक्षा मुलांना फॅशनचे खूप कमी ऑप्शन्स असतात.
आता हे शॉपिंग करण्यासाठी तुम्ही बांद्रा हिल रोड, लिंकिंग रोड, कुलाबा कॉजवे, फॅशन स्ट्रीट येथील रस्त्यावर अगदी स्वस्तामध्ये करू शकता.

Story img Loader